कोल्हापूर : प्रतिनिधी : भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, यावर्षी ‘अल-निनो’ परिस्थितीचा प्रभाव राहण्याची दाट शक्यता असल्याने पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील प्रमुख दहा नद्यांवर उपसाबंदी लागू केली आहे. त्याचा फटका कोल्हापूर जिल्ह्यात उसासह अन्य पिकांना बसणार आहे. (Ban on water lifting imposed on 10 rivers)
जिल्ह्यातील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी वापरण्याचा प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या दोन्ही तीरांवरील शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर १५ जून पासून पुढील आदेशापर्यंत उपसाबंदी जाहीर करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर), कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी दिली आहे. (Ban on water lifting imposed on 10 rivers)
जिल्ह्यातील पंचगंगा, भोगावती, दूधगंगा, वारणा, तुळशी, कासारी, कडवी, कुंभी, धामणी आणि जांभळी या नद्यांच्या दोन्ही तीरांवरील पाणी उपसा करणाऱ्या उपसा मोटारीला हा आदेश लागू राहील. उपसाबंदीच्या कालावधीत अनधिकृपपणे उपसा आढळून आल्यास, मोटरी जप्त करुन परवाना धारकाचा उपसा परवाना एक वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नाही असे आदेशात म्हटले आहे. महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ मधील कलम ५१(३) व ९७ मधील तरतुदींनुसार मिळालेल्या अधिकारान्वये हे आदेश जारी केले आहेत. (Ban on water lifting imposed on 10 rivers)