Home » Blog » नागपूरमध्ये महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न

नागपूरमध्ये महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न

मंत्रीमंडळात चेहऱ्यांना संधी

by प्रतिनिधी
0 comments
Maharashtra Cabinet Expansion

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नागपूरच्या राजभवन परिसरात संपन्न झाला. आज (दि.१५) महायुतीच्या ३३ कॅबिनेट आणि ६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये भाजप-१९, शिवसेना-११ आणि राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचा समावेश आहे. त्यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. महायुतीने मंत्रीमंडळात  चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. (Maharashtra Cabinet Expansion)

शपथ घेतलेले मंत्री असे

चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गुलाब पाटील, गणेश नाईक, दादा भुसे, संजय राठोड, धनंजय मुंडे, मंगल प्रभात लोढा, उदय सामंत, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, डॉ. अशोक उईके, शंभूराज देसाई, आशिष शेलार, दत्तात्रेय भरणे, आदिती तटकरे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे, नरहरी झिरवळ, संजय सावकारे, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, मकरंद जाधव-पाटील, नितेश राणे, आकाश फुंडकर, बाबासाहेब पाटील, प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ, आशिष जयस्वाल, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर, इंद्रनील नाईक, योगेश कदम. (Maharashtra Cabinet Expansion)

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00