दुबई : भारतीय संघामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या निवृत्तीविषयीची चर्चा नसल्याचे स्पष्टीकरण भारताचा उपकर्णधार शुभमन गिलने सामन्याच्या पूर्वसंध्येला दिले. सध्या संघाचे लक्ष केवळ चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना जिंकण्यावर केंद्रित असल्याचे शुभमन म्हणाला. (Virat, Rohit)
चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी भारत आणि न्यूझीलंडमध्ये रंगणार आहे. या सामन्यापूर्वी गिलने शनिवारी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. क्रिकेटव्यतिरिक्त अन्य कोणत्याही गोष्टीची सध्या संघामध्ये चर्चा होत नसून केवळ अंतिम सामन्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. मी स्वत: कारकिर्दीमध्ये दुसऱ्यांदा आयसीसीचा मर्यादित षटकांच्या स्पर्धेचा अंतिम सामना खेळत आहे. यावेळी, २०२३ च्या वर्ल्ड कपपेक्षा एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्धार आम्ही केला आहे, असेही शुभमनने सांगितले. (Virat, Rohit)
या संपूर्ण स्पर्धेमध्ये भारताच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. मी आजवर ज्या संघांचा भाग होतो, त्यामध्ये ही सर्वोत्तम फलंदाजांची फळी आहे. विराह कोहली, रोहित शर्मा यांसारखे महान फलंदाज आमच्या संघात आहेत. त्याचप्रमाणे, श्रयस अय्यर, लोकेश राहुल, हार्दिक पंड्या यांच्यामुळे आमची फलंदाजी खूप खालपर्यंत आहे, असे शुभमन म्हणाला. दुबईमध्ये हवामान उष्ण असले, तरी खेळपट्टीचा पृष्ठभाग तसाच राहील, खेळपट्टी रंग बदलणार नाही, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे, आम्ही संपूर्ण स्पर्धेमध्ये जसा खेळ केला, तसाच खेळ आम्ही अंतिम सामन्यातही करू, असे शुभमनने नमूद केले. (Virat, Rohit) कर्णधार रोहितच्या डोक्यातही सध्या केवळ अंतिम सामन्याचाच विचार असावा. त्यामुळे, खेळाडूंच्या निवृत्तीविषयी संघामध्ये काहीच चर्चा झाली नाही, असे स्पष्टीकरणही गिलने दिले. (Virat, Rohit)
हेही वाचा :