Home » Blog » MP Rahul Gandhi : ‘ट्रम्प यांच्या फोननंतर, नरेंदर, सरेंडर!’

MP Rahul Gandhi : ‘ट्रम्प यांच्या फोननंतर, नरेंदर, सरेंडर!’

by प्रतिनिधी
0 comments
Rahul Gandhi

भोपाळ : प्रतिनिधी :  ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेत भारतीय सैनिक पाकिस्तानची लढत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करताच ‘नरेंदर, सरेंडर झाले’ अशा शब्दात लोकसभेतील विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी खिल्ली उडवली. (MP Rahul Gandhi)

राहूल गांधी मध्य प्रदेशाच्या दौऱ्यावर असून त्यांनी भोपाळ येथे काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ऑपरेशन सिंदूर मोहिमेदरम्यान भारताने अचानक केलेल्या शस्त्रसंधीच्या घोषणेवरुन राहूल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. राहूल गांधी म्हणाले, तिकडून ट्रम्पनी एक फोन केला आणि म्हणाले मोदीजी काय करताय? त्यावर ‘जी हुजुर’ करत नरेंदर सरेंडर झाले आणि ट्रम्प यांच्या इशाऱ्याचे पालन केले. (MP Rahul Gandhi)

राहूल गांधी यांनी काँग्रेस महासत्तांशी लढते असा दावा करुन त्यांनी आरएसएसवरही निशाना साधला. ते म्हणाले, इंदिरा गांधी यांनी १९७१ च्या युदधाच्यावेळी अमेरिकेच्या धमक्यांना न जुमानता पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. काँग्रेसचे लोक हे सरेंडर होणारे नाहीत, तर महासत्तांशी लढणारे आहेत. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल हे महासत्ताशी लढणारे होते, असे राहूल गांधी म्हणाले. (MP Rahul Gandhi)

भाजप आणि आरएसएसविरुद्ध टीका करताना राहूल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर पळपुटे असल्याची टीका केली. ते म्हणाले, भाजप, आरएसएसच्या लोकांना मी चांगलाच ओळखतो. त्यांच्यावर थोडासा जरी दबाव टाका, थोडासा धक्का मारा, ते घाबरुन पळून जातात. सरेंडर होणे हा त्यांचा इतिहास आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढाच्या वेळीदेखील त्यांनी असाच पळ काढला, असा टोला राहूल गांधी यांनी लगावला.

हेही वाचा :
सूर्यकुमार ठरला ‘मौल्यवान’ खेळाडू

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00