Home » Blog » Ajit Pawar slams: हगवणे प्रकरणात अजित पवार गटाची मोठी कारवाई

Ajit Pawar slams: हगवणे प्रकरणात अजित पवार गटाची मोठी कारवाई

राजेंद्र हगवणेंची पक्षातून हकालपट्टी

by प्रतिनिधी
0 comments
Ajit Pawar slams

बारामती : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अजित पवार गटाने मोठी कारवाई केली. माझा सभासद असेल तर त्याची हकालपट्टी करतो. असले लोक माझ्या पक्षात नकोत, असे स्पष्ट करत पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी राजेंद्र हगवणे यांची हकालपट्टी केली. (Ajit Pawar slams)

वैष्णवी हगवणेच्या मृत्यूप्रकरणी राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पती शशांक हगवणे, सासू लता, नणंद करिश्मा यांना वैशालीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. सासरा राजेंद्र हगवणे फरार आहे.

अजित पवार हगवणे कुटुंबीयांच्या लग्नाला गेले होते. त्यामुळे त्यांच्यावर टीका सुरु झाली होती. त्यानावरून अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली. असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणारच असे त्यांनी बारामतीत सांगितले. (Ajit Pawar slams)

ते म्हणाले, या घटनेची माहिती समजल्यावर पिंपरीच्या सीपींना फोन केला. यात कोणी का असेना कारवाई करा, असे त्यांना सांगितले. ज्या मुलीने आत्महत्या केली, तिचा नवरा, सासू, नणंद सगळ्यांना अटक झालेली आहे. सासरा पळून गेला. तोही सापडेल, पळून पळून जातो कुठं? असे ते म्हणाले.

एखाद्या लग्नाला गेलो आणि नंतर त्यांनी त्याच्या सुनेसोबत वेडेवाकडं केले असेल तर त्यात अजित पवारचा काय संबंध आहे. अजित पवार दोषी असतील तर फासावर लटकवा, असा संताप अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रकरणात उगाच बदनामी केली जात आहे. प्रेमापोटी लोक बोलावतात. तिथे जावे लागते, नाही गेले तर लोक रूसतात, लग्नाला गेलो म्हणून आम्ही सांगतो का सुनेशी असे वागा म्हणून अजित पवारांनी सांगितले का?, असा सवालही पवार यांनी केला. (Ajit Pawar slams)

ते म्हणाले, माझा सभासद असेल तर त्याची हकालपट्टी करतो. असले लोक माझ्या पक्षात नकोत. जे फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पथक नेमली आहेत. माणुसकी म्हणून जबाबदारी म्हणून जे काही करायले आहे ते आम्ही केले आहे. शोधासाठी आणखी पथके वाढवायला सांगितली आहेत, असेही अजित पवारांनी सांगितले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00