भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ ने २०२१ नंतर पाकिस्तानमध्ये सहा लोकांच्या हत्या घडवून आणल्याचा दावा वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकन वृत्तपत्राने केला आहे. अमेरिका आणि कॅनडामध्ये खलिस्तानी फुटिरतावाद्यांच्या हत्या घडवून आणण्यात आल्या, त्याच पद्धतीने पाकिस्तानमधील हत्या घडवून आणल्याचा दावा वॉशिंग्टन पोस्टने केला आहे. (RAW)
गेल्या एप्रिलमध्ये, लाहोरमधील एका घरात दोन बुरखाधारी बंदुकधारी शिरले. त्यांनी ४८ वर्षीय तंबा नावाच्या व्यक्तीवर जवळून गोळ्या झाडल्या, असे एका पाकिस्तानी पोलीस अहवालात म्हटले आहे. हल्लेखोर नंतर मोटरसायकलवरून पळून गेले. तंबाचे खरे नाव आमिर सरफराज होते. २०११ मध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या भारतीय गुप्तचर एजंटला लाहोर कारागृहात मारहाण करून ठार केल्याचा आरोप सरफराजवर होता. परंतु त्यातून त्याचा निर्दोष मुक्तता झाली होती. पाकिस्तानच्या आयएसआयने त्याला तुरुंगातील हत्या करण्यासाठी नियुक्त केल्याचा रॉच्या अधिका-यांना संशय होता. तब्बल तेरा वर्षांनी त्याच्या हत्येचा अशा रितीने बदला घेण्यात आल्याचे, वृत्तांतात म्हटले आहे. अलीकडच्या काही हत्याकांडांमध्ये भारताचा थेट सहभाग असल्याचे दिसून येत असल्याचे वक्तव्य त्यानंतर पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी केले होते. (RAW)
विमान अपहऱण, पठाणकोट हल्ल्यातील संबंधितांच्या हत्या
वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तांतानुसार२०२२ मध्ये जहूर मिस्त्रीची हत्या झाली होती. १९९९ मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या विमान अपहरणावेळी जहूरने एका भारतीय प्रवाशाची हत्या केली होती. पाकिस्तानच्या एका अधिका-यांनी वॉशिंग्टन पोस्टला सांगितले की, तनाज अन्सारी नामक महिला जहूर मिस्त्रीच्या हत्येच्या कटात सामील होती.
तनाज अन्सारीने जहूर मिस्त्रीचा ठावठिकाणा शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तिने ठावठिकाणा शोधण्यासाठी दोन पाकिस्तानींना, त्याला गोळ्या घालण्यासाठी दोन अफगाणींना आणि हत्येत सहभागी लोकांना ५५०० डॉलर किंवा सुमारे ४.७ लाख रुपये पाठवण्यासाठी दक्षिण पूर्व आशिया, आफ्रिका आणि पश्चिम आशियातील अन्य तीन लोकांना कामावर ठेवले होते. ही महिला भारतीय एजंट होती आणि १९९० च्या दशकात कश्मिर मध्ये सक्रीय दहशतवादी नेता सैयद खालिद रजा याच्याही हत्येत तिचा सहभाग असल्याचा पाकिस्तानी अधिका-यांचा दावा होता.
२०१६च्या पठाणकोट हल्ल्यातील मास्टरमाइंड शाहित लतीफला ऑक्टोबर २०२३ मध्ये सियालकोट येथे घोळी घालण्यात आली होती. अज्ञात हल्लेखोरांनी गोळी घातल्याचे तेव्हा म्हटले होते.
रॉचे शिस्तबद्ध कटकारस्थान
भारत आणि पाकिस्तानने एकमेकांच्या देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी अनेक वर्षांपासून दहशतवादी गटांचा वापर केला. मात्र २०२१ पासून पाकिस्तानातील किमान सहा लोकांच्या हत्या करण्यासाठी रॉ ने एक शिस्तबद्ध कट कारस्थान राबवले, असे पाकिस्तान आणि पाश्चात्य अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे या वृत्तांतात म्हटले आहे.
भारतीय गुप्तचर संस्था रॉ च्या (RAW) अधिकाऱ्यांनी कॅनडा आणि अमेरिकेत खलिस्तानी फुटिरतावाद्यांच्या हत्या घडवून आणल्याच्या आरोपांमुळे भारताचे तेथील सरकारांशी संबंध ताणले गेले आहेत. पाकिस्तानमध्ये चाचणी स्वरुपात केलेल्या कारवायांनंतर संबंधित मोहिमेचा विस्तार म्हणून कॅनडा आणि अमेरिकेतील हत्यांकडे पाहिले जाते, असेही वृत्तांतात म्हटले आहे.
वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्र सध्या जागतिक पातळीवर सीमापार दडपशाही मोहिमांमध्ये झालेल्या वाढीचा तपास करीत आहे. अमेरिकेसह इतर पाश्चात्य सरकारे अशा घटनांना रोखण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे छळातून बचावासाठी आश्रय शोधणाऱ्यांसाठीची सुरक्षितता जागतिक स्तरावर कमी होत आहे.
भारतीय नागरिकांचा वापर नाही
वॉशिंग्टन पोस्टने पाकिस्तानमधील सहा प्रकरणांचा तपास केला, ज्यामध्ये पाकिस्तानी आणि भारतीय अधिकाऱ्यांसोबतच्या मुलाखती, दहशतवाद्यांचे सहकारी, कुटुंबीय, तसेच पाकिस्तानी तपास अधिकाऱ्यांनी गोळा केलेल्या पुराव्यांचा समावेश होता.
पाकिस्तानमध्ये या हत्या स्थानिक पाकिस्तानी गुन्हेगार किंवा भाडोत्री अफगाण मारेकऱ्यांद्वारे करण्यात आल्या. भारतीय नागरिकांचा त्यात सहभाग नसल्याचेही चौकशीत अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी रॉ ने (RAW) दुबईतील व्यापाऱ्यांचा मध्यस्थ म्हणून वापर केला. जेणेकरून स्वतःवर बालंट येणार नाही. दुबई हे प्रादेशिक व्यापारी केंद्र आहे. तसेच, RAW ने लक्ष्यांची देखरेख, हत्येची अंमलबजावणी, तसेच “हवाला” व्यवहारांसाठी स्वतंत्र टीम्सची नियुक्ती केली. असे हवाला नेटवर्क अनेक खंडांमध्ये उभारले गेले होते, असे पाकिस्तानी तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. तथापि रॉ ने (RAW) अशा घटनांमध्ये अनेकदा निष्काळजी दाखवली, तसेच कमी प्रशिक्षित लोकांचा वापर केला. अमेरिकन आणि कॅनडाच्या संस्थांनीही हे निरीक्षण नोंदवले असल्याचे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.
पाकिस्तानमधील हत्या करताना प्रामुख्याने लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या संघटना टार्गेटवर होत्या. कॅनडा आणि अमेरिकेत लक्ष्य केलेले खलिस्तानी फुटिरतावादी, हरदीप सिंग निज्जर आणि गुर्पतवंत पन्नू, यांनाही भारताने दहशतवादी म्हणून घोषित केले होते. तरीही संबंधित देशातील यंत्रणांनी त्यांच्याविरुद्धच्या भारतीय पुराव्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांचे अपयश
भारताच्या पाकिस्तानमधील मोहिमांबाबत अनेक तपशील पूर्वी उघड झाले नव्हते. पाकिस्तानमध्ये या हत्या एक संवेदनशील विषय बनल्या आहेत, कारण त्यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांच्या, तसेच गुप्त गुप्तचर यंत्रणांच्या क्षमतेबद्दलच प्रश्नचिन्ह उभे राहते. अमेरिका आणि कॅनडाचे आरोप समोर येण्याच्या आधीच, २०२२ मध्ये आयएसआयचे (ISI) चे महासंचालक नदीम अंजुम यांनी सीआयएचे (CIA) संचालक विल्यम जे. बर्न्स यांच्यासमोर भारताकडून होणा-या हत्यांचा विषय मांडला होता, असे एका माजी पाकिस्तानी अधिकाऱ्याने सांगितले.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या विषयासंदर्भात प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याचे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे. भारताने गुन्ह्यांचे पुरावे सादर करूनही पाकिस्तान आणि पाश्चात्य देशांनी दहशतवाद्यांचे प्रत्यार्पण नाकारले आहे. तसेच पाकिस्तानमधील अनेक दहशतवाद्यांचा अमेरिकेने ड्रोन हल्ल्यांतून खात्मा केला आहे, याकडे भारतीय अधिकारी लक्ष वेधतात.
भारताने २०१९ मध्ये दहशतवादविरोधी कायद्यामध्ये सुधारणा केल्यानंतर, गृह मंत्रालयाने दहशतवाद्यांची यादी प्रकाशित करायला सुरुवात केली. ही यादी वेळोवेळी अद्ययावत केली जाते. वॉशिंग्टन पोस्टच्या विश्लेषणात असे आढळून आले की, सध्याच्या यादीतील ५८ नावांपैकी ११ जणांचा २०२ नंतर मृत्यू झाल्याचा किंवा त्यांना लक्ष्य केल्याचे वॉशिंग्टन पोस्टच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचाः
mother’s remarriage: पाकिस्तानी युवकाने लावून दिले आईचे दुसरे लग्न
heavy snowfall: काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी; जनजीवन विस्कळीत
Communist Party of India : भारतीय कम्युनिस्ट पक्षाची शताब्दी