कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या मंगळवारी १३ मे रोजी जाहीर होणार आहे. उद्या मंगळवारी दुपारी एक वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. (SSC result)
बारावीचा निकाल नुकताच झाल्यापासून दहावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता विदयार्थी आणि पालकांना लागली होती. मंगळवारी दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना बोर्डाच्या आणि अन्य संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल. त्यानंतर आपापल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल. (SSC result)
दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सुरू झाली होती आणि १७ मार्च रोजी संपली होती. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळाकडून परीक्षा घेण्यात आली होती. (SSC result)
कुठे पाहाल निकाल?
https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org