कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर राधानगरी रस्त्यांवर एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली तेव्हा हृद्रयद्रावक घटना समोर आल्याने पोलिसही भावनाशील झाले. जिथं पत्नी मुलांना अपघातात गमावलं त्याच ठिकाणी विराट गौतम यांनी आपले आयुष्य संपवलं. या घटनेने सर्वजण सुन्न झाले. (Virat ended his life near Puikhadi)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २३ नोव्हेंबर २०२३ कोल्हापूर राधानगरी रोडवर पीरवाडी येथे भीषण अपघात झाला. खासगी आराम बस मध्यरात्री दोन वाजता पुईखडीच्या वळणावर उलटली. या अपघातात विराट विठ्ठलराव गौतम यांच्या पत्नी नीलू विराट गौतम (४८), मुलगी रिद्धिमा (१७) आणि मुलगा सार्थक (१३) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेले विराट गौतम बचावले. करवीर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. (Virat ended his life near Puikhadi)
या अपघातानंतर जखमी असलेले विराट गौतम बरे झाले. पण कुटुंबातील सर्व सदस्य गमावले असताना एकाकी जीवन जगताना त्यांना त्रास होता. त्यांनी ज्या ठिकाणी अपघातात झाला त्याच ठिकाणी आपले आयुष्य संपवले. त्यांनी फेसबुक पोस्टही केली होती. त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, आज कोल्हापुरात देहत्याग केला आहे. आतापर्यंत कसे जगत आलो हेच कळत नाही. काही माणसे आयुष्यात अशी असतात की त्यांच्याशिवाय जगणे अशक्य वाटते. माझे जग त्याच क्षणी संपले अशी भावनिक पोस्ट त्यांनी केली. (Virat ended his life near Puikhadi)