नवी दिल्ली : बिहारमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या व्हाईट टी शर्ट यात्रेला सुरुवात केली. बिहार राज्यातील बेगुसराय जिल्ह्यात ‘पलायन रोखा, नोकरी द्या’ या पदयात्रेत राहूल गांधी सहभागी झाले. या यात्रेत त्यांच्यासोबत एनएसयूआयचे राष्ट्रीय प्रभारी कन्हैया कुमार होते. यावेळी राहुल गांधी यांनी तरुणांना व्हाईट टी शर्ट घालण्याचे आवाहन केले. राहूल गांधीच्या या पदयात्रेला मोठा प्रतिसाद लाभला आहे. या वर्षातील राहुल गांधींचा बिहारचा हा तिसरा दौरा आहे. (White T Shirt)
पदयात्रेत सहभागी होण्यापूर्वी राहुल गांधी यांनी एक्स पोस्टवर लिहिले आहे की “बिहारच्या तरुण मित्रांनो, मी ७ एप्रिल रोजी बेगुसरायला ‘रोको पालन, दो नोकरी’ मोहिमेत सहभागी होण्यासाठी, तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून चालत येईन. बिहारच्या तरुणांचा उत्साह, त्यांचे संघर्ष आणि त्यांच्या कष्ट जगाला दाखविण्याचे ध्येय आहे,” पांढरा टी शर्ट घालू सरकारला प्रश्न विचारा, आवाज उठवा असे आवाहनही त्यांनी केले. तुमच्या हक्कासाठी, सरकारवर दबाव आणण्यासाठी त्यांना जबाबदार धरा. चला एकत्र येऊया आणि बिहारला संधीचे राज्य बनवूया, असेही राहुल गांधी म्हणाले. (White T Shirt)
बिहार सरकारवर दबाव आणण्यासाठी पांढऱ्या रंगाचा टी शर्ट घालून आमच्यात सहभागी व्हा, असे आवाहनही राहुल गांधींनी केले. बिहारमध्ये तरुणांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत. बेरोजगारी, महागाई, पेपर लिक, सरकारी नोकऱ्यामध्ये कपात, खासगीकरण हीच कारणे बेरोजगारीसाठी असल्याने पलायन यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले. (White T Shirt)
राहुल गांधीच्या पदयात्रेवर भाजपने टीका केली आहे. केंद्रीय मंत्री नित्यानंद यांनी गांधी यांच्यावर टीका करताना असे म्हटले आहे की, राहूल गांधी जिथे जातात तिथे ते प्रथम आघाडीसाठी आणि त्यांच्या पक्षांसाठी समस्या निर्माण करतात. ते तेजस्वी यादव यांच्यासमोर समस्या निर्माण करण्यासाठी आले आहेत. लालूजींच्या पक्षाने जंगल राज्य स्थापन केले. पण बिहारच्या जनतेने भ्रष्ट लोकांना नाकारले आहे. त्यांना विकास हवा आहे. पदयात्रेपूर्वी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री नितीन कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमधील विकास पाहून काँग्रेचे नेते थक्क होतील. (White T Shirt)
हेही वाचा :
मंत्री महाजनांचे महिला अधिकाऱ्यांशी संबध
शेतकरी नेते दलेवाल यांनी १३१ दिवसांनी उपोषण सोडले