Home » Blog » Middle East conflict : मध्य पूर्वेतील संघर्ष; शेअर बाजार घसरला

Middle East conflict : मध्य पूर्वेतील संघर्ष; शेअर बाजार घसरला

by प्रतिनिधी
0 comments
Middle East impact on stock market

मुंबई : प्रतिनिधी : इस्त्रायल इराण युद्धात अमेरिकेने उडी घेऊन इराणवर केलेल्या जोरदार आक्रमक हल्ल्याने कच्चा तेलाच्या दरात वाढ झाली आहे. या हल्ल्याचे परिणाम शेअरबाजारावर सोमवारी (२३ जून) पहिल्याच दिवशी दिसून आला. भारतीय शेअर बाजारात बीएसई सेन्सेक्स ८०० अंकांनी घसरला आहे.(Middle East conflict)

इस्त्रायल इराणामधील संघर्षात अमेरिकाच्या सहभागाने सोमवारच्या बाजारावर परिणाम करेल, अशी अपेक्षा होती. अशियाई बाजारावर त्याचा परिणाम झाला असून आज सोमवारी सकाळी शेअर बाजार सुरूवात झाल्याने भारतीय शेअरबाजाराची सुरुवात घसरणीने झाली. बीएसई सेन्सेक्स ८४० अंकानीं घसरला. त्याचे प्रमाण १.०२ टक्के इतके होते. निफ्टी ५० २४ हजार ९०० च्या खाली गेला. सकाळपासून शेअर बाजाराची सुरुवात अडखळत झाली. निफ्टी १७२ अंकांनी म्हणजेच ०.६९ टक्के घसरुन २४,०३९ वर आला. अमेरिनेने इराणवर हल्ल केल्यानंतर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल पुरवठा थांबवण्याच्या इराणच्या धमकीचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला आहे. (Middle East conflict)

तेलाच्या किमतीत वाढ

अमिरकेच्या इराणवरील हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बाजार उघडताच तेलाच्या किमतीत पाच टक्क्यापर्यंत वाढ झाली आहे. इराण जगातील नववा सर्वांत मोठा तेल उत्पादक देश आहे. इराण रोज ३३ लाख बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन करतो. उत्पादन करत असलेल्या एकूण उत्पादनापैकी इराण निम्मे तेल निर्यात करतो तर शिल्लक तेलाचा वापर देशात करतो. अमेरिका आणि इस्त्रायलला प्रत्युत्तर म्हणून इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा केली आहे. पण त्याची अंमलबजावणी सुरू केलेली नाही. त्यामुळे सम्रुदातील तेलवाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असून इंधनाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00