Home » Blog » Normalcy returns in Nepal: नेपाळमध्ये लष्कर रस्त्यावर; स्थिती पूर्वपदावर

Normalcy returns in Nepal: नेपाळमध्ये लष्कर रस्त्यावर; स्थिती पूर्वपदावर

by प्रतिनिधी
0 comments
Normalcy returns in Nepal

काठमांडू : गेले दोन दिवस नेपाळची राजधानी काठमांडूसह परिसरात सुरू असलेली हिंसक निदर्शने कमी झाली आहे. संसदेसह इमारतींना आगी लावल्यानंतर परिस्थिती काबूत ठेवण्यासाठी लष्कर रस्त्यावर उतरले आहे. त्यामुळे बुधवारी (१० सप्टेंबर) राजधानी काठमांडूमध्ये सामान्य परिस्थिती निर्माण होत आहे. (Normalcy returns in Nepal)

सरकारचा भ्रष्टाचार, वाढती बेरोजगारी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे दमन याविरोधात प्रचंड संख्येने लोक रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे पोलिसांना अश्रूधुराच्या माऱ्यासह गोळीबारही करावा लागला. या घटनेत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी निदर्शकांनी पंतप्रधान ओ. पी. शर्मा ओली यांच्या खासगी निवासस्थानासह संसदेलाही आग लागली. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली. या पार्श्वभूमीवर बाली यांच्यासह काही मंत्र्यांनाही राजीनामा द्यावा लागला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी आता लष्कराने सूत्रे हाती घेतली आहेत. त्यामुळे काळमांडूतील स्थिती पूर्वपदावर येत आहे.

नेपाळ लष्कराने सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे. राजधानीत लष्करी जवान तैनात केले आहेत. गेल्या दोन दिवसांत, नेपाळमधील निदर्शने आणि हिंसाचारात सरकारी इमारतींवर तुफान हल्ले करण्यात आले. (Normalcy returns in Nepal)

दरम्यान, भारत सरकारने नेपाळमधील भारतीयांना एक सूचना जारी केली आहे. त्यांना घरातच राहण्याचे आणि बाहेर फिरू नये असे आवाहन केले आहे. अनेक भारतीय विमान कंपन्यांनी काठमांडूला येणारी उड्डाणेही थांबवली आहेत. (Normalcy returns in Nepal)

सोशल मीडियावरील सरकारने बंदी घातल्यानंतर नेपाळमध्ये सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील ‘जनरल झेड’ निदर्शनांची परिणती के.पी. शर्मा ओली सरकार विरोधातील प्रचंड उठावात झाली.

सोमवारी रात्री उशिरा सोशल मीडियावरील बंदी उठवण्यात आली असली तरी, दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. पंतप्रधान ओली यांनी राजीनामा दिला. हिंसाचारात १९ जणांचा मृत्यू झाल्यानंतर मंगळवारी (१० सप्टेंबर) निदर्शकांनी अनेक सरकारी इमारतींवर हल्ला केला आणि संसद तसेच अनेक उच्चपदस्थ नेत्यांची घरे जाळून टाकली.

लष्कराने सुरक्षेची जबाबदारी स्वीकारल्याने सामान्य परिस्थिती

लष्कर लाऊडस्पीकरवरून नागरिकांना शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे आणि तोडफोड करण्यापासून दूर राहण्याचे आवाहन करत आहे. बुधवारी सकाळी जारी केलेल्या निवेदनात लष्कराने सांगितले की, संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी ५ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00