नवी दिल्ली : दिल्ली विरुध्द रेल्वे यांच्यातील रणजी सामन्यात भारताचा सुपरस्टार विराट कोहली फ्लॉप ठरला. अवघ्या सहा धावांवर रेल्वेच्या हिमांशू सागवानने त्याचा त्रिफळा उडवला. विराटचा खेळ पाहण्यासाठी दिल्लीकरांनी मोठी गर्दी केल्याने मैदान तुडूंब भरले होते. विराट बाद होताच निराश क्रिकेटशौकिन माघारी परतले. त्यामुळे मैदान ओस पडले. (Virat flop)
दिल्लीचा यश धुल बाद होताच विराट कोहली मैदानावर उतरला. क्रिकेट शौकिनांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले. विराटने कव्हर्स बॉल टोलवत एक धाव घेतली. त्यानंतर हिमांशू सांगवान गोलंदाजीस आला. विराटने क्रिझच्या बाहेर जाऊन सांगवानला चौकार ठोकत त्याचे स्वागत केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर विराट चकला. सांगवानचा चेंडू बॅट ऑणि पॅडमधून स्टंपवर आदळला. विराट क्लिन बोल्ड झाल्यावर उपस्थित क्रिकेटशौकिनांना धक्का बसला. संपूर्ण मैदानावर शांतता पसरली होती. निराश होऊन कोहली पॅव्हिलियनकडे परतला. त्याने १५ चेंडूत सहा धावा जमवल्या. विराट बाद झाल्यावर प्रेक्षकांनी मैदान सोडणे पसंत केले. (Virat flop)
प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या रेल्वेने पहिल्या डावात २४१ धावा केल्या आहेत. रेल्वेच्या पहिल्या डावातील धावांचा पाठलाग करताना दिवसअखेर दिल्लीने दुसऱ्या दिवसाअखेर पाच बाद २७२ धावा जमवत रेल्वेवर पहिल्या डावात आघाडी घेतली आहे. सलामीचा अपरित दहा धावांवर तर सनत ३० धावांवर बाद झाला. यश धुल ३२ धावांवर बाद झाल्यावर विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होता. पण विराट कोहली अवघ्या सहा धावांवर बाद झाला. सुंदर फलंदाजीचे प्रदर्शन करणाऱ्या बदोनीचे शतक एक धावेने हुकले. त्याला करनने ९९ धावांवर बाद केले. एस माथूरने अर्ध शतक झळकावले. दिवसअखेर तो ५७ धावांवर खेळत आहे. त्याचा सहकारी राजवंशी २८ धावांवर खेळत आहे. (Virat flop)
कोण हा हिमांशू सागवान?
नजफगडमध्ये जन्मलेला हिमांशु सागवान उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करतो. २०१९ मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये लिस्ट ए मध्ये पदार्पण केले. त्यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी टेंव्टी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. रणजी ट्रॉफीमध्ये आपली कारकीर्द सुरू होण्यापूर्वी सांगवानने दिल्ली रेल्वे स्टेशनवर तिकीट कलेक्टर म्हणून काम केले आहे. एमआरएफ पेस फाउंडेशनमध्ये ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रॅथच्या हाताखाली प्रशिक्षण घेतले आहे. वानखडे स्टेडियमवर मुंबई विरुध्द झालेल्या सामन्यात रेल्वेकडून त्याने सहा गडी बाद करत उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे यांना बाद केले होते. रेल्वेने या सामन्यात ४१ वेळा रणजी विजेत्या मुंबईचा दहा गडांनी पराभव केला.
हेही वाचा :
अफगाणिस्तान महिला संघ क्रिकेटच्या मैदानावर