नवी दिल्ली : पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर अतिरेकी संघटनेच्या हल्ल्यात पाकिस्तानी निमलष्करी दलाचे ११ जवान ठार झाले आहेत. त्यामध्ये दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. टीटीपी या अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सुरक्षा दलांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. (11 Pakistani soldiers killed)
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या सैन्य दल आणि निमलष्करी दलावर सातत्याने हल्ले होत आहेत. आज झालेल्या हल्ल्यात निमलष्करी दलांच्या ताफ्याला लक्ष्य केले आहे. याबाबत पाकिस्तान सरकारकडून अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. (11 Pakistani soldiers killed)
पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर वायव्येकडील कुर्रम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यापूर्वी रस्त्याच्या कडेला बॉम्ब फेकले. तहरिक ए तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनेला अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षण दिले जाते असा आरोप पाकिस्तानने केला आहे. पण हा आरोप तालिबान सरकारने नाकारला आहे. (11 Pakistani soldiers killed)