Home » Blog » म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंड

काय आहेत म्युच्युअल फंडचे उपप्रकार

by प्रतिनिधी
0 comments
Mutual Funds file photo

-प्रा. विराज जाधव : या लेखामध्ये आपण म्युच्युअल फंडांच्या विविध प्रकारांबद्दल माहिती घेणार आहोत. यामध्ये आपण मुख्य प्रकार आणि उप-प्रकार जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. उदाहरणार्थ डेट म्युच्युअल फंडांचे १६ उप-प्रकार आहेत. त्याचप्रमाणे, इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये १० ते ११ उप-प्रकार आहेत. या सर्वांची संख्या खूप जास्त असल्यामुळे, आजच्या एकाच लेखामधून या सर्व उप-प्रकारांची माहिती घेणे थोडे कठीण होईल. असं असलं तरी, या लेखमालेचे मुख्य उद्दिष्ट तुम्हाला वैयक्तिक वित्त विषयी जास्तीत जास्त माहिती देणे हे आहे.

अगदी अलीकडच्या काळापर्यंत, म्युच्युअल फंडांचे विश्व खूपच गोंधळलेले होते. ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या (AMCs) विविध म्युचुअल फंड स्कीम्स चालवत असत. त्यांपैकी अनेक स्कीम्स एकसारख्याच होत्या. यामुळे गुंतवणूकदारांना गुंतवणूक उद्दिष्टानुसार चांगली म्युच्युअल फंड स्कीम निवडणे खूप कठीण झाले होते. उदाहरणार्थ, जर AMC लार्ज कॅप फंड चालवत असेल, तर त्याची गुंतवणूक फक्त लार्ज कॅप स्टॉक्समध्येच असणे अपेक्षित आहे पण, प्रत्यक्षात AMC या स्कीममध्ये स्मॉल कॅप स्टॉक्सचा जास्त भरणा करायचे. त्यामुळे स्कीमच्या परफॉर्मन्समध्ये खूप चढ-उतार व्हायचे. गुंतवणूकदार लार्जकॅपमध्ये गुंतवणूक करत असे. कारण त्याला कमी अस्थिरता हवी होती, परंतु त्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. कारण या फंडात स्मॉलकॅप स्टॉक्स जास्त असायचे. ऑक्टोबर २०१७ पूर्वी, जेव्हा म्युच्युअल फंड श्रेणी तयार केल्या जात नव्हत्या, तेव्हा म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. जसे की, 

एकाच प्रकारच्या अनेक म्युचुअल फंड स्कीम्स : अनेक वेळा AMC एकाच गुंतवणुकीच्या उद्देशाने अनेक स्कीम्स सुरू करत. पूर्वी एकाच AMC च्या अनेक लार्ज कॅप किंवा मिड कॅप स्कीम्स असणे सामान्य होते. सर्व योजनांचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट समान असल्यामुळे यापैकी कोणती योजना निवडायची, हे ठरवणे कठीण गुंतवणूकदारांना व्हायचे. 

योग्य व्याख्येचा अभाव : बऱ्याच वेळा AMC आपल्या फंडाचे नाव लार्ज कॅप किंवा मिड कॅप असे ठेवायच्या पण त्यात इतर श्रेणींचे स्टॉक देखील समाविष्ट केले जायचे जे बाजार भांडवलानुसार त्यात समाविष्ट केले गेले नसावेत. कोणत्याही म्युच्युअल फंड कॅटेगिरीची निश्चित व्याख्या नसल्याने हे घडायचे. 

पोर्टफोलिओची समस्या : AMC त्यांच्या म्युचुअल फंड स्कीमच्या पोर्टफोलिओमध्ये कोणत्या प्रकारचे स्टॉक असतील हे स्पष्ट करायच्या नाहीत. उदाहरणार्थ, मिडकॅप फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये मिडकॅप स्टॉक असायला हवे होते, परंतु त्यातही बरेच स्मॉलकॅप स्टॉक असणे सामान्य होते. असे असूनही, फंडाच्या नावाने त्याचे वर्णन मिडकॅप फोकस्ड फंड म्हणून केले जायचे.

बेंचमार्कची समस्या : आणखी एक मोठी समस्या होती की फंडाचे बेंचमार्क कोणाकडे करायचे? स्कीमच्या परफॉर्मन्सची तुलना कोणाबरोबर करायची? लार्ज कॅप फंड स्कीमच्या परफॉर्मन्सची तुलना ही निफ्टी ५० इंडेक्ससह बेंचमार्क केली जाते, परंतु जर तेथे बरेच स्मॉल कॅप स्टॉक्स उपस्थित असायचे आणि तेही त्यांच्यासह बेंचमार्क केले जायचे. त्यामुळे फंडाची खरी कामगिरी कळू शकत नव्हती. काही फंडाची कामगिरी खूपच चांगली दिसायची.या सर्व समस्या सेबीने ऑक्टोबर २०१७ च्या परिपत्रकाच्या माध्यमातून काढून टाकल्या. म्युच्युअल फंडावरील कोणतीही चर्चा सेबीच्या ऑक्टोबर २०१७ च्या परिपत्रकाशिवाय अपूर्ण आहे. सेबीने या परिपत्रकात म्युच्युअल फंडांच्या विविध श्रेणी निश्चित केल्या. सेबीच्या या परिपत्रकामुळे म्युच्युअल फंडाच्या विश्वात खूप बदल झाले आणि प्रत्येक प्रकारच्या म्युच्युअल फंडाबद्दल समजणे सोपे झाले. त्या परिपत्रकात, सेबीने कंपन्यांची लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये कशी विभागणी केली जाईल याची व्याख्या केली आहे. त्यामुळे म्युच्युअल फंड बाजारातील एक मोठी समस्या दूर झाली. या व्याख्येनुसार :

लार्ज कॅप स्टॉक : मार्केट कॅपिटलायझेशननुसार, १ ते १०० क्रमांकापर्यंतच्या लिस्टेड कंपन्या लार्ज कॅप स्टॉक असतील.

मिड कॅप स्टॉक : मार्केट कॅपिटलायझेशननुसार, १०१ ते २५० पर्यंतच्या कंपन्या मिड कॅप स्टॉक असतील.

स्मॉल कॅप स्टॉक : मार्केट कॅपिटलायझेशननुसार, २५० क्रमांकानंतरच्या सर्व कंपन्या स्मॉल कॅप असतील.या व्याख्येनंतर, कोणत्या कंपनीचे बाजार भांडवल किती आहे आणि ते कोणत्या श्रेणीत जाईल हे ठरवणे सोपे होते. यासोबतच आता AMCला या व्याख्येचे पालन करावे लागेल, असा निर्णयही घेण्यात आला.याशिवाय, सेबीने पोर्टफोलिओची रचना देखील परिभाषित केली आहे. उदाहरणार्थ, सेबीने हेही ठरवले आहे की जर AMC ला लार्ज कॅप फंड चालवायचा असेल तर त्याला लार्ज कॅप स्टॉक्स ठेवावे लागतील आणि त्या फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये लार्ज स्टॉकची किमान टक्केवारी किती असावी हेही ठरवले आहे. मुख्यतः म्युच्युअल फंडाच्या पाच मुख्य श्रेणी आहेत, ज्यामध्ये आणखी अनेक उप-श्रेणी आहेत.

मुख्य श्रेणी खालील प्रमाणे आहेत :

  • इक्विटी
  • डेट
  • हाइब्रिड
  • सॉल्यूशनओरिएंटेड
  • इतर

म्युच्युअल फंड स्कीमचे प्रमुख प्रकार आणि त्यांचे उपप्रकार हे खालील तक्त्यामधून नमूद करण्यात आले आहेत.

इक्विटी डेट हाइब्रिड सोल्युशन ओरिएंटेड इतर
लार्ज-कॅप फंड लो ड्युरेशन फंड कंझर्वेटिव्ह हायब्रीड फंड चिल्ड्रन्स फंड इंडेक्स फंड
मिड-कॅप फंड शॉर्ट ड्युरेशन फंड ॲग्रेसिव्ह हायब्रीड रिटायरमेंट फंड ईटिएफ (ETF)
स्मॉल-कॅप फंड मिडीयम ड्युरेशन फंड डायनॅमिक ॲसेट अलोकेशन/ बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंड फंड ऑफ फंड
लार्ज अँड मिडकॅप फंड मिडीयम टू लॉंग ड्युरेशन फंड मल्टीॲसेट फंड
मल्टी-कॅप फंड लॉंग ड्युरेशन फंड आब्रिट्राज फंड
फ्लेक्झि-कॅप फंड ओव्हरनाईट फंड इक्विटी सेविंग फंड
फोकस्ड फंड अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड  
डिव्हिडंड इल्ड शॉर्ट टर्म फंड
व्हॅल्यू / कॉन्ट्रा लिक्विड फंड
सेक्टर/थिमॅटिक मनी मार्केट फंड
ईएलएसएस (टॅक्स सेव्हर) कॉर्पोरेट बॉण्ड फंड
डायनॅमिक बॉण्ड फंड
क्रेडिट रिस्क फंड
बँकिंग अँड पीएसयु
गिल्ट फंड
गिल्ट फंड 10 इयर ड्यूरेशन
फ्लोटर फंड

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00