नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन यांचे सोमवारी (४ ऑगस्ट) नवी दिल्ली येथे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. आजारपणामुळे एक महिन्याहून अधिक काळ ते अंथरुणाला खिळून होते. (SHIBU SOREN PASSES AWAY)
झारखंडचे विद्यमान मुख्यमंत्री आणि शिबू सोरेन यांचे पुत्र हेमंत सोरेन यांनी निधनाची घोषणा केली. त्यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आदरणीय दिशाम गुरुजी आपल्या सर्वांना सोडून गेले आहेत.’’ शिबू सोरेन झारखंडमध्ये ‘दिशाम गुरुजी’ म्हणून प्रसिद्ध होते.(SHIBU SOREN PASSES AWAY)
सोरेन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. “श्री शिबू सोरेन हे तळागाळातील नेते होते. सार्वजनिक जीवनात काम करत असताना त्यांची जनतेप्रती अढळ निष्ठा होती. आदिवासी समुदाय, गरीब आणि दलितांना सक्षम बनवण्याबाबत ते विशेषतः उत्साही होते. माझ्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आणि चाहत्यांसोबत आहेत.(SHIBU SOREN PASSES AWAY)
जूनच्या शेवटच्या आठवड्यात सोरेन यांना नवी दिल्लीत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. किडनीशी संबंधित गुंतागुंतीमुळे शिबू सोरेन यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात एका महिन्यापेक्षा जास्त काळ दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तज्ञांच्या देखरेखीखाली होते.(SHIBU SOREN PASSES AWAY)
११ जानेवारी १९४४ रोजी सध्याच्या झारखंडमधील रामगडजवळ जन्मलेले शिबू सोरेन हे संथाळ आदिवासी समुदायाचे होते. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला आदिवासींच्या जमीन हक्कासाठी त्यांनी मोठा लढा उभारला. १९७३ मध्ये बिहारपासून वेगळे आदिवासी राज्य निर्माण करण्याच्या उद्देशाने झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) ची सह-स्थापना केली.
१९८० मध्ये पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आलेले शिबू सोरेन संसदेत अनेक वेळा राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले. १९८७ मध्ये, ते झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष झाले. जवळपास ३८ वर्षे त्यांनी हे पद भूषवले.
कव्हर स्टोरी
Farmers’ Workers’ Party : जनसुरक्षा कायद्याविरोधात राज ठाकरेंचा एल्गार
पनवेल : प्रतिनिधी : शेतकरी कामगार पक्षाच्या ७८ व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात एल्गार पुकारण्याचे आवाहन केले. राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात जनसुरक्षा कायदा आणला आहे. शहरी नक्षलींच्याविरोधात हा कायदा असल्याचे सांगितले गेले. शहरी नक्षलवाद म्हणजे काय याची व्याख्या स्पष्ट करा अशी मागणी ठाकरे यांनी केली. (Farmers’ Workers’ Party)
शेतकरी कामगार पक्षाच्या मंचावरुन बोलताना राज ठाकरे म्हणाले की, शिवसेनेच्या मंचावर कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे आले होते. शिवसेना आणि कम्युनिस्ट हे एकाच मंचावर तसा हा दुर्मिळ योग होता. मात्र जेव्हा ते एका मंचावर आले तेव्हा जणू काही भगव्या मंचावर लाल ध्वज आल्यासारखे ते दृश्य होते. तेव्हाच्या राजकारणात आणि राजकारण्यांमध्ये संमजसपणा होता. आता जेव्हा शेकापच्या वर्धापनदिनानिमित्त मी येथे आलो आहे. तेव्हा शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत देखील आहेत. त्यामुळे लाल मंचावर दोन भगवे ध्वज एकत्र आले आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.
भारताचे पंतप्रधान आणि गृहमंत्री दोघेही गुजराती आहे. देशाचा गृहमंत्री ठणकावून सांगतो की मी हिंदी नाही, मी गुजराती आहे. मात्र जेव्हा आम्ही मराठीचा आग्रह धरला, मराठी बोललो की संकुचित कसे होतो? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडमध्ये सर्वाधिक डान्सबार कसे? असा कळीचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. (Farmers’ Workers’ Party)
राज ठाकरे म्हणाले, “आज रायगड जिल्ह्यात अनेक प्रकल्प येत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत. उद्योगधंद्यांसाठी लागणारं मनुष्यबळ बाहेरच्या राज्यातून येत आहे. त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार नाही, हे विदारक चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. एखाद्या प्रदेशात रस्ते आल्यानंतर तेथील राज्यकर्त्यांनी नीट लक्ष दिलं नाही तर तो प्रदेश बरबाद होतो. त्यामुळे रायगड जिल्ह्याची जबाबदारी जयंतराव तुम्ही घेतली पाहिजे,” असा सल्ला शेकापचे जयंत पाटील यांना दिला.
महायुती सरकारने आणलेल्या जनसुरक्षा कायद्याबद्दल राज ठाकरे म्हणाले, रायगडमध्ये, महाराष्ट्रात जेवढी विकासाची कामं होत आहेत, त्यासाठी आमची शेती घेतली जात आहे. त्या ठिकाणी मराठी मुलं कामाला लागली पाहिजे. बाहेरुन उद्योगपती येणार, तुमच्या जमिनी घेणार, धंदे घेणार आणि कसेही वागणार, वाटेल तो थैमान घालणार. आम्ही आमच्या जमिनीसाठी लढलो तर आता तुरुंगात टाकणारा कायदा आणला आहे. तुम्ही कोण आहात तर अर्बन नक्षल आहात, असा तो कायदा आहे. अर्बन नक्षल शहरामध्ये राहाणारा, तुम्ही कोणत्या प्रकल्पाला विरोध केला, उद्योगाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करणार. एकदा अटक करुच देत. मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहू देणार नाही. उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा सन्मान राखून आणावे लागतील,” असा इशारा राज ठाकरे यांनी महायुती सरकारला दिला आहे.
राज्यात कुठून कुठे रस्ते जाणार हे मंत्र्यांना बरोबर माहित असते. कारण तेच रस्ता ठरवणार आणि रस्ता होण्याआधी तेच जमिनी घेणार. मग उद्योगपतींशी तेच तडजोड करुन गब्बर होणार. निवडणूक आली की विचार, विषय बाजूला फेकून तुमच्या तोंडावर पैसे फेकून मतं घेणार. एवढा एकमेव उद्योग महाराष्ट्रात सुरु आहे. याच्या खोलात जाऊन विचार करण्यास कोणीही तयार नाही, अशी मंत्री, आमदार आणि उद्योगपती, ठेकेदार यांच्या साखळीवर राज ठाकरेंनी जोरदार टीका केली. (Farmers’ Workers’ Party)
Rahul attacks on BJP : भित्र्यांना घाबरायचे नसते हे बाळकडू घरातूनच मिळाले : राहुल गांधी
नवी दिल्ली : माझी बहीण (प्रियंका गांधी) मला नेहमीच ‘तू आगीशी खेळतोयस, तुला भीती वाटत नाही का,’ असे विचारत असते, असे सांगून काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी म्हणाले, ‘‘भित्र्यांना घाबरायचे नसते हे बाळकडू आम्हाला घरातूनच मिळाले आहे,’’ अशा शब्दांत राहुल गांधी यांनी भाजप विरोधात लढण्याचा निर्धार शनिवारी (२ ऑगस्ट) पुन्हा एकदा बोलून दाखवला. (Rahul attacks on BJP)
मोदी सरकारने लादलेल्या कृषी कायद्यांचा संदर्भ देऊन राहुल गांधी म्हणाले, ‘‘अरूण जेटली आता हयात नाहीत, त्यांच्याबद्दल आता काही बोलू नये. पण मला आठवते की जेव्हा मी कृषी कायद्यांविरुद्ध लढत होतो तेव्हा अरुण जेटलीजींना मला धमकी देण्यासाठी पाठवण्यात आले होते. ते म्हणाले होते की, जर तुम्ही शेती कायद्यांबाबत विरोध करत राहिलात तर आम्हाला तुमच्याविरुद्ध कारवाई करावी लागेल. मी म्हणालो की, मला वाटत नाही की तुम्ही कोणाशी बोलत आहात हे तुम्हाला माहिती आहे. आम्ही काँग्रेस आहोत, भित्रे नाही. ब्रिटिश आम्हाला वाकवू शकले नव्हते.’’(Rahul attacks on BJP)
अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (एआयसीसी) कायदा, मानवाधिकार आणि माहिती अधिकार यावरील वार्षिक परिषदेत ते बोलत होते.
तथापि, राहुल गांधी यांचे विधान अरुण जेटली यांचे पुत्र रोहन जेटली यांनी खोडून काढले आहे. तशी पोस्टही त्यांनी ‘X’ वर केली आहे.(Rahul attacks on BJP)
“माझ्या वडीलांनी धमकी दिल्याचे राहुल गांधी आता सांगताहेत. मी त्यांना आठवण करून देतो की, माझ्या वडीलांचे निधन २०१९ मध्ये झाले आहे आणि कृषी कायदे २०२० मध्ये लागू करण्यात आले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, विरोध केल्याबद्दल धमकावणे हे माझ्या वडिलांच्या स्वभावात नव्हते. ते एक कट्टर लोकशाहीवादी होते आणि नेहमीच एकमत निर्माण करण्यावर विश्वास ठेवत असत,” असे रोहन जेटली यांनी म्हटले आहे.
निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
दरम्यान, राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच ७० ते १०० जागांवर फेरफार झाल्याचा काँग्रेस पक्षाला संशय आहे, असे ते म्हणाले.
भारतातील निवडणूक व्यवस्था आधीच मृतावस्थेत आहे. तसे पुरावे आमच्याकडे आहेत. गांधी यांनी एका मतदारसंघाचे उदाहरण दिले. येथे ६.५ लाख मतदारांनी मतदान केले होते, त्यापैकी १.५ लाख बोगस होते, असे ते म्हणाले. “भारताचे पंतप्रधान हे खूपच कमी बहुमत असलेले पंतप्रधान आहेत. लोकसभा निवडणुकीत मतांची फेरफार कशा पद्धतीने केली जाऊ शकते हे येत्या काही दिवसांत आम्ही तुम्हाला सिद्ध करुन दाखवणार आहोत.
I remember when I was fighting against the farm laws, Arun Jaitley was sent to threaten me.
— Congress (@INCIndia) August 2, 2025
He said, 'If you continue down this path, opposing the government and fighting us on the farm laws, we'll have to take action against you.'
I replied, 'I think you don't know or have… pic.twitter.com/8s9TJGMPah
Rahul Gandhi now claims my late father, Arun Jaitley, threatened him over the farm laws.
— Rohan Jaitley (@rohanjaitley) August 2, 2025
Let me remind him, my father passed away in 2019. The farm laws were introduced in 2020. More importantly, it was not in my father's nature to threaten anyone over an opposing view. He was a…
Modi in Varanasi: भगवान शिवाच्या आशीर्वादाने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला : मोदी
वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (२ ऑगस्ट) दहशतवादाविरुद्ध भारताच्या कठोर कारवाईचे वर्णन करताना भगवान शिवाच्या ‘रुद्र रूपा’ चा दाखला दिला. ऑपरेशन सिंदूरने जगासमोर देशाची ताकद दाखवली. भारतावर हल्ला करण्याचे धाडस करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही, अगदी ‘पाताल लोक’मध्ये गेले तरी सोडणार नाही, असा स्पष्ट संदेश दिला, असे मोदी म्हणाले. (Modi in Varanasi)
‘‘पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या २६ जणांबद्दल माझे हृदय दुःखाने भरून आले आहे,’’ असे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या वाराणसी मतदारसंघात आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना म्हटले.
‘‘आमच्या मुलींच्या ‘सिंदूर’चा बदला घेण्याचे माझे वचन महादेवाच्या आशीर्वादाने पूर्ण झाले,’’ असे ते म्हणाले. ‘‘ऑपरेशन सिंदूरचे यश मी महादेवाच्या चरणी समर्पित करतो. १४० कोटी देशवासीयांची एकता ही ऑपरेशन सिंदूरचे बलस्थान बनली, असेही ते म्हणाले. (Modi in Varanasi)
‘‘शिव म्हणजे कल्याण पण जेव्हा दहशतवाद कुरूप डोके वर काढतो तेव्हा महादेव त्याचे ‘रुद्र रूप’ घेतात. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, जगाने भारताचे हे रूप पाहिले,’’ असे पंतप्रधान म्हणाले. (Modi in Varanasi)
विरोधकांवर टीका करताना पंतप्रधान मोदींनी आरोप केला की, देश ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा उत्सव साजरा करत असताना, ‘‘आपल्याच देशातील काही लोक यामुळे त्रासले होते. भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले हे काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना पचवता येत नाही,’’ असे ते म्हणाले.
‘‘ऑपरेशन सिंदूरचा तुम्हाला अभिमान नाही का? भारताने (पाकिस्तानमधील) दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले याचा तुम्हाला अभिमान नाही का?’’ असा प्रश्न पंतप्रधानांनी उपस्थितांना विचारला.
ते पुढे म्हणाले, ‘‘आपल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी दहशतवादी मुख्यालयांवर अचूक हल्ला करून त्यांचा नाश कसा केला याचे दृश्य तुम्ही सर्वांनी पाहिले असतील.’’ ‘‘पाकिस्तानमधील अनेक हवाई तळ अजूनही आयसीयूमध्ये आहेत. पाकिस्तानची वेदना समजण्यासारखी असली तरी धक्कादायक गोष्ट म्हणजे काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांना हे सहन होत नाही, याचे आश्चर्य वाटते,’’ असे मोदी म्हणाले.
आज अपने संसदीय क्षेत्र वाराणसी से पीएम-किसान सम्मान निधि की राशि जारी कर और काशीवासियों के लिए विभिन्न विकास कार्यों का उद्घाटन व शिलान्यास कर अत्यंत प्रसन्नता हो रही है। https://t.co/ezUNEParvT
— Narendra Modi (@narendramodi) August 2, 2025
Film Awards announced : शाहरूख, विक्रांत मॅसी, राणी मुखर्जी सर्वोत्कृष्ट
नवी दिल्ली : बॉलीवूड स्टार शाहरुख खानला अॅक्शन ब्लॉकबस्टर ‘जवान’ मधील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तर राणी मुखर्जीला ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ मधील तिच्या कामगिरीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. विक्रांत मॅसीला ’१२ वी फेल’ या हिट बायोपिकमधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. शाहरूख आणि मॅसीला हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. ‘श्यामची आई’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट प्रादेशिक सिनेमाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. (Film Awards announced)
७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी (१ ऑगस्ट) करण्यात आली. २०२३ मधील सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि चित्रपटसृष्टीतील कामगिरीचा सन्मान करण्यासाठी, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (आय अँड बी) पुरस्कारांची घोषणा केली.
आयपीएस अधिकारी मनोज कुमार यांच्या कथेवर आधारित, ‘१२ वी फेल’ला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला. सुदीप्तो सेन यांना त्यांच्या ‘द केरळ स्टोरी’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला तर करण जोहर यांच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ला सर्वोत्कृष्ट मनोरंजनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. (Film Awards announced)
* राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि विजेते असे :
फीचर फिल्म्स, प्रादेशिक चित्रपट
तेलुगू : भगवान् केसरी
तमिळ : पार्किंग
मल्याळम : उल्लोझुक्कु
कन्नड : कंदीलू – द रे ऑफ होप
हिंदी : कथल : अ जॅकफ्रूट मिस्ट्री
गुजराती : वाश
सर्वोत्तम पंजाबी चित्रपट : गॉडडे गॉडडे चा
सर्वोत्तम ओडिया चित्रपट : पुष्करा

सर्वोत्तम मराठी चित्रपट : श्यामची आई
विशेष उल्लेख : पुनर्लेखन : एमआर राजकृष्णन, ‘अॅनिमल’ (हिंदी)
स्टंट नृत्यदिग्दर्शन : नंदू आणि प्रध्वी, हनु-मॅन (तेलुगु)
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन : वैभव मर्चंट, ‘धिंडूर बाजा रे’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (हिंदी)
सर्वोत्कृष्ट गीत : कासरला श्याम, ‘ओरू पलेतुरु’, ‘बालागम’ (तेलुगु)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन (गाणी): जी व्ही प्रकाश, ‘वाथी’ (तमिळ)
पार्श्वभूमी स्कोअर : हर्षवर्धन रामेश्वर, ‘प्राणी’ (हिंदी)
मेकअप : श्रीकांत देसाई, ‘साम बहादूर’ (हिंदी)
कॉस्च्युम डिझायनर : सचिन लोवळेकर, दिव्या गंभीर आणि निधी गंभीर, ‘सॅम बहादूर’ (हिंदी)
प्रॉडक्शन डिझाइन : मोहनदास, ‘२०१८ – एव्हरी इज अ हिरो’ (मल्याळम)
संपादन : मिधुन मुरली, पुक्कलम (मल्याळम)
ध्वनी रचना : सचिन सुधाकरन आणि हरिहरन मुरलीधरन, ‘प्राणी’ (हिंदी)
पटकथा : साई राजेश नीलम, ‘बेबी’ (तेलुगु), रामकुमार बालकृष्णन, ‘पार्किंग’ (तमिळ)
संवाद लेखक : दीपक किंगराणी, ‘सिर्फ एक बंदा कॉफी है’ (हिंदी)
छायांकन : प्रशांतनु महापात्रा, ‘द केरळ स्टोरी’ (हिंदी)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका: शिल्पा राव (चालिया – ‘जवान’, हिंदी), रोहित (प्रेमिथुन्ना – ‘बेबी’, तेलुगु)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार : सुकृती बंदिरेड्डी (‘गांधी थाथा चेट्टू’, तेलुगु), कबीर खंदारे (जिप्सी, तमिळ), ट्रीशा तोषार, श्रीनिवास पोकळे, भार्गव (‘नाल २, मराठी)
सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : उर्वशी, ‘उलोझुक्कू’ (मल्याळम), जानकी बोडीवाला, ‘वश’ (गुजराती)
सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता : विजयराघवन, ‘पुक्कलम’ (मल्याळम), एमएस भास्कर, ‘पार्किंग’ (तमिळ)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : राणी मुखर्जी, ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ (हिंदी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : शाहरुख खान, ‘जवान’ (हिंदी), विक्रांत मॅसी, ‘१२वी फेल’ (हिंदी)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन : सुदीप्तो सेन, ‘द केरळ स्टोरी’ (हिंदी)
AVGC मधील सर्वोत्कृष्ट चित्रपट : ‘हनु-मन’ (तेलुगु)
सर्वोत्कृष्ट बालचित्रपट : ‘नाल’ २’ (मराठी)
राष्ट्रीय, सामाजिक मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट : सॅम बहादुर (हिंदी)
सर्वोत्तम पदार्पण चित्रपट : ‘आत्मापॅम्फ्लेट’ (हिंदी)
सर्वोत्तम वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट : ‘१२वी फेल’ (हिंदी)
*नॉन-फीचर फिल्म्स
विशेष उल्लेख : एम के रामदास, ‘नेकल – क्रॉनिकल ऑफ द पॅडी मॅन’ (मल्याळम), हिमांसू शेखर खटुआ (दिग्दर्शक), कादंबिनी मीडिया प्रायव्हेट लिमिटेड (निर्माता) ‘द सी अँड द सेव्हन व्हिलेजेस’
सर्वोत्तम पटकथा : चिदानंद नाईक, ‘सनफ्लावर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो’ (कन्नड)
सर्वोत्तम व्हॉइसओव्हर : हरी कृष्णन यांचे ‘द सेक्रेड जॅक – एक्सप्लोरिंग द ट्री ऑफ विश’ (इंग्रजी)
सर्वोत्तम संगीत दिग्दर्शन : प्रणिल देसाई ‘द फर्स्ट फिल्म’ (हिंदी) (Film Awards announced)
सर्वोत्तम एडिटिंग : निलाद्री रॉय ‘मूव्हिंग फोकस’ (इंग्रजी)
सर्वोत्तम ध्वनी डिझाइन : शुभरुण सेनगुप्ता ‘धुंधगिरी के फूल’ (हिंदी)
सर्वोत्तम छायांकन : मीनाक्षी सोमन, सरवणमारुथु ‘लिटिल विंग्स’ (तमिळ)
सर्वोत्तम दिग्दर्शन : पियुष ठाकूर, ‘द फर्स्ट फिल्म’ (हिंदी)
सर्वोत्तम लघुपट : मनीष सैनी (दिग्दर्शक), एलनार फिल्म्स (निर्माता), ‘गिद्ध द स्कॅव्हेंजर’ (हिंदी)
सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर चित्रपट : ‘द सायलेंट एपिडेमिक’ (हिंदी), आकाश गुप्ता (दिग्दर्शक), ‘सिनेमा४गुड प्रायव्हेट लिमिटेड राहगिरी फाउंडेशन’ (निर्माता) (Film Awards announced)
सर्वोत्कृष्ट माहितीपट : ‘गॉड वल्चर अँड ह्युमन’ (इंग्रजी, हिंदी आणि तेलगू), ऋषिराज अग्रवाल (दिग्दर्शक), स्टुडिओ लिची, डॉ. राजेश चंदवानी (निर्माता)
सर्वोत्कृष्ट कला/संस्कृती चित्रपट : ‘टाइमलेस तमिळनाडू’ (इंग्रजी), कामाख्या नारायण सिंग (दिग्दर्शक), सेलिब्रिटी मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड (निर्माता)
सर्वोत्कृष्ट चरित्रात्मक/ऐतिहासिक पुनर्रचना चित्रपट : ‘मो बौ मो गान, लेंटिना आओ’ (ओडिया), संजीब परासर (दिग्दर्शक), NFDC (निर्माता)
सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट : ‘द स्पिरिट ड्रीम्स ऑफ चेराव’ (मिझो), शिल्पिका बोरदोलोई (दिग्दर्शिका)
सर्वोत्कृष्ट नॉन-फिक्शन फिल्म : ‘फ्लॉवरिंग मॅन’ (हिंदी), सौम्यजित घोष दस्तीदार (दिग्दर्शक), फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (निर्माता)
सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक : उत्पल दत्ता (आसामी)
Congress alleges BJP: ‘मालेगाव’चा निकाल गृहमंत्र्यांनी आधीच संसदेत सांगितला होता : काँग्रेस
मुंबई : विशेष प्रतिनिधी : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला असला तरी खरा निकाल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत एक दिवस आधीच सांगितला होता. दहशतवादाला कोणताही धर्म व रंगही नसतो पण भाजपा त्याला रंग देऊन त्यांचा अजेंडा राबवत आहे. अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी (१ ऑगस्ट) केली. (Congress alleges BJP)
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी त्यांना अभिवादन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, या खटल्याचा निकाल गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत एक दिवस आधीच दिला होता, हे यानिमित्ताने खेदाने नमूद करावेसे वाटते. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, रंगही नसतो, पण भाजपा दहशतवादाला रंग देऊन त्यांचा अजेंडा राबवत आहे. (Congress alleges BJP)
खोटारडेपणा व दुटप्पीपणा हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वभावाचे पैलू आहेत. मालेगावच्या निकालावर प्रतिक्रीया देताना त्यांनी मंत्रीपदावेळी घेतलेल्या शपथेचा भंग केला आहे. एका घटनेला एक न्याय व दुसऱ्याला दुसरा न्याय हे नैतिकता व शपथेला धरून नाही. फडणवीस यांनी नैतिक व संवैधानिक मूल्ये पाळली नाहीत, असे सांगून ते म्हणाले की, राज्यातील भाजपा युती सरकार हे बेशरम आणि लाचार असून विधानसभेत रमी खेळणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा सोडून त्याला ‘क्रीडा मंत्रालय’ देऊन उचित सन्मानच केला आहे. आता रमी या खेळाला ऑलिंम्पिक दर्जा देतील व तो खेळणाऱ्याला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानितही करतील असा टोला लगावला.
सामाजिक विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला, या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, हे सरकार चुकीच्या पद्धतीने सत्तेवर आले आहे हे आम्ही वारंवार सांगत आलो आहोत त्यामुळे ते चुकीचीच कामे करणार. सामाजिक न्याय विभाग वा आदिवासी विभागाचा निधी हा कोणत्याही परिस्थितीत दुसरीकडे वळवता येत नाही, पण सरकार सातत्याने नियमांचे उल्लंघन करत असून संविधानाची पायमल्ली करत आहे, असा आरोप सपकाळ यांनी केला. (Congress alleges BJP)
जे लोक पक्ष सोडून जात आहेत त्यांची चर्चा होत होती. पण ज्या पक्षात जायचे त्यांच्याशी योग्य सौदा काही होत नव्हता आता सौदा झाल्याने ते गेले असतील. याला गळती म्हणणे चुकीचे ठरेल, काँग्रेस हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे, कोणाच्या जाण्याने पक्ष कमजोर होत नाही, ५०-५० वर्ष एकाच कुटुंबात पक्षाची पदे दिली गेली आता नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळत आहे. जे गेले त्यांनी दिल्या घरी सुखी रहावे, असेही ते म्हणाले.
नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ९ सप्टेंबर २०२५ रोजी होईल आणि त्याच दिवशी मतमोजणी होईल, असे भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) शुक्रवारी (१ ऑगस्ट) सांगितले. शिवाय, मतदानाची अधिसूचना ७ ऑगस्ट रोजी जाहीर केली जाईल. नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट असेल. (VP election announced)
२२ जुलै २०२५ रोजी विद्यमान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर उपाध्यक्षपद रिक्त झाले.(VP election announced)
गुरुवारी (३१ जुलै) निवडणूक आयोगाने सांगितले की त्यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम केली आहे.(VP election announced)
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेत राज्यसभेचे २३३ निवडून आलेले सदस्य, राज्यसभेचे १२ नामनिर्देशित सदस्य आणि लोकसभेचे ५४३ सदस्य असतील. राज्यसभेत पाच आणि लोकसभेत एक रिक्त जागा आहे, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील मतदारांची संख्या ७८२ इतकी आहे.
निवडणूक मंडळाने गेल्या आठवड्यात राज्यसभेचे महासचिव पी.सी. मोदी यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करून उपराष्ट्रपती निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली होती. त्यांनी राज्यसभा सचिवालयाच्या सहसचिव गरिमा जैन आणि राज्यसभा सचिवालयाचे संचालक विजय कुमार यांचीही निवडणुकीसाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
build sidewalks : पदपथ तयार करण्यासाठी न्यायालयाची सरकारला शेवटची संधी
नवी दिल्ली : प्रतिनिधी : पादचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी १४ मेच्या आदेशानुसार अपंग व्यक्तीसाठी पदपथ सुलभ करणे समाविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारला पादचाऱ्याना चालण्यासाठी नियम तयार करण्याची “शेवटची संधी” दिली आहे. (build sidewalks)
मे महिन्यात, न्यायमूर्ती अभय एस. ओक आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने असे म्हटले होते की, भारतीय संविधानाच्या कलम २१ अंतर्गत पदपथ आणि पदपथ वापरण्याचा अधिकार हा जीवनाच्या अधिकाराचा एक आवश्यक पैलू आहे.
आज शुक्रवारी न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठासमोर , वरिष्ठ वकील आणि न्यायमूर्ती गौरव अग्रवाल यांनी न्यायालयाला माहिती दिली की ते मे महिन्याच्या आदेशानुसार संघाकडून तयार होणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांची वाट पाहत आहेत. त्यांनी माहिती दिली की या प्रकरणात, सर्वोच्च न्यायालयाने रस्ते सुरक्षेशी संबंधित विविध आदेशांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी माजी न्यायाधीश, न्यायमूर्ती सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. ते म्हणाले, “ही मार्गदर्शक तत्त्वे तयार झाल्यानंतर, समिती त्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी आणि देखरेख सुरू करू शकते, विशेषतः पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी… हे खरोखर महत्वाचे आहे कारण महामार्गांवर मोठ्या प्रमाणात पादचाऱ्यांचे मृत्यू होत आहेत. १०,००० मृत्यू झाले आहेत…” (build sidewalks)
हा युक्तिवाद आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल विक्रमजीत बॅनर्जी यांचे विधान विचारात घेतल्यानंतर, की संघ मार्गदर्शक तत्त्वे तयार करेल, न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले: गौरव अग्रवाल, भारतीय संघाचे वतीने उपस्थित असलेले वकील विक्रमजीत बॅनर्जी आणि मुख्य प्रकरणात दोन अंतरिम अर्ज दाखल करणारे वकील किशन जैन यांचे म्हणणे ऐकले. या खटल्याचा पादचाऱ्यांच्या सुरक्षेशी काही संबंध आहे.”
दोन अंतरिम अर्जांद्वारे, हे निदर्शनास आणून देण्यात आले आहे की नागरिकांच्या वापरासाठी योग्य पदपथ असणे आवश्यक आहे. दुसरे, पदपथ असे असावेत की ते अपंग व्यक्तींसाठी सुलभ आणि वापरण्यायोग्य असतील. तिसरे, पदपथांवरील अतिक्रमणे हटवणे अनिवार्य आहे.
वेगवेगळ्या खंडपीठांनी वेळोवेळी दिलेल्या विविध आदेशांची आम्ही दखल घेतो. आज, जेव्हा हा विषय चर्चेत आला, तेव्हा आम्ही गौरव अग्रवाल यांच्याशी या प्रकरणातील प्रगतीबद्दल चौकशी केली. त्यांनी असे निदर्शनास आणून दिले की, या तीन मुख्य मुद्द्यांवर भारत सरकारला मार्गदर्शक तत्त्वे तयार करावी लागतील. त्यांनी पुढे असेही निदर्शनास आणून दिले की राज्य सरकारनेही मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत किंवा जर त्यांना योग्य वाटले तर राज्यांनीही तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करावा लागेल.
आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी आणि या न्यायालयासमोर मांडण्यासाठी आम्ही चार आठवड्यांचा वेळ देत आहोत. जर पुढील सुनावणीच्या तारखेला संघ मार्गदर्शक तत्त्वे तयार करू शकला नाही, तर हे न्यायालय मित्राच्या मदतीने आणि सहकार्याने आवश्यक ती कारवाई करेल. (build sidewalks)
Anna Bhau and Education : अण्णा भाऊंच्या साहित्यातील शैक्षणिक विचार
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील शैक्षणिक विचार अत्यंत व्यापक, पुरोगामी आणि मानवतावादी आहेत. त्यांनी औपचारिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन जीवनातील अनुभव, सामाजिक जाणीव, आत्मसन्मान, श्रमाची प्रतिष्ठा आणि चिकित्सक वृत्ती यांसारख्या घटकांना शिक्षणाचा अविभाज्य भाग मानले. (Anna Bhau and Education)
–दीपक कुंभार
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे केवळ एक प्रतिभावान साहित्यिक नव्हते, तर ते एक समाजसुधारक, लोककवी आणि दलित चळवळीतील एक अत्यंत महत्त्वाचे कार्यकर्ते होते. त्यांच्या समग्र लेखनातून समाजातील उपेक्षित, शोषित आणि वंचित घटकांच्या असह्य वेदना आणि त्यांच्या आकांक्षा अत्यंत प्रभावीपणे व्यक्त झाल्या. अण्णाभाऊंचे साहित्य हे केवळ मनोरंजनाचे किंवा कथाकथनाचे साधन नव्हते, तर त्यामध्ये समाजाला प्रगतीच्या मार्गावर नेण्याची आणि अन्यायविरुद्ध बुलंद आवाज उठवण्याची प्रचंड प्रेरणा दडलेली होती. त्यांच्या साहित्याचा गाभा समजून घेण्यासाठी त्यातील शैक्षणिक विचारांचा अभ्यास करणे नितांत आवश्यक आहे.
- जीवनसंघर्ष आणि साहित्य निर्मिती
अण्णा भाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे एका अत्यंत गरीब आणि संघर्षमय परिस्थितीत झाला. मातंग समाजात जन्मल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच जातीय भेदभावाचे आणि सामाजिक बहिष्काराचे चटके सहन करावे लागले. या प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना पारंपरिक शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही, परंतु त्यांचे जीवन हेच त्यांचे ग्रंथालय आणि त्यांचे अनुभव हेच त्यांचे शिक्षक ठरले. त्यांची स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती विलक्षण होती. त्यांनी लावणी, पोवाडा यांसारख्या अनेक लोककला प्रकारांचा सखोल अभ्यास करून त्याच माध्यमातून आपले क्रांतिकारी विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवले. (Anna Bhau and Education)
अण्णा भाऊंच्या नावावर ३५ कादंबऱ्या, १५ हून अधिक नाटके, अनेक लोकनाट्ये, लावण्या आणि पोवाडे यांचा समावेश आहे. ‘फकिरा’, ‘वैजयंता’, ‘चिखलातील कमळ’, आणि ‘वारणेचा वाघ’ यांसारख्या त्यांच्या कादंबऱ्यांनी मराठी साहित्यात नवी उंची गाठली. त्यांच्या साहित्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी दलित, कष्टकरी आणि कामगार समाजाचे जीवन, त्यांचे दुःख, त्यांची स्वप्ने आणि त्यांचे संघर्ष अत्यंत प्रभावीपणे आणि वास्तववादी पद्धतीने चित्रित केले. त्यांच्या लेखनातून तत्कालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे खरेखुरे दर्शन घडते. त्यांची भाषा अत्यंत सोपी, सरळ आणि थेट आहे. अण्णा भाऊंनी लेखणीला शस्त्र बनवून अंधश्रद्धा, जातीयता आणि अनिष्ट रूढी-परंपरांवर कठोर टीका केली.
त्यांच्या साहित्यात शैक्षणिक विचारांचे अनेक पैलू विखुरलेले आहेत. त्यांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान हे अनुभवाधिष्ठित, परिवर्तनवादी आणि मानवतावादी आहे.
- अनुभवाधिष्ठित शिक्षण
अण्णा भाऊंच्या शैक्षणिक विचारांमध्ये औपचारिक शिक्षणापेक्षा अनुभवातून मिळणाऱ्या शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व दिलेले आढळते. त्यांचे साहित्य पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन अनुभवांवर आधारित शिक्षणाचा पुरस्कार करते. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांमधील पात्रे ही जीवनातील अत्यंत कठीण आणि प्रतिकूल परिस्थितींमधून शिकतात. त्याच अनुभवांच्या आधारावर आपले जीवन घडवतात. जीवनात येणाऱ्या अडचणी आणि त्यातून मिळणारे अनुभव हेच त्यांचे खरे शिक्षक असतात. उदाहरणार्थ, ‘चिखलातील कमळ’ या कादंबरीतील नायिका अनेक संकटांचा सामना करत जीवन जगते. त्या अनुभवांतूनच ती शहाणी आणि कणखर बनते. यातून हेच स्पष्ट होते की जीवनातील प्रत्यक्ष अनुभव हे शिक्षणाचे सर्वांत प्रभावी आणि महत्त्वाचे माध्यम आहेत. (Anna Bhau and Education)
- न्यायासाठी शिक्षणाची मशाल
अण्णा भाऊंच्या मते, शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे व्यक्ती आणि समाजात सामाजिक जाणीव जागृत करणे. त्यांच्या कथांमधून समाजातील टोकाची विषमता, अन्याय आणि शोषणाचे वास्तववादी चित्रण केले जाते. हे चित्रण वाचकांच्या मनाला चटका लावते, त्यांना समाजातील वाईट गोष्टींची जाणीव करून देते आणि त्याविरुद्ध लढण्याची प्रेरणा देते. ‘फकिरा’ या त्यांच्या गाजलेल्या कादंबरीतील नायक फकिरा आणि इतर पात्रे समाजातील अन्याय आणि जुलूमाविरुद्ध प्राणपणाने संघर्ष करतात. अण्णा भाऊ शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे एक शक्तिशाली साधन मानतात.
- आत्मसन्मान आणि स्वाभिमान
अण्णा भाऊंच्या साहित्यात आत्मसन्मान आणि स्वाभिमानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांची पात्रे समाजात सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी सतत संघर्षशील असतात. ‘वैजयंता’ कादंबरीतील नायिका आपल्या आत्मसन्मानाच्या रक्षणासाठी समाजाविरुद्ध लढा देते. तिच्या या संघर्षातून वाचकांना आपल्या हक्कांसाठी आणि आत्मसन्मानासाठी लढण्याची प्रेरणा मिळते. अण्णा भाऊंच्या मते, शिक्षणामुळे व्यक्तीला स्वतःची किंमत कळते, त्याच्यात आत्मविश्वास निर्माण होतो आणि तो समाजात ताठ मानेने जगू शकतो. शिक्षणातून प्रत्येक व्यक्तीला आत्मसन्मानाने जगण्याचा हक्क मिळायला हवा, हे त्यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचे सार आहे. (Anna Bhau and Education)
- श्रमाची प्रतिष्ठा आणि कौशल्याचे शिक्षण
अण्णा भाऊंनी आपल्या साहित्यातून श्रमाचे महत्त्व आणि शारीरिक कष्टाची प्रतिष्ठा यावर नेहमीच जोर दिला आहे. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांमधील बहुतांश पात्रे ही शेतकरी, कामगार किंवा मोलमजुरी करणारी आहेत; जी आपल्या घामातून आणि कष्टाने आपले जीवन जगतात. त्यांच्या कष्टमय जीवनाच्या चित्रणातून श्रमाचे मानवी जीवनातील अविभाज्य स्थान स्पष्ट होते. त्यांनी केवळ औपचारिक शिक्षणाचा पुरस्कार केला नाही, तर त्यासोबतच विविध जीवनोपयोगी कौशल्ये आत्मसात करणे किती महत्त्वाचे आहे, हे देखील आपल्या पात्रांच्या माध्यमातून दाखवून दिले.
- आजची प्रासंगिकता
अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा आणि त्यातील विचारांचा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रावर दूरगामी आणि सकारात्मक प्रभाव पडला. त्यांच्या क्रांतिकारी लेखनामुळे दलित आणि कष्टकरी समाजाला आपल्या भावना आणि आकांक्षा व्यक्त करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ आणि नवी प्रेरणा मिळाली. त्यांच्या साहित्याने समाजातील उपेक्षित आणि दबलेल्या घटकांना आत्मसन्मान आणि स्वाभिमानाने जगण्याची एक नवी दिशा दाखवली. अण्णाभाऊंच्या साहित्यातील शैक्षणिक विचारांचा वारसा आजही तितकाच ताजा आणि प्रासंगिक आहे. शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्याचे किंवा ज्ञानार्जनाचे साधन नसून ते सामाजिक परिवर्तन आणि व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे, हा त्यांचा संदेश आजही समाजासाठी दीपस्तंभासारखा मार्गदर्शक आहे. त्यांचे विचार आणि कार्य आजही अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना आणि शिक्षणप्रेमींना प्रेरणा देत आहेत. त्यांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान समाजातील गरीब आणि उपेक्षित घटकांना केंद्रस्थानी ठेवते आणि शिक्षण सर्वांसाठी सहज उपलब्ध असावे यावर जोर देते. त्यांचे शिक्षणविषयक विचार आजच्या परिस्थितीतही अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्यांचा अभ्यास करणे समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक आहे.
Fadanvis slams Congress: काँग्रेसने संपूर्ण हिंदूंची माफी मागावी : मुख्यमंत्री
नवी दिल्ली : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (३१ जुलै) स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले की, या निकालामुळे हिंदू समुदायाविरुद्धचा ‘खोटा कलंक’ पुसून टाकला आहे. (Fadanvis slams Congress)
एक्सवरील एका ओळीच्या पोस्टमध्ये फडणवीस यांनी हिंदीमध्ये म्हटले आहे की, “दहशतवाद कधीही भगवा नव्हता, नाही आणि कधीही राहणार नाही!”
काँग्रेसने संपूर्ण हिंदू समुदायाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केली.
‘‘हिंदू दहशतवादाचा दावा किती खोटा होता, किंवा त्याला ते भगवा दहशतवाद म्हणत होते ते किती खोटे होते ते आज उघडकीस आले आहे,” असे ते मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना म्हणाले. (Fadanvis slams Congress)
“हिंदू दहशतवादाबद्दल एक कट रचण्यात आला होता. तो न्यायालयाने पुराव्यांसह फेटाळून लावला आहे. काँग्रेसने केवळ ज्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली त्यांच्याकडूनच नव्हे तर संपूर्ण हिंदू समुदायाकडून माफी मागावी,” असे ते म्हणाले.
फडणवीस म्हणाले की ते पोलिसांवर दोषारोप करणार नाहीत कारण त्यावेळच्या राजकीय यंत्रणेने कट रचण्यासाठी दबाव आणला होता.
ते म्हणाले की ९/११ नंतर जगभरात इस्लामिक दहशतवादाची चर्चा सुरू होती आणि त्याला तोंड देण्यासाठी यूपीए सरकारने हिंदू दहशतवादाची खोटी कथा मांडली. (Fadanvis slams Congress)
काँग्रेसने ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्द तयार केला : शिंदे
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही एका कडक शब्दात काँग्रेस नेत्यांवर टीका केली आहे. देशभक्तांना बदनाम करण्यासाठी काँग्रेसने ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्द तयार केल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘‘सतरा वर्षांच्या प्रदीर्घ लढाईनंतर, विशेष न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सात कथित आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. न्यायाला विलंब झाला हे खरे आहे, परंतु सत्याचा कधीही पराभव होत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे,’’ असे शिंदे यांनी ‘X’ वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
‘‘सुरुवातीपासूनच, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात खोटे आरोप करून तुरुंगात टाकलेल्या देशभक्तांना शिवसेनेने स्पष्टपणे पाठिंबा दिला आहे. कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा आणि इतर सात व्यक्तींना या आरोपांमुळे प्रचंड मानसिक आणि शारीरिक यातना सहन कराव्या लागल्या. हिंदू समाज हा अन्याय कधीही विसरणार नाही,’’ असे ते पुढे म्हणाले.
काँग्रेसवर हल्लाबोल करताना शिंदे म्हणाले, ‘‘हिंदू कधीही देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत, कारण हिंदू धर्माचे पालन करणाऱ्यांसाठी देशभक्ती हे एक पवित्र कर्तव्य आहे. ‘हिंदू दहशतवाद’ हा हास्यास्पद शब्द कट रचणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी तयार केला होता. अशा उघड खोट्या गोष्टींसाठी त्यांच्याकडे आता काय उत्तर आहे? आज एक काळा अध्याय संपला आहे. हिंदू समुदायावरील कलंक पुसला गेला आहे. ‘गर्व से कहो, हम हिंदू हैं,’ ही घोषणा आता देशभरात शंभरपट मोठ्या आवाजात घुमेल, यात काही शंका नाही.’’
🕒 2.57pm | 31-7-2025📍Mumbai.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 31, 2025
LIVE | Media Interaction#Maharashtra #Mumbai https://t.co/6cYnovOlOj
सत्य कधी पराभूत होत नाही :
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 31, 2025
सतरा वर्षांच्या दीर्घ लढाईनंतर मालेगाव बॉम्बस्फोटातील सात कथित आरोपींची विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. न्यायाला उशीर झाला हे खरं आहे, पण सत्य कधीही पराजित होत नसतं, हे पुन्हा एकवार सिध्द झालंय.
मालेगावच्या स्फोटांप्रकरणी खोटे आरोप करुन…