Home » Blog » Srihari LR : श्रीहरी बनला भारताचा ८६ वा ग्रँडमास्टर

Srihari LR : श्रीहरी बनला भारताचा ८६ वा ग्रँडमास्टर

आशियाई बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये तिसरा नॉर्म पूर्ण

by प्रतिनिधी
0 comments
Srihari LR

चेन्नई : तमिळनाडूचा १९ वर्षीय बुद्धिबळपटू श्रीहरी एल. आर. हा भारताचा ८६ वा ग्रँडमास्टर ठरला आहे. आशियाई पुरुष बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सहभागी होऊन श्रीहरीने ग्रँडमास्टर किताब मिळवण्यासाठी लागणारी तिसरी व अखेरची अट पूर्ण केली. (Srihari LR)

संयुक्त अरब आमिरातमधील अल-ऐन येथे ही स्पर्धा पार पडली. यापूर्वी, २०२३मध्ये कतार मास्टर्स आणि २०२४मध्ये चेन्नई ग्रँडमास्टर्स ओपन बुद्धिबळ स्पर्धा खेळून श्रीहरीने ग्रँडमास्टर बनण्यासाठीच्या दोन अटी पूर्ण केल्या. ऑगस्ट, २०२४ मध्ये त्याने २,५०० एलो पॉइंट्सचा टप्पाही ओलांडला होता. आशियाई स्पर्धेतील पहिल्या आठ फेऱ्यामध्ये श्रीहरीने अपराजित राहून विजेतेपद निश्चित केले. यांमध्ये त्याने अभिजीत गुप्ता, प्रणव व्ही. यांसारख्या भारतीय ग्रँडमास्टर्सवर विजय मिळवले. अखेरच्या फेरीमध्ये त्याला ग्रँडमास्टर इनियन पनीरसेल्वमविरुद्ध पराभव पत्करावा लागला असला, तरी त्याचे विजेतेपद अबाधित राहिले. (Srihari LR)

श्रीहरीने ग्रँडमास्टर श्यामसुंदर यांच्या अकादमीमध्ये बुद्धिबळाचे धडे गिरवले. श्रीहरीच्या रूपाने भारताने अवघ्या वर्षभरातच बुद्धिबळविश्वाला नवा ग्रँडमास्टर दिला आहे. यापूर्वी, १२ मे, २०२४ रोजी भारताचा श्यामनिखिल पी. हा ८५ वा ग्रँडमास्टर ठरला होता. (Srihari LR)

प्रज्ञानंदसुपरबेट चेस क्लासिकचा विजेता

भारताचा बुद्धिबळपटू रमेशबाबू प्रज्ञानंदने शनिवारी रोमानियामधील सुपरबेट चेस क्लासिक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. प्रज्ञानंदचे हे कारकिर्दीतील पहिलेवहिले ग्रँड चेस टूर स्पर्धेचे विजेतेपद आहे. या विजेतेपदामुळे प्रज्ञानंदच्या खात्यात १० जीसीटी गुण जमा झाले आहेत. या स्पर्धेच्या अखेरच्या फेरीमध्ये प्रज्ञानंदला अमेरिकेच्या लिव्हॉन ॲरॉनियनविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्याचवेळी मॅक्झिम व्हॅचिएर-लॅग्रेव्ह आणि अलीरेझा फिरोझा या दोन बुद्धिबळपटूंनी अखेरच्या फेरीतील आपापल्या लढतींमध्ये विजय मिळवले. त्यामुळे प्रज्ञानंदसह हे दोघेही प्रत्येकी ५.५ गुणांसह संयुक्तरीत्या आघाडीवर होते. त्यामुळे विजेता ठरवण्यासाठी ब्लिट्झ प्लेऑफ लढती खेळवण्यात आल्या. या प्ले-ऑफ लढतींमध्ये प्रज्ञानंद वि. फिरोझा व फिरोझा वि. व्हॅचिएर-लॅग्रेव्ह या लढती बरोबरीत सुटल्या. त्यामुळे, या प्रज्ञानंद वि. व्हॅचिएर-लॅग्रेव्ह ही लढत निर्णायक ठरली. त्यामध्ये प्रज्ञानंदने व्हॅचिएर-लॅग्रेव्हवर मात करत विजेतेपदावर नाव कोरले. या विजेतेपदामुळे प्रज्ञानंदला ७७,६६७ डॉलर्सचे बक्षीस मिळाले आहे.

हेही वाचा :
रॉस्टन चेस विंडीजचा नवा कर्णधार

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00