Home » Blog » kohli asserts : अँडरसनला खेळणे सर्वांत कठीण

kohli asserts : अँडरसनला खेळणे सर्वांत कठीण

विराटने केली मलिंगा, आदिलच्याही गोलंदाजीची प्रशंसा

0 comments
Kohali asserts

बेंगळुरू : भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करण्यासाठी सर्वांत कठीण गोलंदाज म्हणून इंग्लंडच्या जेम्स अँडरसनची निवड केली आहे. त्याचप्रमाणे, लसिथ मलिंगा, आदिल रशीद, सुनील नरेन यांच्या गोलंदाजीचीही विराटने प्रशंसा केली. (kohli asserts)

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाकडून खेळणाऱ्या विराटने पंधरा वर्षांहून अधिक काळाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत बऱ्याच गोलंदाजांचा सामना केला आहे. यांपैकी फलंदाजीसाठी सर्वांत कठीण गोलंदाजाची निवड करताना विराटने अँडरसनचे नाव घेतले. कसोटीमध्ये, विशेषत: इंग्लंडमध्ये खेळताना अँडरसनच्या गोलंदाजीचा सामना करणे हे खूपच कठीण असल्याचे विराट म्हणाला. अँडरसनने तब्बल २२ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीनंतर मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याच्या नावावर ७०४ कसोटी विकेट असून सर्वाधिक कसोटी विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो मुथय्या मुरलीधरन व शेन वॉर्नखालोखाल तिसऱ्या स्थानी आहे. (kohli asserts)

वन-डे क्रिकेटमध्ये श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाचा सामना करणे हे जोखमीचे असल्याचे विराट म्हणाला. त्याचप्रमाणे, इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीदची गोलंदाजी खेळणे सातत्याने कठीण जात असल्याची कबुलीही विराटने दिली. मी सामना केलेला तो सर्वांत कठीण फिरकीपटू आहे, अशा शब्दांत विराटने आदिलची प्रशंसा केली. वेस्ट इंडिजचा माजी फिरकीपटू आणि आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणाऱ्या सुनील नरेनच्या गोलंदाजीचा अंदाज बांधणेही अवघड असल्याचे त्याने सांगितले. टी-२० क्रिकेटमध्ये नरेनची गोलंदाजी खेळणे अधिकच कठीण बनते, असे विराट म्हणाला. आयपीएलच्या सध्याच्या मोसमामध्ये विराटने आतापर्यंत १० सामन्यांत ४४३ धावा केल्या असून ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो आघाडीच्या पाच फलंदाजांमध्ये आहे. (kohli asserts)

हेही वाचा :
रबाडावर तात्पुरती बंदी
मला भारतीय संघात परत यायला आवडेल

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00