Home » Blog » Waqf Amendment bill:‘वक्फ’ संबंधी काँग्रेसची पुढील रणनीती काय?

Waqf Amendment bill:‘वक्फ’ संबंधी काँग्रेसची पुढील रणनीती काय?

जयराम रमेश यांनी स्पष्ट केली भूमिका

by प्रतिनिधी
0 comments
Waqf Amendment bill

नवी दिल्ली : ‘वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात काँग्रेसने शुक्रवारी (४ एप्रिल) भूमिका जाहीर केली. या विधेयकाला पक्षाच्यावतीने लवकरच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येईल, असे पक्षाने म्हटले आहे. (Waqf Amendment bill)

पक्षाचे सरचिटणीस आणि  प्रसिद्धी व माध्यम विभागाचे प्रभारी जयराम रमेश यांनी ही भूमिका जाहीर केली. पक्षाने भूतकाळात अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर कायदेशीर आव्हाने दिली आहेत. त्यातील कोणते मुद्दे किंवा विधेयके प्रलंबित आहेत याबद्दल माहिती दिली. तसेच संसदेने नुकत्याच मंजूर केलेल्या विधेयकालाही न्यायालयात आव्हान देण्यात येईल, असे त्यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे. (Waqf Amendment bill)

‘‘काँग्रेसने सीएए, २०१९ या कायद्याला आव्हान दिले आहे. त्याची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आरटीआय कायदा, २००५ मध्ये करण्यात आला. त्यात २०१९ मध्ये सुधारणा करण्यात आला. त्यालाही काँग्रेसने आव्हान दिले आहे. निवडणूक नियम (२०२४) मध्ये केलेल्या सुधारणांच्या वैधतेला काँग्रेसने आव्हान दिले आहे, त्याची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. धार्मिक पूजास्थळे कायदा, १९९१ च्या कायद्यासंदर्भात काँग्रेसने केलेल्या हस्तक्षेप याचिकेची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे,’’असे त्यांनी म्हटले आहे. (Waqf Amendment bill)

‘‘काँग्रेस लवकरच वक्फ (सुधारणा) विधेयक, २०२४ च्या घटनात्मकतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल,’’ असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारकडून भारतीय संविधानावर विविध मार्गाने जे हल्ले सुरू आहेत, त्या हल्ल्यांना पक्ष पूर्ण ताकदीने विरोध करेल.

अल्पसंख्याकांना त्रास देण्यासाठी विधेयक : खरगे

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, वक्फ बोर्ड (सुधारणा) विधेयक हे सरकारने अल्पसंख्याकांना त्रास देण्यासाठी आणले आहे. ‘एक्स’वर भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, ‘‘वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक अल्पसंख्याकांना त्रास देण्यासाठी आणले गेले आहे, अशी देशवासीयांची भावना आहे. रात्री उशिरा लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले तेव्हा त्याच्या बाजूने २८८ आणि विरोधात २३२ मते पडली. हे का घडले? याचा अर्थ असा की विधेयकात अनेक त्रुटी आहेत.” (Waqf Amendment bill)

ते म्हणाले, “यावरून आपण अंदाज लावू शकतो की विविध पक्षांच्या विरोधाला न जुमानता, हे विधेयक मनमानी पद्धतीने आणले गेले. हे ‘‘जिस्की लाठी, उस्की भैंस’’ – यातून कुणाचेही भले होणार नाही!’’

हेही वाचा :
वक्फ विधेयक मंजुरीनंतर नितीश कुमारांना धक्का
अत्यंत दुर्दैवी

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00