वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताच्या आयात शुल्काचा मुद्दा उपस्थित केला. अमेरिकन उत्पादनांवर कर लादणाऱ्या देशांवर परस्पर कर २ एप्रिलपासून लागू होतील, या पुनरूच्चार त्यांनी केला. २ एप्रिलला निर्णय होईल, परस्पर कर लागू होतील, मग भारत असो वा चीन, किंवा कोणताही देश असो. त्यांच्यावर कर लादणारच असे सांगून त्यांनी भारत हा खूप जास्त कर आकारणारा देश आहे, असल्याचा दावा केला.(Trump Tariff)
गुरुवारी (७ मार्च) ओव्हल ऑफिसमधून कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करताना ट्रम्प यांनी कॅनडाकडून लादण्यात येत असलेल्या शुल्काबद्दल चर्चा केली. विशेषतः अमेरिकेत मुबलक लाकूड संसाधने असूनही, अमेरिकन दुग्धजन्य उत्पादनांवर २५० टक्के शुल्क आणि लाकडावर लक्षणीय कर लादण्यात आल्याचे ते म्हणाले.
ट्रम्प यांनी सूचित केले की सध्याचे कर ‘तात्पुरते’ आणि ‘किरकोळ’ असले तरी, २ एप्रिलपासून सुरू होणारे प्राथमिक परस्पर शुल्क देशाच्या व्यापार संबंधांवर लक्षणीय परिणाम करतील.(Trump Tariff)
ते म्हणाले, ‘‘ते आपल्यावर जो कर आकारतात ते लक्षात घेता जगातील प्रत्येक देशाने आपल्याला फसवले आहे, असे लक्षात आले आहे. ते आपल्याकडून १५०-२००% कर आकारतात आणि आम्ही त्यांच्याकडून काहीही आकारत नाही. म्हणून जे कोणी आमच्याकडून कर घेतात त्यांच्यावरही आम्ही कर आकारणार आहोत. त्यांची सुटका अशक्य आहे. म्हणूनच आम्ही २ एप्रिलची आतुरतेने वाट पाहत आहोत. मी बऱ्याच काळापासून त्या तारखेची वाट पाहत आहे. त्या दिवशी मोठी घोषणा करण्यात येईल.’’ (Trump Tariff)
अलिकडच्या काळात भारतावर कर लादण्यासंबंधात ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा भाष्य केले आहे. मंगळवारी त्यांनी काँग्रेससमोर केलेल्या भाषणात, त्यांनी विविध देशांकडून अमेरिकेवर अन्यायी उच्च कर लावण्यात येत असल्याची टीका केली होती. व्हाईट हाऊसमधील त्यांचा दुसरा कार्यकाळ सुरू झाल्यानंतर त्यांचे हे पहिलेच भाषण होते. (Trump Tariff)
युरोपियन युनियन, चीन, ब्राझील, भारत, मेक्सिको आणि कॅनडाकडून आकारण्यात येणारा कर अमेरिकन शुल्काच्या तुलनेत जास्त आहे, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. त्यातही भारतातील ऑटोमोटिव्ह कर १००% पेक्षा जास्त असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, वाणिज्य मंत्री पियुष गोयल सध्या वॉशिंग्टनमध्ये आहेत. ते अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक यांच्यासोबत व्यापारसंबंधात चर्चा करत आहेत.
हेही वाचा :
भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत हत्या
भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत हत्या