वॉशिंग्टन : अमेरिकेच्या टेरिफ धोरणाविरुध्द चीनने प्रत्युत्तर देत अमेरिकन उत्पादनावर ३४ टक्के टॅरिफची घोषणा केली आहे. चीनने अमेरिकन उत्पादनावर लावलेली ३४ टक्के करवाढ मागे घेतली नाही तर अमेरिका चीनवर ५० टक्के टॅरिफ लावेल, अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. चीनला उद्या मंगळवारी ८ एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. जर चीनने टॅरिफ मागे घेतले नाही तर ९ एप्रिलपासून चीनवर ५० टक्के टॅरिफ लावेल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. (Trump warns China)
जर चीनने अमेरिकेवर प्रत्युत्तरात्मक शुल्क रद्द केले नाही तर ५० टक्के कर लावण्याची धमकी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, चीनने आधीच विक्रमी टॅरिफ लावले आहेत. कंपन्यांचे बेकायदेशीर अनुदान आणि मोठ्या प्रमाणात दीर्घकालीन चलन हत्याळणी व्यतिरिक्त चीनने ३४ टक्के प्रत्युत्तरात्मक टॅरिफ जारी केले आहेत. त्यांनी इशारा दिला आहे की जो देश आपल्या राष्ट्राच्या आधीच अस्तित्वात असलेल्या दीर्घकालीन टॅरिफ गैरवापरापेक्षा जास्त अतिरिक्त टॅरिफ जारी करुन अमेरिकेविरुद्ध बदला घेईल, त्याला सुरवातीला निश्चित केलेल्या टॅरिफपेक्षा जास्त टॅरिफ लावले जाईल. (Trump warns China)
दरम्यान गेल्या आठवड्यात जाहीर केलेले टॅरिफ कमी करण्यासाठी ५० हून अधिक देशांनी ट्रम्प यांच्याशी संपर्क साधला आहे. टॅरिफमुळे जागतिक गोंधळ उडाला असून बाजारात अस्थिरता आली असतानाही आपले व्यापार धोरण बदलणार नाहीत यावर ट्रम्प ठाम आहेत. (Trump warns China)
हेही वाचा :