Home » Blog » Police officer apply for VRS : ‘मुख्यमंत्री थप्पड’ घटनेतील पोलिस अधिकाऱ्याकडून व्हीआरएसची मागणी

Police officer apply for VRS : ‘मुख्यमंत्री थप्पड’ घटनेतील पोलिस अधिकाऱ्याकडून व्हीआरएसची मागणी

by प्रतिनिधी
0 comments
Police officer dimand VRS

धारवाड : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी एका जाहीर सभेत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला थप्पड मारण्याचा इशारा केल्याच्या घटनेनंतर पोलिस अधिकाऱ्याने स्वेच्छा निवृत्तीची मागणी केली आहे. व्हीआरएच्या अर्जात त्यांनी आपला अपमान झाल्याचा उल्लेख केला आहे. (Police officer apply for VRS)

धारवाडचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक नारायण व्ही बारामणी यांनी स्वेच्छा निवृत्ती मागितली आहे. अजून त्यांची चार वर्षे सेवा बाकी आहे. तरीही त्यांनी गृह विभागाकडे व्हीआरएससाठी अर्ज दिला आहे. एप्रिल २०२५ मध्ये बेळगाव येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यासपीठावर थप्पड मारण्यासाठी हात उगारला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया आणि न्यूज चॅनेलवर झळकला होता. (Police officer apply for VRS)

अतिरिक्त पोलिस अधीक्षक बारामणी यांनी एक महिन्यापूर्वी कर्नाटक राज्य सरकारकडे व्हीआरएससाठी विनंती केली आहे. सरकार त्यांची विनंती मान्य करण्याची वाट पहात आहे, असे त्यांनी ‘टीओआय’शी बोलताना सांगितले. ३१ वर्षे पोलिस दलात सेवा बजावलेल्या बारामणी यांना थप्पड मारण्याचा इशारा केल्याच्या घटनेने अपमानित झाल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यांनी या संदर्भात व्हीआरएससाठी राज्य सरकारकडे पाठवलेल्या पत्रातही या घटनेचा उल्लेख केला आहे. (Police officer apply for VRS)

एप्रिल महिन्यात बेळगावी येथे सभा होती. या सभेसाठी धारवाडवरुन बारामणी बेळगाव येथे ड्युटीवर गेले होते. मुख्यमंत्र्यांच्या सभेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री आणि सरकारविरेधात घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवल्यावर मुख्यमंत्री संतापले. सिद्धरामय्या यांनी एसपी कोण आहेत, असा प्रश्न विचारला. त्यावेळी स्टेजजवळ असलेल्या बारामणींना व्यासपीठावर बोलावे. मुख्यमंत्र्याचे म्हणणे ऐकण्यासाठी बारामणी जवळ जात असताना सिद्धरामय्यांनी पोलिस अधिकाऱ्याला थप्पड मारण्यासाठी हात उगारला. ही घटना उपस्थितांनी पाहिली. तसेच टीव्हीवर आणि सोशल मीडियावरही या घटनेचे फुटेज झळकले. त्याबद्दल नागरिक आणि विरोधी पक्षांकडूनही निषेध व्यक्त केला गेला.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00