Home » Blog » Navali Panhala : सेवानिवृत्त सैनिकाने झाडली मेव्हुण्यावर पिस्तूलातून गोळ्या

Navali Panhala : सेवानिवृत्त सैनिकाने झाडली मेव्हुण्यावर पिस्तूलातून गोळ्या

by प्रतिनिधी
0 comments
Navali Panhala

कोल्हापूर : प्रतिनिधी : घरगुती कारणावरुन सेवानिवृत्त सैनिकांने मेहुण्यावर पिस्तूलातून गोळीबार केला. निवृत्त सैनिकाने पिस्तूलातून झाडलेल्या दोन गोळ्यापैकी एक गोळी मेव्हुण्याच्या मांडीत घुसली. गंभीर जखमी मेव्हुण्याला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील नावली गावात घडली. (Navali Panhala)

मिळालेल्या माहितीनुसार निलेश राजाराम मोहिते हे चार महिन्यापूर्वी सेवानिवृत्त झाले असून ते नावली गावात रहात आहेत. सोमवारी सकाळी मोहिते आणि त्यांचा मेव्हुणा विनोद पाटील यांच्यात वाद झाला. चिडलेल्या मोहिते यांनी विनोद पाटील याच्यावर बंदुकीतून दोन गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी विनोद पाटील यांच्या मांडीत घुसली आहे. गंभीर जखमी विनोद पाटील या ताबडतोब हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच कोडोली पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोचले. त्यांनी घटनास्थळाला पंचनामा केला. (Navali Panhala)

गोळीबाराच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू, शाहूवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस उप अधीक्षक आप्पासाहेब पवार कोडोली पोलिस ठाण्यात आले. या घटनेतील संशयित सेवानिवृत्त सैनिक निलेश अग्रवाल याला ताब्यात घेऊन गुन्ह्यातील पिस्तूल ताब्यात घेतले आहे. (Navali Panhala)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00