Home » Blog » Three policemen of Ispurli suspended : आषाढी यात्रेसाठी पैसे उकळणारे तीन पोलिस निलंबित

Three policemen of Ispurli suspended : आषाढी यात्रेसाठी पैसे उकळणारे तीन पोलिस निलंबित

by प्रतिनिधी
0 comments
Three policemen of Ispurli suspended

कोल्हापूर : प्रतिनिधी : आषाढी यात्रेसाठी व्यावसायिकांकडून पैसे उकळणाऱ्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षकांनी निलंबित केले. सहाय्यक पोलिस फौजदार अजितकुमार देसाई, हवालदार कृष्णा यादव, कॉन्स्टेबल पंकज बारड असे निलंबित केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यांची खातेनिहाय चौकशीचे आदेश पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी  दिले आहेत. (Three policemen of Ispurli suspended)

करवीर तालुक्यातील इस्पुर्ली पोलिस ठाण्यातील काही पोलिसांनी सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यांकडून आषाढी यात्रेसाठी पैसे उकळले होते. त्यात एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा समावेश होता. संबधित निवृत्त अधिकाऱ्यांकडून ऑनलाइन पैसे उकळण्यात आले. ऑनलाईनवरील स्क्रीन शॉट सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने त्याची गंभीर दखल पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी घेतली. करवीर पोलिस उप अधीक्षक क्षीरसागर यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी सोमवारी स्वत: खातरजमा केली. चौकशीत तिघेही पोलिस कर्मचारी दोषी आढळल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. (Three policemen of Ispurli suspended)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00