Home » Blog » अदानी आणि काँग्रेसचे नाते जुनेच : विनोद तावडे

अदानी आणि काँग्रेसचे नाते जुनेच : विनोद तावडे

अदानीसोबतचे फोटो दाखवले

by प्रतिनिधी
0 comments
Vinod Tawde twitter

मुंबई : प्रतिनिधी :  उद्योगपती गौतम अदानी यांचा उदय खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकारच्या काळातच झाला आहे. काँग्रेस आणि अदानी यांचे नाते जुने आहे, तरीही आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी यांच्यासोबतचा फोटो दाखवत संबंध जोडण्याचा प्रयत्न केला; मात्र अदानी यांचे असेच फोटो रॉबर्ट वधेरा यांच्यासह काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिलेले अशोक गेहलोत, भुपेंद्र हुड्डा तसेच शशी थरूरांसारख्या अनेक काँग्रेस नेत्यांसोबतही आहेत. हे फोटो राहुल गांधी यांना दिसले नाहीत का? , असा प्रश्न भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केला.

महाराष्ट्रातील जनता ही वास्तविकतेवर चर्चा करणारी आहे. फेक गोष्टींवर मराठीजन विश्वास ठेवत नाहीत. फोटो झळकविण्याच्या या प्रकारामुळे ‘एक है तो सेफ है आणि राहुल गांधी फेक है’, हे सिद्ध झाल्याचा दावा तावडे यांनी केला. तसेच या वेळी अदानी यांचे काँग्रेस नेत्यांसोबतचे फोटोही तावडे यांनी दाखवले. धारावी पुनर्विका प्रकल्पातील जमीन राज्य सरकारकडेच राहणार आहे. अदानीला ही जमीन जाणार नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच ही टेंडर प्रक्रिया झालेली आहे. तेंव्हाच्या निविदा प्रक्रियेत अदानी आणि अबुधाबी येथील एका शेखच्या सेकलिंक कंपनीने निविदा भरल्या होत्या. त्या शेखला कंत्राट मिळाले नाही. याचे दु:ख राहुल यांना झाल्याचे म्हणायचे का? असा प्रश्न त्यांनी केला.

धारावीत राहणाऱ्या सर्वांना घरे मिळणार आहेत. पहिल्या मजल्यावरील लोकांचेही पुनर्वसन केले जाणार आहे. स्थानिकांना पाचशे चौरसफुटापर्यंतची घरे तसेच उद्योगांसाठीही जागा दिली जात आहे. या प्रकल्पात कोणती गोष्ट झोपडीधारकांच्या विरोधात आहे, हे राहुल सांगू शकले नाही. उलट, धारावीकरांनी झोपडपट्टीतच राहावे, अशी त्यांची इच्छा आहे का, असा प्रश्न तावडे यांनी केला.

महाराष्ट्रातील उद्योग बाहेर गेल्याचा राहुल यांचा दावा तावडे यांनी फेटाळून लावला. एअर बस, फॉक्सकॉन असे उद्योग हे महाविकास आघाडीच्या काळातच अन्य राज्यात गेले. महायुतीच्या काळात एकही प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेलेला नाही. यासंदर्भात राहुल यांनी जाहीत चर्चेला यावे, असे आव्हानही त्यांनी यांनी दिले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00