Home » Blog » Tanisha-Dhruv : तनिशा-ध्रुवची विजयी सलामी

Tanisha-Dhruv : तनिशा-ध्रुवची विजयी सलामी

महिला एकेरीत रक्षिताचा संघर्षपूर्ण विजय

by प्रतिनिधी
0 comments
Badminton

मुलहेम : भारताच्या तनिशा क्रॅस्टो-ध्रुव कपिला या जोडीने बुधवारी जर्मन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या मिश्र दुहेरी गटामध्ये पहिल्या फेरीत विजय नोंदवला. या स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये भारताच्या रक्षिता रामराजने विजयी सलामी दिली. (Tanisha-Dhruv)

ध्रुव-तनिशा जोडीला या स्पर्धेमध्ये आठवे मानांकन आहे. सलामीच्या सामन्यात त्याने भारताच्याच रोहन कपूर-शिवानी गड्डे या जोडीचा तीन गेमपर्यंत रंगलेल्या लढतीत २१-१६, १८-२१, २१-१७ असा पराभव केला. हा सामना एक तास दोन मिनिटे रंगला. पुढील फेरीत ध्रुव-कपिला जोडीचा सामना जर्मनीच्या जॅन्सन जोन्स रॅल्फाय-ग्युएन ठक फुआँग यांच्याशी होणार आहे. याच गटात भारताच्या आशित सूर्या-अमृता प्रथमेश यांना पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली. (Tanisha-Dhruv)

महिला एकेरीमध्ये रक्षिता रामराजने सलामीच्या सामन्यात मलेशियाच्या किसोना सेल्वादुरीवर अटीतटीच्या सामन्यात २२-२०, ५-२१, २५-२३ अशी मात केली. हा सामना एक तास आठ मिनिटे रंगला. पुढील फेरीत रक्षितासमोर हाँगकाँगच्या सिन यॅन हॅपीचे आव्हान आहे. भारताच्या उन्नती हुडाने पहिल्या फेरीत कॅनडाच्या वेन झँगला २१-१३, २१-१७ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. तान्या हिरेमठला मात्र पहिल्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. बल्गेरियाच्या कॅलोयाना नाल्बान्तोवाने तान्याला २१-१८, २१-१३ असे नमवले.(Tanisha-Dhruv)

पुरुष एकेरीमध्ये भारताच्या तरुण मानेपल्लीने स्वित्झर्लँडच्या मॅग्नस जोहान्सनला एका गेमची पिछाडी भरून काढत १०-२१, २१-१९, २१-१९ असे हरवले. पुढील फेरीत त्याचा सामना कॅनडाच्या आठव्या मानांकित ब्रायन यँगशी होईल. पुरुष दुहेरीमध्ये पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय-के. साई प्रतीक या भारतीय जोडीने पहिल्या फेरीत विजय नोंदवला. त्यांनी इंग्लंडच्या कॅलम हेमिंग-एथन व्हॅन ल्यूवेन यांना २२-२०, २१-१९ असे पराभूत केले. पुढील फेरीत ते स्वित्झर्लँडच्या द्वितीय मानांकित रॅस्मस केर-फ्रेड्रिक सॉगार्ड या जोडीशी झुंजतील. (Tanisha-Dhruv)

हेही वाचा :

दानिश, करुणने विदर्भाला सावरले

भारतीय महिलांचा विश्वविजेत्या नेदरलँड्सला धक्का

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00