पुणे : प्रतिनिधी : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघांची मतमोजणी मंगळवार २७ ऑक्टोबर रोजी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडीच्या बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहे. पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीसाठी १०० टेबल असणार आहेत. यासाठी ५ कक्षात प्रत्येकी १० टेबलच्या २ रांगा अशी व्यवस्था करण्यात आली आहे. शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीसाठी ४२ टेबल असणार आहेत. यासाठी ३ कक्षात प्रत्येकी ७ टेबलच्या २ रांगा अशी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, दोन मतमोजणी सहायक आणि एक शिपाई असा कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला आहे. (Vote counting for the Pune Graduates’ and Teachers’ constituency elections)
दडपण न घेता मतमोजणी करावी
मतमोजणी कक्षात मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आज आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणास विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी श्रीमती तेली- उगले म्हणाल्या, मतमोजणीच्या फेरीदरम्यान शांततेत, चूक होऊ न देता आणि कोणतेही दडपण न घेता काम करावे. व्यवस्थित सर्व नमुने भरून संबंधित पथकाकडे जमा करावेत. नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक तेथे मार्गदर्शन, मदत देण्यात येईल. मतपत्रिका वैध अवैध बाबतचे मुद्दे, आक्षेप योग्यरित्या निकाली काढावेत. (Vote counting for the Pune Graduates’ and Teachers’ constituency elections)
प्रत्येक टेबलवर अचूकपणे काम करावे
मतपत्रिकांवरील पसंतीक्रमानुसार मतमोजणीची प्रक्रिया असल्याने प्रत्येक टप्प्यावर विशेष काळजी घ्यावी. प्रत्येक टेबलवरील पथकाने काळजीपूर्वक आणि अचूक काम करावे. प्रत्येकाने आपापली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी. मतमोजणी प्रक्रियेत टेबलवरील पर्यवेक्षक, सहायक, संबंधित अधिकारी आणि माहिती संकलन करणाऱ्या पथकांमध्ये समन्वय असणे आवश्यक असल्याचे श्रीमती तेली-उगले यांनी सांगितले.
अपर जिल्हाधिकारी तथा महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक अरुण आनंदकर यांनी शिक्षक मतदार संघातील मतमोजणी अधिकारी कर्मचाऱ्यांना आणि सह आयुक्त संजय पलांडे यांनी पदवीधर मतदार संघातील अधिकाऱ्यांना मतमोजणीशी संबंधित बाबींचे सविस्तर प्रशिक्षण दिले. मत मोजणी प्रक्रियेत सहभागी अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या शंकांचे श्री. पलांडे व श्री. आनंदकर यांनी निरसन केले.
यावेळी मतमोजणीची प्रक्रिया निर्धारित नियमांनुसार, वेळेत आणि काटेकोरपणे पार पाडण्याच्या दृष्टीने प्रशिक्षणात विविध बाबी स्पष्ट करण्यात आल्या. मतपेट्या उघडणे, ५० मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करणे, भरायचे विविध नमुने, मतपत्रिका वैध, अवैध अचूक वर्गीकरण करणे, प्रत्येक फेरीनुसार निकाल नमुना जमा करणे आदींसह मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया यांचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देण्यात आले. मतमोजणीसाठी करण्यात आलेल्या सर्व सुविधा व नियोजनाची माहिती यावेळी देण्यात आली. (Vote counting for the Pune Graduates’ and Teachers’ constituency elections)