Home » Blog » Tariff effects:  भारतातील टेक्स्टाईल, जेम्स ॲण्ड ज्वेलरी उद्योगांना फटका

Tariff effects:  भारतातील टेक्स्टाईल, जेम्स ॲण्ड ज्वेलरी उद्योगांना फटका

निर्यातदारांना करावा लागणार भविष्यातील आव्हानांचा सामना

by प्रतिनिधी
0 comments
Tariff effects

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुचर्चित करधोरण जाहीर केले. ट्रम्प त्याला अमेरिकेच्या दृष्टीने ‘मुक्ती दिन’ असे म्हणतात. या करधोरणाचा सर्वाधिक सर्वाधिक फटका भारतातील टेक्स्टाईल, अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, तसेच जेम्स (मौल्यवान रत्ने) आणि ज्वेलरी (दागिने)  क्षेत्रातील ल निर्यातदारांना बसण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.(Tariff effects)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय आयातीवर २६ टक्के कर लादण्याची घोषणा केली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, गुरुवारी सकाळी जाहीर झालेल्या या निर्णयात ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर परस्पर कर लादण्याची घोषणा केली. (Tariff effects)

बँकिंग आणि आंतरराष्ट्रीय स्टॉक तज्ज्ञ अजय बग्गा यांनी सांगितले की हे शुल्क अतिरंजित गणनेवर आधारित आहेत. त्यामध्ये प्रत्यक्ष सीमाशुल्क, कथित चलन फेरफार आणि जीएसटी यांचा समावेश आहे. अमेरिकेच्या व्यापार धोरणातील हे बदल ‘अमेरिका फर्स्ट’ वरून ‘अमेरिका अलोन’ कडे होत असल्याचे ते म्हणाले.

ते म्हणाले, ‘‘भारतीय कापड, अभियांत्रिकी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स आणि रत्ने आणि दागिने निर्यातदारांना या धोरणाचा लगेचच फटका बसतो. तेल आणि धातूंची विक्री होत आहे. मात्र फार्मा कंपन्यांवर क्षेत्रीय दर आकारले जाणार असल्याने औषध कंपन्या ‘वेट ॲण्ड वॉच’च्या स्थितीत आहेत.”

भारतातील देशांतर्गत क्षेत्रांवर या करधोरणाचा तत्काळ परिणाम जाणवणार नाही, परंतु वाढत्या खर्चाचा फटका निर्यातदारांना सहन करावा लागेल, याकडे बग्गा यांनी लक्ष वेधले. (Tariff effects)

अचानक लागू केलेल्या करांमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर विविधांगी परिणाम होण्याची शक्यता आहे. जास्त करांमुळे भारतीय निर्यातीत घट होऊ शकते आणि निर्यातदारांचा नफा कमी होऊ शकतो.

याव्यतिरिक्त, गुंतवणूकदार सोने, जपानी येन, स्विस फ्रँक आणि जपानी सरकारी बाँडसारख्या सुरक्षित मालमत्तेकडे निधी वळवण्याची शक्यता आहे. परिणामी उदयोन्मुख बाजारातील पोर्टफोलिओवरही परिणाम होऊ शकतो. (Tariff effect)

बग्गा यांनी अधोरेखित केले की, या करधोरणाचा परिणाम शेअर बाजारावरही झाला. सुरुवातीला धोकादायक ॲसेची विक्री करताना सुरक्षित गुंतवणुकीच्या क्षेत्राकडे धाव घेण्याचा बाजारात कल दिसून आला. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार असल्याने त्याचा परिणाम बाजारावरही पडू शकतो, असा इशारा त्यांनी दिला.

नवीन करधोरणामुळे भारतीय निर्यातदारांसमोर एक मोठे आव्हान असू शकते. त्यांना वाढता खर्च आणि अमेरिकन बाजारपेठेत कमी झालेल्या स्पर्धात्मकतेचा सामना करावा लागत आहे. पुढील आर्थिक परिणामही होण्याची शक्यता असल्याने उद्योगांमधील भागधारकही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असतील.

हेही वाचा :
 मोदी मित्र, तरीही भारतावर २६ टक्के कर  

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00