वॉशिंग्टन : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सकारात्मक चर्चा होईल. खनिज करारावर स्वाक्षरी होईल, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना वाटत होते. मात्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांचे उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स यांनी अमेरिकेने अनेक वर्षे युक्रेनला पाठिंबा दिला आहे. त्याबद्दल कृतज्ञता दाखवावी अशी मागणी केल्यानंतर, वोलोदिमीर झेलेन्स्की यांना जागतिक माध्यमांसमोर विलक्षण परिस्थितीचा सामना करावा लागला. ट्रम्प यांच्याकडून मानहानी करून घ्यावी लागली. ‘तुमच्याकडे सध्या कार्ड नाहीत…’’ ‘‘तुम्ही लाखो जीवांशी जुगार खेळत आहात,’’ असे ऐकून घ्यावे लागले. आम्ही तुम्हाला – त्या मूर्ख अध्यक्षाच्या (बायडेन)माध्यमातून ३५० अब्ज डॉलर्स दिले,’’ असे ट्रम्प म्हणाले.(Trump criticised Zelenskyy)
त्यामुळे संयुक्त पत्रकार परिषद न घेताच झेलेन्स्की यांना अखेरीस व्हाईट हाऊस सोडावे लागले. त्यामुळे गेले आठवडाभर युक्रेन आणि अमेरिकेदरम्यान ज्या करारावर सही होणार होती त्या खनिज करारावर स्वाक्षरी झालीच नाही. त्यानंतर, ‘‘जेव्हा तुम्ही शांततेसाठी तयार असाल तेव्हा परत या,’’ अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी झेलेन्स्की निघून गेल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट केली. (Trump criticised Zelenskyy)
व्लादिमीर पुतिन यांच्याशी युद्धविराम मान्य करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम केले पाहिजेत, या अमेरिकेच्या सूचनांकडे झेलेन्स्की यांनी दुर्लक्ष केले. त्यावर ते अमेरिकेचा ‘अनादर’ करत आहेत, अशी प्रतिक्रियाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
झेलेन्स्की आणि व्हॅन्स यांच्यात खडाजंगी
सुरुवातीला अर्धा तास सौहार्दपूर्ण आणि औपचारिकता चर्चा सुरू होती. मात्र व्हॅन्स यांनी, ‘‘शांततेचा आणि समृद्धीचा मार्ग मुत्सद्देगिरीतूनच जातो, अध्यक्ष ट्रम्प हेच करत आहेत,’’ असे म्हणताच ओव्हल ऑफिसमध्ये तणाव वाढू लागला.
मात्र २०१९ पासून रशियाच्या आक्रमकतेचा संदर्भ देत झेलेन्स्की यांनी मध्येच हस्तक्षेप केला. रशिया आक्रमक झालेला असताना त्याला कोणीही रोखले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. विशेषत: त्यांचा रोख रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याकडे होता. (Trump criticised Zelenskyy)
‘‘कसली मुत्सद्देगिरी, जेडी, तुम्ही बोलताय काय? तुम्हाला काय म्हणायचे आहे?,’’ अशी विचारणाही त्यांनी केली.
त्यावर उत्तर देताना ‘‘तुमचा देश विनाशापासून वाचेल…,’’ असे उत्तर व्हॅन्स यांनी देताच वातावरण तणावपूर्ण बनले.
तसेच अमेरिकन मीडियासमोर झेलेन्स्की यांनी अनादर केल्याचा आरोप व्हॅन्स यांनी त्यांच्यावर केला.
ट्रम्प यांना रशिया-युक्रेनदरम्यानचे युद्ध संपवायचे आहे. पुतीन यांच्याशी चर्चेचे दार खुले करून आणि प्रसंगी दबाव टाकून युद्धविराम करावा, अशी ट्रम्प यांची भूमिका आहे. तोच मुद्दा रेटण्याचा व्हॅन्स यांचा उद्देश होता. मात्र या चर्चेवेळी झेलेन्स्की यांच्याबरोबरच तणाव वाढला.
आम्हाला काय वाटेल ते सांगू नका
व्हॅन्स यांनी झेलेन्स्की यांना लष्करी आणि भरतीत येऊ शकणाऱ्या समस्यांबद्दल आव्हान दिले. त्यावर झेलेन्स्की यांनी,‘‘युद्धादरम्यान, प्रत्येकाला समस्यांचा सामना करावा लागतो, अगदी तुम्हालाही. परंतु तुमच्याकडे एक छान समुद्र आहे आणि आता [ते] जाणवत नाही, परंतु भविष्यात तुम्हाला ते जाणवेल,’’ अशी टिपणी केली.
त्या टिप्पणीवर ट्रम्प संतापले. त्यांनी हस्तक्षेप केला आणि हा मुद्दा झेलेन्स्की आणि व्हॅन्स यांच्यापुरता मर्यादित होता, असे सुनावले.
ज्यांनी युद्ध सुरू केले त्या आक्रमकाशी वागण्याचा नैतिक धोका समजण्यात ट्रम्प अयशस्वी ठरले आहेत, असे झेलेन्स्की यांना यावेळी सुचवायचे होते.
रशियाशी व्यवहार करताना ट्रम्प यांची मूलभूत चुकीची धारणा आहे, असा झेलेन्स्की यांनी दिलेला संदेश तज्ज्ञांच्या मनाला चांगलाच भिडला. ट्रम्प मॉस्कोशी असलेले तटस्थ धोरण संपवून आणि त्वरीत युद्धविराम करून पुतिन यांना प्रोत्साहन देण्याचे ट्रम्प यांचे धोरण आहे. त्यातून युरोपला कमकुवत करण्याचे आणि युक्रेनला संपवण्याचा धोका पत्करल्याचे दिसते, असे समीक्षकांचे म्हणणे आहे. (Trump criticised Zelenskyy)
या युद्धाची जबाबदारी किंवा दोष दोघांनीही (रशिया-युक्रेन) घ्यावा, असे ट्रम्पना सुचवावेसे वाटत असावे, परंतु झेलेन्स्की ट्रम्प यांच्या या भूमिकेच्या विपरीत परिणामांबद्दल इशारा देण्याचा प्रयत्न करीत होते. तेही थेट ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प यांच्यासोबत बसून. ‘रशियाला शांत करा, अन्यथा युद्ध तुमच्यावर येईल,’ असे झेलेन्स्की यांनी सुनावले.
त्यावर ट्रम्प भडकले…‘‘आम्हाला काय वाटेल ते सांगू नका. तुम्ही ते सांगण्याच्या स्थितीत नाही आहात…,’’
‘‘तुमच्याकडे सध्या कार्ड नाहीत…’’ ‘‘तुम्ही लाखो जीवांशी जुगार खेळत आहात,’’ असे ट्रम्प यांनीही सुनावले. यावेळी त्यांचा आवाज बराच वाढला होता.
ज्यांना ट्रम्प यांच्याविरोधातही कुणीतरी उभे आहे, असे वाटते त्यांच्याकडून झेलेन्स्कींची प्रशंसा होऊ शकते; त्याचवेळी हा क्षण युरोपमधील युद्ध आणि शांततेचा काळही ठरवू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. (Trump criticised Zelenskyy)
‘तुम्ही एकटे नव्हता’: ट्रम्प
चर्चेच्या एका टप्प्यावर झेलेन्स्की म्हणाले, ‘‘युद्धाच्या सुरुवातीपासूनच, आम्ही एकटे आहोत आणि त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.’’
यामुळे ट्रम्प संतापले…
‘‘तुम्ही एकटे नाही आहात,’’ ‘‘तुम्ही एकटे नाही आहात. आम्ही तुम्हाला – या मूर्ख अध्यक्षाच्या माध्यमातून ३५० अब्ज डॉलर्स दिले,’’ असे ट्रम्प म्हणाले. त्यांचा रोख अर्थातच बायडेन यांच्याकडे होता. (Trump criticised Zelenskyy)
झेलेन्स्की यांनी गेल्यावर्षी अमेरिकन निवडणुकीदरम्यान दिलेल्या भेटीवेळी अमेरिकेचे आभार मानले होते. निवडणुकीदरम्यान ‘विरोधकांसाठी-’ (डेमोक्रॅट) प्रचार केल्याचा आरोप यावेळी व्हॅन्स यांनी केला.
त्यावर ‘‘कृपया, तुम्हाला वाटते की तुम्ही युद्धाबद्दल खूप मोठ्याने बोलाल तर…,’’ झेलेन्स्की भूमिका मांडू लागले, पण ट्रम्प यांनी त्यांचे बोलणे मध्येच थांबवत ‘‘ ते मोठ्याने बोलत नाहीत, तुमचा देश मोठ्या संकटात सापडला आहे. तुम्ही ते जिंकत नाही आहात, आमच्यामुळे तुम्हाला या संकटातून बाहेर पडण्याची चांगली संधी आहे,’’ अशा शब्दांत संताप व्यक्त केला. (Trump criticised Zelenskyy)
“अशी भूमिका घेणे योग्य नाही. तशाने पुढे जाणे अशक्य आहे. तुम्हाला भूमिका बदलावी लागेल,’’ अशा शब्दांत ट्रम्प आणि व्हॅन्स यांनी झेलेन्स्कींना फटकारले.
‘‘तुम्ही फक्त थँक्स म्हणा,’’ व्हॅन्स यांनी एका क्षणी मागणी केली. मात्र झेलेन्स्की त्या क्षणी ठाम असल्याचे दिसून आले.
अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यासोबतच्या चर्चेवर जगभरातील नेत्यांनी उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
हेही वाचा :
महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी लाजा गुंडाळून ठेवल्या आहेत का?
मुलीचा मृत्यूशी, पालकांचा व्हिसासाठी संघर्षः सुप्रिया सुळे धावल्या मदतीला
. . . .