Home » Blog » Wall painting : ‘गोकुळ’ ची बोलकी भिंत

Wall painting : ‘गोकुळ’ ची बोलकी भिंत

२५ फूट उंचीच्या भिंतीवर चित्र रंगसंगती

by प्रतिनिधी
0 comments
Wall painting

कोल्हापूर :  प्रतिनिधी :  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळने पेट्रोल विक्री व्यवसायातही पदार्पण केले आहे. पेट्रोल पंपावरील २५ फूट उंचीच्या ३३०० स्क्वेअर फूट भिंतीवर गोकुळ दूध संघांकडून दूध उत्पादकांसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती चित्राद्वारे प्रदर्शित केली आहे. गोकुळचा वर्तमान बोलणारी भिंत आकर्षणाचा केंद्र बिंदू बनली आहे. (Wall painting)

करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगाव येथील  नव्याने उभारण्यात आलेला पेट्रोल पंप आणि गोकुळ डेअरी यांचे दरम्यान एक रिटेन्शन वॉल आहे. या भिंतीची उंची २५ फूट असून  क्षेत्रफळ तब्बल ३३०० स्क्वेअर फुट आहे. या भिंतीवर जाहिरात करण्यापेक्षा गोकुळच्या वर्तमानाची माहिती देणारी चित्र संगती मांडली तर तो गोकुळच्या उत्पादकाचा बहुमान ठरेल, अशी कल्पना चेअरमन अरुण डोंगळे यांना सुचली. भिंतीवर चित्रकलेतून मुक्त गोठा पद्धती, वैरण विकास, गोकुळची गोबर से समृद्धी योजना, सायलेज चा वापर, पशुखाद्य वापर, स्वच्छ दूध उत्पादन, पशुपूजक संस्कृती, कष्ट करणारे उत्पादक, दुधाची वाहतूक करणारी यंत्रणा, स्लरी पासून गोकुळ तयार करत असलेले शेतीसाठी आधुनिक खत आयुर्वेदिक उपचार पद्धती, वासरू संगोपन हे उपक्रम मांडावयाचे ठरले. पण एवढ्या मोठ्या भिंतीवर चित्ररूपी मांडणी करण्याचे आव्हान ही कठीण वाटत होते. बऱ्याच चित्रकारांनी हे नाकारले. पण कोल्हापुरातील प्रसिद्ध कलाकार विजय उपाध्ये यांनी ते आव्हान स्वीकारले. (Wall painting)

गुढीपाडव्याला पंपाचे उद्घाटन करावयाचे असल्याने, आठ दिवसात ते काम संपवावे असे नवीन आव्हान विजय उपाध्ये यांना मिळाले. दळवीज आर्ट चे प्राचार्य अजेय दळवी आणि गोकुळचे सहाय्यक महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम सुरू केले. कलानिकेतन महाविद्यालय आणि दळवीज आर्ट या दोन्ही कॉलेजमधील दहा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन, रात्रंदिवस हे काम सुरू झाले. चित्रांची निवड, त्यांची योग्य मांडणी, भिंतीचा प्रचंड आकार लक्षात घेता वापरावयाचे रंग, टिकाऊपणासाठी कराव्या लागणाऱ्या तांत्रिक बाबी या सर्व कलात्मक आणि इतर बाजू लक्षात घेऊन अत्यंत वेगाने आणि कुशलतेने हे काम सुरू झाले. गोकुळचा दूध उत्पादकाच्या लोणी या पदार्थाची गोकुळने यंदा परदेशी निर्यात केली, त्याबद्दलही सांकेतिक चित्र या भिंतीवर अवतरले. पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाच्यावेळी उपस्थित जिल्ह्यातील नेते, गोकुळचे संचालक ग्राहक, उत्पादक, वाहतूकदार,  कर्मचाऱ्यांनी भिंतीवरील कलेचे भरभरून कौतुक केले. (Wall painting)

हेही वाचा :

पाच वर्षांत राज्याचा संतुलित विकास दिसेल

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00