Home » Blog » 44 people died in Hong Kong fire : हाँगकाँगमधील आगीत ४४ जणांचा मृत्य, ३०० बेपत्ता

44 people died in Hong Kong fire : हाँगकाँगमधील आगीत ४४ जणांचा मृत्य, ३०० बेपत्ता

by प्रतिनिधी
0 comments
44 people died in Hong Kong fire

नवी दिल्ली : हाँगकाँगमधील तैपोतील सात इमारती जळून खाक झाल्या असून त्यामध्ये ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. इमारतीतील ७०० जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असून अद्याप ३०० जण बेपत्ता आहे. मृत्यांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. (44 people died in Hong Kong fire)

बुधवारी २६ रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तैपोतील एका इमारतीला आग लागली. वाऱ्यामुळे आग वेगाने सात इमारतीत पसरली. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास चारवेळा फायर अलार्म घोषित करण्यात आले होते. जेव्हा मोठी आग लागते तेव्हाच हे अलार्म वाजतात. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचले पण तोपर्यंत अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने अथक प्रयत्न केल्यानंतर रात्री उशिरा आग आटोक्यात आली. अग्निशमन दलाचे सातशे जवान कार्यरत आहेत. (44 people died in Hong Kong fire)

ज्या सात इमारतींना आग लागली आहे त्या १९८० दशकात बांधल्या गेल्या आहेत. सात इमारतीतील दोन हजार अपार्टमेंटमध्ये चार हजार लोक रहात होते. त्यामध्ये वृद्धाचांही समावेश आहे. सध्या या इमारतींचे नुतनीकरणाच काम सुरू आहे. त्यामुळे सर्व इमारती बांधकाम साहित्य आणि बांबूंनी वेढल्या आहेत. आग वेगाने पसरली असल्याची माहिती हाँगकाँगचे मुख्य कार्यकारी जॉन ली यांनी दिली. नुतनीकरणाचे काम पाहणाऱ्या कंपनीच्या दोन संचालक आणि एका अभियंत्याला अटक करण्यात आली आहे. तयांच्यावर सामुहिक मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (44 people died in Hong Kong fire)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00