कोल्हापूर : प्रतिनिधी : पेट्रोल चोरीमुळे कसबा बावड्यातील नागरिक त्रस्त झाले होते. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा लावला आणि तो पकडला गेला. अनेक वाहनातून पेट्रोल चोरीची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता पोलिसांना चांगलेच घबाड मिळाले. पेट्रोल चोरी करणाऱ्या चोरट्याने तब्बल १४ घरफोड्या केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी त्यांच्याकडून साडेसतरा तोळे सोन्याचे दागिने, दोन किलो ६५२ ग्रॅम चांदीचे दागिने असा वीस लाख चार लाख १४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. (Burglary)
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्ह्याच्या तपासाची माहिती दिली. कसबा बावडा येथे घरफोड्याचा तपास करत असताना पेट्रोल चोरी करणारा सागर भगवान रेणुसे (वय २६ रा. गोळीबार मैदान, कसबा बावडा) हा सापडला. पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने अनेक वाहनातून पेट्रोल चोरी करत असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने १४ घरफोड्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी १७५ ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन किलो ६५२ ग्रॅम चांदीचे दागिने रोख रक्कम असा २० लाख चार हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (Burglary)
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत १४ घरफोड्या
संशयित रेणुसे याने शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत १४ घरफोड्या केल्या आहेत. २०२१ मध्ये त्याने दोन घरफोड्या केल्या. त्यामध्ये त्याने साडेतीन हजार किंमतीचे सोने आणि चांदीचे दागिने चोरले. २०२२ मध्ये पाच घरफोड्या, २०२३ ला तीन घरफोड्या केल्या. २०२४ मध्ये एकही घरफोडी केली नसल्याचे पोलिस तपासात आढळून आले आहे. पण २०२५ मध्ये तीन महिन्यात तीन घरफोड्या केल्या आहेत. (Burglary)
तोंडाला रुमाल लावून चोऱ्या
पेट्रोल चोरताना तो तोंडाला रुमाल लावत असे. अनेक सीसीटीव्हीत चोरी करताना तो दिसला होता. पण त्याची ओळख पटली नव्हती. तो एका बँकेत खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्य हे चांगल्या ठिकाणी नोकरी करतात. त्यामुळे त्याच्यावर कुणीच संशय घेत नव्हते. (Burglary)
यांनी केला तपास
पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक जालिंदर जाधव, पोलिस हवालदार हिंदूराव केसरे, सोमराज पाटील, वसंत पिंगळे, संदीप पाटील, सुरेश पाटील, राम कोळी, रुपेश माने, कृष्णात पिंगळे, अरविंद पाटील, अमित सर्जे, विलास किरोळकर यांनी तपास केला. (Burglary)
हेही वाचा :
पत्नीचा खून करून प्राध्यापकाची आत्महत्या
बलात्कारासाठी संबंधित युवतीच जबाबदार
केंद्रीय मंत्र्यांच्या नातीची गोळ्या झाडून हत्या