सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी (ता. माळशिरस) हे गाव इव्हीएम विरोधातील आंदोलनाचे प्रेरणास्थान बनले आहे. विधानसभा निवडणुकीत इव्हीएमद्वारे मतदानामध्ये घोळ झाल्याचा राज्यभरातील लोकांचा संशय आहे. परंतु मारकडवाडी ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने केलेल्या कृतीला देशव्यापी आंदोलनाचे स्वरुप प्राप्त झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या गावाला भेट देऊन ग्रामस्थांच्या मागणीला समर्थन दिले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हेही इथून आंदोलनाची सुरुवात करणार आहेत. लोकशाहीमध्ये एखाद्या प्रक्रियेविषयी लोकांना शंका असेल तर ती तशीच रेटून नेणे लोकशाहीविरोधी आहे. देश किंवा राज्याचे सरकार ठरवणा-या निवडणुका पारदर्शी आणि निष्पक्ष व्हायच्या असतील, त्यावरील लोकांचा विश्वास बळकट व्हायचा असेल तर मतपत्रिकेद्वारे मतदानाची मागणी मान्य व्हायला हवी.
Solapur
कोल्हापूर; प्रतिनिधी : कुलाबा वेध शाळेने पुढील तीन दिवस कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह वीजा चमकून पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तामिळनाडू राज्यात फेंगल वादळामुळे दक्षिणेकडील राज्यावर परिणाम झाला असून कोल्हापूर जिल्ह्यातही ढगाळ वातावरण झाले आहे. मंगळवारी (दि.३) पहाटे पावसाच्या हलक्या सरीचा शिडकावा झाला. त्याचा फटका गुऱ्हाळघरे, साखर कारखाने आणि ऊस तोडणीवर होणार आहे.
बुधवारी (दि.४) कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. तर, गुरूवारी (दि.५) वादळी वाऱ्यासह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाटमाथा आणि सांगली, सोलापूर जिल्ह्यात पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. शुक्रवारी (दि.६) कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाची हीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. शनिवारी (दि.७) रोजी मात्र पाऊस नसणार आहे. असा अंदाज वेध शाळेने व्यक्त केला जात आहे.
सोलापूर : प्रतिनिधी : सोलापूर दक्षिण मतदारसंघात ऐनवेळी खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवार जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे मविआतील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अमर पाटील यांची कोंडी झाली. सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी सकाळी मतदान केले. त्यांनी त्यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली.
महाविकास आघाडीने अमर पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मात्र प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपाकडून सुपारी घेऊन अपक्षाला पाठिंबा दिला, असा संताप उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी व्यक्त केला.
हे दोघेही काँग्रेसचे नसून ही भाजपाची बी टीम आहे. प्रणिती शिंदे स्वत:च्या राजकारणासाठी पक्षाचे काम करत नाहीत. त्यांना लोकसभेला भाजपाने मदत केली अशी चर्चा आहे. त्यामुळे आता त्यामुळे या मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी दिलेले उमेदवार अमर पाटील यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे. तुमची शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी असेल. यापुढे सोलापूर जिल्ह्यात नाही तर कुठेही खासदार म्हणून निवडून येणार नाही याचा बंदोबस्त शिवसैनिक केल्याशिवाय राहणार नाहीत. शिवसैनिकांचा केसाने गळा कापण्याचे काम तुम्ही केले, असा आरोपही त्यांनी केला.
तसेच सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरचा विकास केला नाही, प्रणिती शिंदे यांनीही केला नाही. प्रणिती शिंदे यांना शिवसैनिकांनी मदत केली नसती तर स्वप्नातही खासदारकी बघता आली नसती. डिपॉझिट जप्त झाले असते, असे ते म्हणाले.
काडादी संयमी उमेदवार : सुशीलकुमार
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचा मतदार संघ आहे. येथून मी दोनदा निवडणूक लढविली आहे. जागावाटपात ठाकरे शिवसेनेने घाई केली. त्यामुळे मतदारसंघ शिवसेनेला सुटला. येथे काँग्रेसची मोठी ताकद आहे. तसेच धर्मराज काडादी हे शांत, संयमी उमेदवार असल्याने ते सर्वांचे ऐकून घेतात. त्यांना पुढे मोठे भविष्य असल्याने काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला आहे.
सोलापूर; विशेष प्रतिनिधी : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना सोलापूर वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ या दहा महिन्यांत सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी एकूण १४००० वाहनांवर १ कोटी ३८ लाख रुपये दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईचा वाहन चालकांनी चांगलाच धसका घेतला आहे.
*मॉडिफाइड सायलेन्सर अन् फॅन्सी नंबरप्लेटची वाहने*
सोलापूर शहरात मॉडिफाइड सायलेन्सर अन् फॅन्सी नंबरप्लेटच्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रत्येक वाहनाला वाहतूक पोलिसांकडून प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ या दहा महिन्यांत सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी एक कोटी ३८ लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.
सोलापूर शहर परिसरात मागील दोन वर्षांत शंभरहून अधिक जणांचा अपघाती मृत्यू झाल्याचे आरटीओकडील आकडेवारीतून स्पष्ट होते. वाहतूक पोलिसांकडून वारंवार बेशिस्त वाहनांवर कारवाई केली जाते, तरीदेखील अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करीत नाहीत. महामार्गांवरून ये-जा करताना दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती जरुरी आहे, पण शहरातील वाहनांना हेल्मेट सक्ती आहे की नाही यावर संभ्रम आहे.
अनेकदा वाहतूक पोलिस रस्त्यात आडवे जाऊन वाहनांना बाजूला घेतात. त्यावेळी इन्शुरन्स, पीयूसी, आरसीबूक, वाहन परवाना अशी सर्व कागदपत्रे असल्यानंतर हेल्मेटबाबत विचारणा केली जाते. त्यावेळी हेल्मेट नसल्याचा दंड केला जातो ही वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे अनेक वाहनचालक आपल्या वाहनांचे नंबरप्लेट व सायलेन्सरमध्ये बदल करून वाहने चालवितात. त्यांच्यावर आता पोलिसांनी फोकस केला आहे. निवडणुकीनंतर मात्र, शहरातील चौकाचौकात विशेष मोहीम राबवून बेशिस्त वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
आकडे बोलतात
- कारवाईचा कालावधी : १० महिने
- मॉडिफाइड सायलेन्सरची वाहने : १,५८९
- फॅन्सी नंबरप्लेटची वाहने : १२,२१८
- एकूण दंड : १.३८ कोटी
पोलिसांची विशेष मोहीम
प्रत्येक वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असून नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ या काळात मॉडिफाइड सायलेन्सर लावणारी वाहने व फॅन्सी नंबरप्लेटच्या सुमारे १२ हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय वाहनाचा इन्शुरन्स नाही, पीयूसी नाही, फिटनेस प्रमाणपत्र नाही, अशा वाहनांवरही कारवाई केली जात असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त सुधीर खिराडकर यांनी दिली