Home » Blog » Trump’s declaration : अमेरिकेतील साडेसात लाख भारतीयांवर कुऱ्हाड

Trump’s declaration : अमेरिकेतील साडेसात लाख भारतीयांवर कुऱ्हाड

अमेरिकेतील घुसखोऱ्यांना हाकलण्याची ट्रम्प यांची घोषणा

by प्रतिनिधी
0 comments
trumps-declaration

महाराष्ट्र दिनमान डेस्क : अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी शपथविधी घेतल्यानंतर अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्यांना बाहेर काढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अमेरिकेत अवैधरित्या राहत असलेल्या साडेसात लाख भारतीयांवर कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यांना घरवापसी करावी लागणार आहे. अमेरिकेत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या देशांमध्ये ही तिसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आहे. (Trump’s declaration)

नव्याने प्रसिद्ध झालेल्या प्यू रिसर्च सेंटरनुसार २०२१ पर्यंत अमेरिकेत एक कोटी पाच लाख लोक अनधिकृत प्रवासी असल्याची नोंद आहे. त्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या भारतीयांची आहे. त्यामुळे अमेरिकेत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या भारतीयांच्या पोटात गोळा आला आहे. सर्वांत जास्त ४१ लाख मेक्सिकन अवैध प्रवासी आहेत. त्या खालोखाल आठ लाख अल साल्वाडोर देशातील आहेत. सव्वासात लाख भारतीय तर ग्वाटेमाला देशातील सात लाख नागरिक आहेत. (Trump’s declaration)

अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणूक प्रचारावेळी अवैधरित्या अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्याचा प्रमुख मुद्दा होता. राष्ट्रपतीपदाची शपथ घेताच अमेरिका सिनेटने अवैध प्रवाशी संबंधित विधेयक मंजूर केले. हे विधेयक ६४-३५ मतांनी मंजूर झाले. या विधेयकाला ‘लैकेन रिले अक्ट’ असे नाव दिले आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियात १९ लाख, फ्लोरिडात नऊ लाख, न्यूयॉर्कमध्ये सहा लाख, न्यू जर्सीत साडेचार लाख तर इलिनोइसमध्ये चार लाख अवैध प्रवासी रहात आहेत. रिपोर्टनुसार सर्वात जास्त प्रवासी मेक्सिको आणि अल साल्वादोरमधून येतात. २०२१ पर्यंत ४१ लाख व्यक्तींनी अमेरिकेत प्रवेश केला आहे. (Trump’s declaration)

साडेसहा लाख लोक गुन्हेगार

अमेरिकेत मध्य अमेरिका, कॅरेबियन, देश दक्षिण अमेरिकेतील देश, आशिया, युरोप आणि अफ्रिका खंडातील नागरिक अवैधरित्या राहत आहेत. अमेरिकेत अवैधरित्या प्रवाशांचे सर्वेक्षण करणाऱ्या सरकारी संस्थेने १५ लाख व्यक्तींची यादी तयार बनवली आहे. त्यात ज्यांच्याकडे कागदपत्रे नाहीत त्यांना सर्वप्रथम अमेरिकेतून बाहेर घालवले जाणार आहे. अमेरिकत अवैधरित्या राहणाऱ्या सहा लाख ५५ हजार व्यक्तींवर अपराधाचा गुन्हा सिद्ध झाला आहे. त्यांच्यावर सर्वप्रथम लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. त्यानंतर १४ लाख व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यावर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना देश सोडण्यास भाग पाडले जाणार आहे. सध्या ४० हजार अवैधरित्या रहात असणाऱ्या व्यक्ती आहेत. त्यांना देशाबाहेर घालवण्यासाठी १५० विमान उड्डाणांची आवश्यकता आहे. त्यानंतर यापूर्वीच देश सोडण्यास सांगितले आहे त्यांच्यासाठी पाच हजार हवाई उड्डाणांची आवश्यकता भासणार आहे. (Trump’s declaration)

‘डंकी रूट’ने अवैध प्रवेश

अमेरिकेत अवैधरित्या जाण्यासाठी तस्करांनी ‘डंकी रुट’ बनवले आहेत. भारतातून अमेरिकेत अवैधरित्या जाण्यासाठी एजंटांकडून विमान आणि जमिनीवरुन अमेरिका, कॅनडा आणि युरोपियन देशातून पाठवले जाते. अमेरिकेत समुद्रमार्गेही घुसखोरी केली जाते. त्यामध्ये ८,५६५ प्रवाशांच्या मृत्यू झाला आहे. भारतातील ट्रॅव्हल एजंट अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्यांना दिल्लीतून सर्बियाला विमानाने पाठवतात. बेलग्रेडला उतरतात. तिथून हंगेरी, ऑस्ट्रिया, इटली, स्वित्झर्लंड जर्मनीत जातात. त्यानंतर पनामा जंगल पार करुन ते ग्वाटेमाला देशात मुक्काम ठोकतात. अमेरिकेत मानवी तस्करी करणारा ग्वाटेमाला हा मोठा अड्डा आहे. तिथल्या एजंटांकडे भारतीय एजंट अवैध प्रवाशांना सोपवतात. ते त्यांना मेक्सिकोच्या सीमेवर पोचवतात. त्यानंतर एजंट अमेरिका आणि कॅनडात अवैधरित्या घुसखोरी करुन प्रवाशांना तिथे सोडतात. मेक्सिको सीमेवर अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्या अनेक भारतीय प्रवाशांना अमेरेकी सीमा शुल्क आणि सीमा सुरक्षा संस्थांनी पकडले आहे. ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ पर्यंत ९६ हजार ९१७ भारतींयाना पकडले आहे. त्यात कॅनडातून सीमा पार करताना ३० हजार १० तर मेक्सिको सीमेवर ४१ हजार ७७ सीमेवर पडकले आहेत. यूएससीबीपीनुसार २०१९ ते २०२३ मध्ये अवैधरित्या अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या एक लाख ४९ हजार भारतीयांना ताब्यात घेतले आहे. त्यात सर्वांत जास्त गुजरात आणि पंजाबमधील लोक आहेत. परदेशात एखादी व्यक्ती फसली असेल अथवा अडचणीत आली असेल तर परराष्ट्र मंत्रालयाच्या madad@gpv.in या संकेतस्थळावर तक्रार करता येते. पण त्यासाठी संबंधित व्यक्तीला मोबाईल नंबर, ईमेल आयडी याची माहिती द्यावी लागते. (Trump’s declaration)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00