Home » Blog » Priyanka slams Modi Govt: सगळे सांगता, पण पहलगाम घडले कसे ते का सांगत नाही? : प्रियंकांचा सवाल

Priyanka slams Modi Govt: सगळे सांगता, पण पहलगाम घडले कसे ते का सांगत नाही? : प्रियंकांचा सवाल

by प्रतिनिधी
0 comments
Priyanka slams Modi Govt

नवी दिल्ली : मंत्र्यांनी सभागृहात ऑपरेशन सिंदूरपासून सुरक्षेपर्यंत सर्व गोष्टींवर भाष्य केले, परंतु २२ एप्रिलचा पहलगाम हल्ला प्रत्यक्षात कसा घडला हे स्पष्ट केले नाही, अशा शब्दांत काँग्रेसच्या नेत्या खासदार प्रियंका गांधी यांनी सत्ताधाऱ्याच्या वर्मावर बोट ठेवले. (Priyanka slams Modi Govt)

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे स्पष्टीकरण सरकारने का दिले नाही, असा सवाल मंगळवारी (२९ जुलै) त्यांनी लोकसभेत केला. मंत्र्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या विविध पैलूंवर सविस्तर भाषणे दिली, पण सरकारने हे स्पष्ट का केले नाही, असा सवाल त्यांनी केला. (Priyanka slams Modi Govt)
‘‘मी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर मंत्र्यांची भाषणे ऐकली. त्यांनी ऑपरेशन सिंदूर, दहशतवाद, राष्ट्रीय सुरक्षा यासह सर्व गोष्टींवर भाष्य केले, इतिहासातील दाखलेही दिले, पण एक सांगितली नाही ती म्हणजे २२ एप्रिल रोजी पहलगाम हल्ला नेमका कसा झाला?’’ असा वर्मी घाव त्यांनी घातला.

माझ्या आईच्या अश्रूचा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्यात आला. मी याचे उत्तर देते. जेव्हा तिच्या पतीला दहशवाद्यांनी मारले तेव्हा माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले. त्यावेळी ती केवळ ४४ वर्षाची होती. मी आज या सभागृहात उभी राहून त्या २६ नागरिकांबद्दल (पहलगाममध्ये मारले गेलेले) विचारतेय, कारण मी त्यांचे दु:ख जाणते.
-प्रियंका गांधी, काँग्रेस खासदार

प्रियंका गांधी म्हणाल्या की, सरकार काही काळापासून काश्मीरमधील दहशतवाद संपुष्टात आला आहे आणि खोऱ्यात पूर्ण शांतता परतली आहे असा दावा करते, ‘प्रचार’ करत आहे.

‘‘पंतप्रधानांनीही अनेक भाषणे दिली आणि नागरिकांना काश्मीरला भेट देण्याचे आवाहन केले. मी अनेकदा लोकांना तेथे जमीन खरेदी करण्यास सांगणारे फोन ऐकले आहेत. या प्रदेशात शांतता आणि सुरक्षित वातावरण आहे, असा दावा केला जात आहे,’’ असे त्या म्हणाल्या. (Priyanka slams Modi Govt)

त्या म्हणाल्या की, २२ एप्रिल रोजी बैसरन खोऱ्यात हवामान आल्हाददायक होते. सुमारे १,००० ते १,५०० लोकांची गर्दी तिथे जमली होती. बैसरनला जाणारा मार्ग सोपा नाही. लोकांना तिथे पोहोचण्यासाठी घोड्यावरून जावे लागते. खडबडीत रस्ता ओलांडावा लागतो. अनेक कुटुंबे आली होती, मुले ट्रॅम्पोलाइन आणि झिपलाइनवर खेळत होती. शुभम द्विवेदी त्यांच्या पत्नीसोबत चहा घेत असताना चार दहशतवाद्यांनी त्यांच्या पत्नीसमोर गोळ्या घालून त्यांची हत्या केली. नावे विचारून २६ जणांना मारण्यात आले. तेथे सुरक्षा व्यवस्था का नव्हती,’’ असा सवाल त्यांनी केला.

‘‘लोक सरकारवर विश्वास ठेवून तिथे गेले होते, पण त्यांना देवाच्या दयेवर सोडण्यात आले. या देशाच्या सुरक्षेची जबाबदारी संरक्षणमंत्र्यांची नाही का? गृहमंत्र्यांची नाही का?” असा प्रश्नांची सरबत्ती प्रियांका गांधी यांनी सरकारवर केली.

हेही वाचा :
काँग्रेसलाही नसेल तेवढी तुम्हाला नेहरूंची आठवण येते : कनिमोळी यांचा शहांवर हल्ला

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00