मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्सची ५४१ पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. ३ सप्टेंबर २०२५ रोजी कोणत्याही शाखेतील पदवी धारण करणाऱ्या उमेदवाराला यासाठी अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत १४ जुलै २०२५ ही आहे. (SBI Recruitment)
- प्रवर्गनिहाय पदसंख्या अशी आहे
- अजा – ७५ ५, अज – ३७ ३६, इमाव – १३५, ईडब्ल्यूएस – ५०, खुला – २०३) दिव्यांग उमेदवारांसाठी २० पदे राखीव.
- वयोमर्यादा : २१ ते ३० वर्षे/(दि. १ एप्रिल २०२५ रोजी) (SBI Recruitment)
- वेतन श्रेणी – रु. ४८,४८० २,००० ८५,९२० मध्ये मूळ वेतन रु. ५६,४८०/- आगाऊ ४ वेतनवाढींसह अधिक इतर भत्ते. अंदाजे वेतन दरमहा रु. २०.४३ लाख प्रती वर्ष (सीटीसी).
निवड पद्धती - फेज-१ – ऑनलाइन प्रीलिमिनरी परीक्षा
- फेज-२ – मुख्य परीक्षा
- फेज-३ – सायकोमेट्रिक टेस्ट
निवड पद्धती, इतर तांत्रिक माहिती आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https:// bank. sbi/ web/ careers/ current- openings या संकेतस्थळाला भेट द्यावी.