Home » Blog » ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड

ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड

पुण्यातील साहित्य परिषदेकडून घोषणा

by प्रतिनिधी
0 comments

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  यंदा दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक,  ज्येष्ठ  साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य परिषदेच्यावतीने पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्राध्यापक उषा तांबे यांनी ही घोषणा केली आहे.

डॉ. तारा भवाळकर यांचा परिचय

डॉ. तारा भवाळकर यांचा जन्म १ एप्रिल १९३९ मध्ये झाला. वैचारिक लेखन करणाऱ्या एक मराठी लेखिका म्हणून त्यांची ख्याती आहेत. प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्यावर पुण्यातील ललित कला अकादमी आणि मुंबई विद्यापीठ लोककला अकादमीमध्ये अतिथी प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांचा लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला विषयांचे लेखन आणि गाढा अभ्यास आहे. लोकसंस्कृती, नाट्यसंशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललित लेखन, लोककला आणि स्त्री जाणिवांवर भाष्य करणारे लेखन त्यांनी केले आहे. मराठी विश्वकोश, मराठी वाड्.मयकोश आणि मराठी ग्रंथकोश या महत्त्वाच्या कार्यातही त्यांचे योगदान आहे.

डॉ. तारा भवाळकर यांनी लिहलेली पुस्तके

  •  प्रियतमा
  • मरणात खरोखर जग जगते
  • मराठी नाटक : नव्या दिशा, नवी वळणे
  • मराठी नाट्यपरंपरा : शोध आणि आस्वाद
  • यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा
  • तिसऱ्या बिंदूच्या शोधात
  • लोकनागर रंगभूमी (माहितीपर)
  • लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा

डॉ.तारा भवाळकरांना मिळालेले पुरस्कार

  • पुणे विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठी पुरस्कार, १९८२
  • बँक ऑफ बडोदा, सांगलीः कृतज्ञता पुरस्कार, १९९०
  • महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार लोकसंचित ग्रंथासाठी, १९९२
  • अखिल भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्लीः डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरववृत्ती, १९९४
  • मंगल पुरस्कार, कोल्हापूर विशेष कर्तृत्ववान स्त्रीसाठी साहित्यिक क्षेत्रातील कार्यासाठी, १९९५
  • श्री. ना. बनहट्टी पुरस्कार, पुणे नगर वाचन मंदिर, पुणे मराठी नाट्यपरंपरा शोध आणि अरस्वाद या ग्रंथासाठी, १९९६
  • वि.म. गोखले पुरस्कार महाराष्ट्र साहितत्य परिषद, पुणे मराठी नाट्यपरंपरा शोध आणि आस्वाद या ग्रंथासाठी, १९९६
  • विशेष वाङमय पुरस्कार वाडमय चर्चा मंडळ, बेळगाव माझिया जातीच्या या ग्रंथासाठी, १९९७
  • वाङ्मय समीक्षा प्रथम पुरस्कार वाडमय चर्चा मंडळ, बेळगाव. मराठी नाटक नव्या दिशा नवी वळणे या ग्रंथासाठी, १९९८
  • कै. मालतीबाई दांडेकर जीवनगौरव पुरस्कार साहित्यप्रेमी मंडळ, पुणे, २००४
  • के. प्र. महिला गौरव पुरस्कार, २००५
  • शिवलीला सांस्कृतिक कलामंच, सांगली महिला गौरव पुरस्कार, २००६
  • विशाखा वतने पुरस्कार, नाट्यपंढरी लातूर. आकलन आणि आस्वाद या ग्रंथासाठी, २००६
  • महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे जीवनगौरव पुरस्कार, २००६
  • शरदचंद्र चट्टोपाध्याय पुरस्कारः म. सा. परिषद, पुणे, २००७
  • लोकसंस्कृती, नाट्यसेवा पुरस्कार नाट्य चित्रपट कलाकार तंत्रज्ञ कल्याण ट्रस्ट, सांगली, २०१०
  • विशेष सन्मानवृत्ती महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, २०११
  • डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठान साहित्य सेवा पुरस्कार, सोलापूर, २०११
  • सूर्योदय सेवारत्न पुरस्कार, जळगांव, २०१२
  • ज्ञानेश प्रकाशन, पुणे पुरस्कृत शैलजा काळे स्मृती पुरस्कार, २०१३
  • कै. डॉ. अ. का. प्रियोळकर स्मृती पुरस्कार मुंबई विद्यापीठ, २०१३
  • रत्नशारदा पुरस्कार सह्याद्री वाहिनी दूरदर्शन, २०१५
  • यशस्विनी पुरस्कार संवाद, वाई, २०१५
  • साहित्य रत्न पुरस्कार रत्नाप्पाअण्णा कुंभार स्मृतीमंच, जयसिंगपूर, २०१६
  • लोकमत सखीमंच जीवन गौरव पुरस्कार, सांगली, २०१६
  • गार्गी पुरस्कार श्री. सिध्दिविनायक न्यास, मुंबई, २०१६
  • सु.ल. गद्रे साहित्य पुरस्कार साहित्य संघ, मुंबई (मुलुंड), २०१६
  • काकासाहेब खाडिलकर जीवन गौरव पुरस्कार अ.भा. मराठी नाट्य परिषद, सांगली, २०१७
  • पद्मश्री विखे पाटील जीवनगौरव पुरस्कार अहमदनगर, २०२१

पुराणकथा स्त्रियांवर अन्याय करायला शिकवतात?

पुराणकथा स्त्रियांवर अन्याय करायला शिकवतात?

 

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00