नवी दिल्ली : पहेलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याला महिना झाला तरी या हल्ल्यातील दहशतवाद्यांचा मागमूसही अद्याप लागलेला नाही. या हल्ल्यात २५ पर्यटकांसह एका स्थानिक नागरिकाची अमानुष हत्या करण्यात आली होती. या घटनेचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) करत आहे. (No headway so far)
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन येथील मैदानी भागात झाला होता. या हल्ल्याचा तपास करणाऱ्या ‘एनआयए’ला दहशतवाद्यांना शोधण्यात अद्याप कसलेही यश मिळालेले नाही. हल्ल्याच्या काही दिवसांनंतर जम्मू-काश्मीर पोलिसांकडून तपासाची जबाबदारी एनआयएने घेतली होती. एनआयए पथकाने साक्षीदारांची चौकशी करत आहे. मिळालेले तांत्रिक पुरावे तपासत आहे, असे कळते.
पहेलगाममधील बैसरन खोऱ्यात झालेल्या हल्ल्यामागे पाकिस्तानातील तीनसह किमान पाच दहशतवादी असल्याचा संशय आहे. अधिकाऱ्यांनी किमान तीन दहशतवाद्यांचे रेखाचित्रे जारी केली आहेत. त्यांच्याबद्दल माहिती देणाऱ्यांना प्रत्येकी २० लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे. (No headway so far)
‘‘जम्मू-काश्मीर पोलिसांनी सुरुवातीला दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी केली. नव्याने गुन्हा दाखल केल्यानंतर एनआयएने साक्षीदारांची चौकशी सुरू केली. आतापर्यंत त्यांनी १५० स्थानिकांची चौकशी करून माहिती घेतली आहे. यामध्ये पोनी ऑपरेटर, दुकानदार, छायाचित्रकार आणि साहसी क्रीडा उपक्रमांमध्ये काम करणाऱ्या लोकांचा समावेश आहे,’’ असे एका सूत्राने सांगितले.
एनआयएने एका स्थानिक व्यक्तीचीही चौकशी केली ज्याने घटनेच्या सुमारे १५ दिवस आधी परिसरात दुकान उघडले होते, परंतु हल्ल्याच्या दिवशी ते बंद ठेवले होते. ‘‘आम्हाला त्याच्याविरुद्ध काहीही ठोस आढळलेले नाही आणि चौकशी अजूनही सुरू आहे,’’ असे सूत्रांनी सांगितले. (No headway so far) तपासादरम्यान, एनआयएने घटनास्थळावरून डंप डेटा, पीडितांच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि काही इतर पर्यटकांनी काढलेले व्हिडिओ आणि छायाचित्रे मिळवली. तांत्रिक छाननीच्या आधारे त्याची तपासणी सुरू आहे. साक्षीदार आणि दुकानदारांच्या जबाबांवर आधारित त्यांनी बैसरन मैदानाचे ३ डी मॅपिंगही केले आहे.
हेही वाचा :
‘ईडी सर्व मर्यादा ओलांडत आहे’
रान्या राव प्रकरणात परमेश्वर यांच्यावर ईडी कारवाई