मुंबई : विशेष प्रतिनिधी : पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या ठाण्यातील देशद्रोही रविकुमार वर्मा हा गेल्या आठ महिन्यांपासून त्यांना संरक्षण विभागातील महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती पुरवित असल्याची धक्कादायक बाब तपासातून समोर आली आहे. (Spy Ravi Verma)
दहशतवाद विरोधी पथकाकडून( एटीएस) दोन दिवसांपासून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्यातून त्याचे काळेधंदे उघड झाले आहेत.
हरियाणा येथील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिचे पाकसाठी हेरगिरी, पाक दुतावासातील अधिकऱ्याशी संबंध, चर्चेचा विषय बनले असतानाच ठाण्यातील कळवा येथे राहणारा रविकुमार वर्मा याचाही देशद्रोही कृत्यांमध्ये सहभाग असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. रवी हा नेव्हल डॉकमध्ये ज्युनियर मेकॅनिकल इंजीनिअर म्हणून काम करत होता. फिटर म्हणून तो आउटसोर्सिंगद्वारे नोकरीला लागला होता. (Spy Ravi Verma)
एटीएसने अटक केलेल्या त्याला शनिवारी मुंबईत आणले. नागपाडा येथील एटीएस हेड क्वार्टरमध्ये त्याला ठेवण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवी वर्मा हा विशाखापट्टनम येथील विजाग येथे गेला होता. त्यावेळी त्याच्या संपर्कात प्रीती नावाची महिला आली होती. ऑक्टोबर २०२४ मध्ये रविकुमार आणि प्रीती जयस्वाल हिच्या संपर्कात आला. नेव्हलमध्ये रविकुमारचे व्हिडीओ कॉलवर काम अवलंबून असल्याने त्याला आत मोबाईल नेण्यास परवानगी होती. त्याचाच फायदा घेऊन रविकुमारने नेव्हल डॉकमधील महत्त्वाची १४ जहाजे आणि संवेदनशील माहितीचे फोटो व व्हिडीओच्या माध्यमातून पाकिस्तानातील मुलीला पाठवली होती. (Spy Ravi Verma)
गेल्यावर्षी नोव्हेंबरपासून पाकिस्तानी फेसबुक अकाउंटच्या संपर्कात आला होता. पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हची फेसबुक अकाऊंट असलेल्या पायल शर्मा आणि इस्प्रित या खात्यावरून एका प्रकल्पासाठी युद्धनौकांची माहिती हवी, अशी मागणी रवी वर्माकडे करण्यात आली होती. ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकलेला रवी त्यांना आवश्यक सर्व माहिती पायल शर्मा आणि इस्प्रितला वारंवार पाठवत होता हे स्पष्ट झाले आहे. या कामासाठी आणखी कोणी साथीदार होते का, याचीही माहिती घेण्यात येत आहे.
हेही वाचा :
सुरूवातीला भारताचे हवाई हल्ल्यात नुकसान : सीडीएस
राफेल विमान पाडल्याचे सरकारने नाकारू नये : काँग्रेस नेते रेड्डी