Home » Blog » Pithala bhakar agitation : महायुतीविरोधात काँग्रेसचे ऐन दिवाळीत राज्यभर पिठलं भाकर आंदोलन

Pithala bhakar agitation : महायुतीविरोधात काँग्रेसचे ऐन दिवाळीत राज्यभर पिठलं भाकर आंदोलन

by प्रतिनिधी
0 comments
Pithala bhakar agitation

मुंबई : प्रतिनिधी :  राज्यातील बळीराजावर यावर्षी मोठे संकट ओढवल्याने  त्याला भरीव पॅकेज व कर्जमाफी देण्याची आवश्यकता होती. परंतु  महायुती सरकारने अत्यंत तुटपुंजे पॅकेज  जाहीर केल्याने काँग्रेसच्या वतीने राज्यभरात ऐन दिवाळीत म्हणजे सोमवारी (दि. २०) पिठलं भाकर आंदोलन करण्यात येणार आहे. (Pithala bhakar agitation)

 बळीराजाला  काळी दिवाळी करण्याची वेळ आणल्याने भाजपा महायुती सरकारचा धिक्कार करण्यात येणार असून शेतकऱ्यांसोबत पिठलं, भाकरी व ठेचा खाऊन आंदोलन करणार आहे. अतिवृष्टीने राज्यातील ३० जिल्ह्यातील ३५० तालुक्यात सर्व वाहून गेले आहे. लाखो एकर शेतीचे नुकसान झाले आहे. हेक्टरी ५० हजार रुपये, जमीन खरडून गेली त्यासाठी हेक्टरी ५ लाख रुपये व कर्जमाफी करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने लावून धरली होती.  पण भाजपा महायुती सरकारने जुन्याच योजनांची गोळाबेरीज करून ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले, पण हे पॅकेज फसवे निघाले आहे. शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी मदत देण्याचे आश्वासनही फेल गेले असून सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांबरोबर पिठलं भाकर आंदोलन करणार आहे. सर्व जिल्हे, तालुका व गावागावात हे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसने दिली आहे. (Pithala bhakar agitation)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00