Home » Blog » BJP texture List : भाजपच्या ८१ जिल्हाध्यक्षांची बनावट यादी व्हायरल

BJP texture List : भाजपच्या ८१ जिल्हाध्यक्षांची बनावट यादी व्हायरल

सायबर पोलिसाकडे तक्रार करण्याचा पक्षाचा निर्णय

by प्रतिनिधी
0 comments
BJP texture List

जमीर काझी : मुंबई : केवळ भारतातीलच नव्हे तर जगातला सर्वात मोठा पक्ष असलेल्या व महाराष्ट्राचं अनेक राज्यात व केंद्रात सत्तेवर असलेल्या राज्यातील ८१ जिल्हाध्यक्ष यांची बनावट यादी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. त्यामुळे पक्षाचे नेते व पदाधिकाऱ्यांमध्ये काहीसा गोंधळ उडाला आहे. याबाबत सायबर क्राईमकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय प्रदेश भाजपाने घेतला आहे. (BJP texture List)

दरम्यान, सोशल मीडियावर “भाजप जिल्हाध्यक्ष २०२५” या नावाने फिरणारी ८१ जिल्हाध्यक्षांची यादी बनावट असून, तिचा पक्षाशी कोणताही संबंध नाही. अशी माहिती भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अधिकृत निवेदनाद्वारे दिली आहे. 

 विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळवल्यानंतर महाराष्ट्र भाजपाने पक्ष बांधणीची मोहीम जोरात राबवली आहे. मोठया प्रमाणात सदस्यांची नोंदणी करण्यात आली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त यश मिळवण्याच्या दृष्टीने व्यूहरचना केली जात आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत कार्यकर्त्यांना संधी देण्याचे पक्षश्रेष्ठींचे धोरण आहे. राज्यातील ५८  जिल्हाध्यक्षांची यादी यापूर्वीची पक्षाने जाहीर केली  असून अद्याप १८  जिल्हाध्यक्षांची निवड बाकी आहे. त्याचे काम सुरू असून त्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता लागली असतानाच अज्ञातांकडून  शनिवारपासून ८१ जिल्हाध्यक्ष नियुक्तीची सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली आहे. त्यामध्ये अनेक संशयास्पद व्यक्तीची नावे आहेत.त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आणि पक्षाच्या प्रमुख नेत्याकडे त्याबाबत विचारणा करण्यात आली असता ही यादी बनावट असल्याचे स्पष्ट झाले. (BJP texture List)

 या प्रकाराबाबत कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे की, आतापर्यंत भाजपच्या फक्त ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित जिल्हांची निवड प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे बनावट यादीवर विश्वास ठेवू नये,  सदरील बनावट यादीत अनेक चुकीची नावं असून, ती हेतुपुरस्सरपणे पसरवण्यात येत असल्याची शक्यता पक्षानं व्यक्त केली आहे. उर्वरित जिल्ह्यांची निवड प्रक्रिया सुरू असून, ती लवकरच पूर्ण होईल, असेही  चव्हाण यांनी सांगितलं आहे.

या प्रकारामुळे पक्षाची बदनामी होण्याची शक्यता असून, बनावट माहिती प्रसारित करणाऱ्यांविरोधात सायबर क्राईम अंतर्गत पोलीस तक्रार दाखल करण्यात येणार आहे.पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि प्रसारमाध्यमांनी फक्त अधिकृत माध्यमांद्वारे जाहीर होणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहनही  चव्हाणांनी केले आहे. (BJP texture List)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00