Home » Blog » Mystery in Sky: दिल्लीकरांनी अनुभवली आकाशातील गूढ अग्निरेषा

Mystery in Sky: दिल्लीकरांनी अनुभवली आकाशातील गूढ अग्निरेषा

by प्रतिनिधी
0 comments
Mystery in Sky

नवी दिल्ली : दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेशातील (एनसीआर) जवळच्या शहरांमधील रहिवासी शनिवारी सकाळी आकाशात तेजस्वी अग्निमय गूढ रेषा अनुभवली. हे दृश्य अचंबित करणारे होते. (Mystery in Sky)

काही सेकंदांसाठी दिसलेले हे दृश्य अनेकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपले आणि ते शेअर केले. त्याचे वर्णन अनेकांनी ‘आयुष्यात एकदाच घडणारे’ दृश्य असे केले.

अवकाशात दिसलेली ही अग्निरेषा फक्त काही सेकंदांसाठी दिसत होती, परंतु ती शहराच्या दिव्यांच्या प्रकाशापेक्षा कैकपटीने तेजस्वी होती. त्यामुळे हा उल्कावर्षाव आहे, अवकाशातील कचरा आहे की आणखी काही आहे, असा प्रश्न दिल्लीकरांना पडला.

काही अहवालांनुसार, ही घटना बहुधा एक बोलाइड म्हणजे, तीव्र घर्षण आणि उष्णतेमुळे पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर तुकड्यांमध्ये फुटणारी उल्का होती. (Mystery in Sky)

अमेरिकन मेटियर सोसायटीच्या मतानुसार, सप्टेंबरमध्ये असे लहान उल्कावर्षाव होतात. अग्निगोलासारखे वेगळ्या उल्का त्या प्रवाहाच्या बाहेरही दिसू शकतात.

अनेक नागिरकांसाठी, ही घटना क्षणभंभूर पण अविस्मरणीय होती. ‘‘हे दृश्य केवळ काही सेकंद दिसून आले. मी असे काहीही कधीही पाहिले नाही,’’ असे दक्षिण दिल्लीतील एका आकाश निरीक्षकाने सांगितले. (Mystery in Sky)

शनिवारी झालेल्या अग्निमय रेषांचे नेमके मूळ अद्याप अनिश्चित असले तरी, खगोलशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की अशा घटना, मग त्या उल्कापिंड असोत किंवा अवकाशातील कचरा पुन्हा आत खाली येवो, असामान्य नाहीत – परंतु मोठ्या शहरावर त्यांचे अचानक दिसणे नेहमीच उत्सुकता आणि आश्चर्य निर्माण करते.

अलिगडमध्ये स्थानिक नागरिकांनीही ही अग्निरेषा अनुभवली, असे वृत्त आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00