Home » Blog » DAMASA awards : खांडेकर, जनाबाई साहित्य पुरस्कारासाठी आवाहन  

DAMASA awards : खांडेकर, जनाबाई साहित्य पुरस्कारासाठी आवाहन  

by प्रतिनिधी
0 comments
DAMASA

कोल्हापूर : प्रतिनिधी : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय वि. स. खांडेकर आणि जनाबाई पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन लेखक, प्रकाशकांना करण्यात आले आहे. २०२४ या वर्षात प्रसिद्ध झालेली पुस्तके पाठवण्याची मुदत २५ एप्रिल आहे. जनाबाई पुरस्कार फक्त कवयित्रींसाठी आहे. (DAMASA awards)

सातारा येथील कवयित्री प्रा. डॉ. रामकली पावसकर यांच्यामार्फत वडिल प्रा. मनोहर कोपर्डे यांच्या स्मरणार्थ वि. स. खांडेकर पुरस्कार आणि आई श्रीमती कमल मनोहर कोपर्डे यांच्या स्मरणार्थ फक्त कवयित्रींसाठी जनाबाई पुरस्कार देण्यात येणार आहे. जनाबाई पुरस्कार यावर्षीपासून सुरू करण्यात येत असून तो फक्त कवयित्रींसाठी आहे. वि. स. खांडेकर पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून पहिला पुरस्कार संग्राम गायकवाड यांना ‘मनसमझावन’ या कादंबरीसाठी देण्यात आला.
खांडेकर पुरस्कारासाठी कथा, कादंबरी, ललित आणि आत्मकथन या वाड्.मय प्रकारातील पुस्तके पाठवता येतील. जनाबाई पुरस्कार स्त्रियांच्या कवितेसाठी आहे. दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप प्रत्येकी २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे आहे.
एक जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या दोन प्रती पुढील पत्त्यावर  दि. २५ एप्रिल, २०२५ पर्यंत पाठवाव्यात : कार्यवाह, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, ६, स्मृती अपार्टमेंट, ए वॉर्ड, बाबूजमाल रोड, कोल्हापूर : ४१६००२ (संपर्कः ९८५०४३३८०७). (DAMASA awards)

हेही वाचा :

‘गोकुळ’ ची बोलकी भिंत
पाच वर्षांत राज्याचा संतुलित विकास दिसेल

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00