कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या दिवंगत सचिव ज्ञानज्योती प्राचार्या शुभांगी गावडे यांच्या ५४ व्या जयंतीचे औचित्य साधून सोळांकूर (ता. राधानगरी) येथे न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल या नव्या शाखेचे उद्घाटन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते झाले. (Inauguration of the ‘New Model English School’ branch)
प्रत्येक वाढदिवसाला नवी शैक्षणिक शाखा स्थापनेचा संकल्प
शुभांगी गावडे यांच्या प्रत्येक वाढदिवसाला एक नवी शैक्षणिक शाखा स्थापन करण्याचा दृढ संकल्प त्यांचे सुपुत्र कौस्तुभ गावडे यांनी २०२१ साली केला होता. दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज, इचलकरंजी, विवेकानंद करिअर ॲकेडेमी, वारुळ या शाखांच्या स्थापना गावडे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आली. मातोश्रींच्या निधनानंतरही त्यांचा हा शैक्षणिक वारसा अविरत सुरू ठेवत, त्यांच्या जयंतीदिनी सोळांकूर येथे या नवीन इंग्रजी माध्यमाच्या शाळेची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून कौस्तुभ गावडे यांनी आपला संकल्प पूर्ण करत मातोश्रींना एक आदरयुक्त आणि अनोखी ज्ञान-श्रद्धांजली वाहिली आहे. सोळांकूर आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी ही शाळा ज्ञानाचे एक नवे केंद्र ठरेल, असा विश्वास या वेळी मान्यवरांनी व्यक्त करण्यात आला.
यावेळी एम.डी.तोरस्कर, निवास पाटील, ए बी पाटील, एस.टी. पानारी, नंदकिशोर सुर्यवंशी, के जी पाटील, केरबा पाटील, कमलाकर पाटील, विलास पाटील, दयानंद लोहार, मधुकर पाटील, धनाजी चौगुले, डॉ.युवराज तोरस्कर हे उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक आर.एम.कांबळे यांनी केले तर आभार एस.व्ही.नारकर सर यांनी मानले. सूत्रसंचालन सदाशिव पाटील यांनी केले. (Inauguration of the ‘New Model English School’ branch)
शुभांगी गावडेंच्या जीवनप्रवासाचे छायाचित्र प्रदर्शन
विवेकानंद कॉलेज येथे शुभांगी गावडे यांचे कार्य व जीवनप्रवास” या विषयावरील छायाचित्र प्रदर्शन तसेच भारती विद्यापीठाच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते छायाचित्र प्रदर्शन व आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणा़त अभयकुमार साळुंखे म्हणाले, “स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत प्रशासनासोबत ममत्व आणि मातृत्वही प्राचार्य शुभांगीताई गावडे यांनी पेरले. प्रशासक म्हणून त्यांनी संस्थेला दिशा दिली, तर आईच्या मायेने शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना आपलेसे केले. त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.”
प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी स्वागत व प्रास्ताविक करून कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर डॉ. श्रद्धा जाधव यांनी उपस्थितांना महिला सक्षमीकरणाची शपथ दिली. समाजात स्त्री-पुरुष समानता, महिलांचा सन्मान, सुरक्षितता, स्वावलंबन आणि संवेदनशीलतेची मूल्ये जपण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी केला.
५०० झाडांचे रोपन
विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर आणि दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने माले (ता.हातकणंगले) येथे ५०० झाडांचे रोपण मुरलीधर गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच राहुल कुंभार, उपसरपंच संतोष खोत, ग्रामपंचायत सदस्य प्रताप पाटील, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची पतसंस्थेचे चेअरमन हितेंद्र साळुंखे, ॲड. हितेश रानिंगा, प्राचार्य धनराज भोसले, निलेश साळुंखे, महेश साळुंखे, सिद्धेश साळुंखे, प्रा डॉ. अजिंक्य पत्रावळे, डॉ. सुनील भोसले, डॉ. संदीप पाटील, डॉ. प्रदीप पाटील, प्रा. निलेश जाधव उपस्थित होते
शहरातील शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप
कोल्हापूर शहरातील लोकमान्य विद्यालय, मिलिंद हायस्कूल, सरस्वती चुनेकर हायस्कूल, आर.के.वालावलकर हायस्कूल, श्री राम विद्यालय या शाळांमध्ये संस्थेच्या वतीने गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनि.कॉलेजच्या वतीने साडी वाटप व प्राचार्या सौ शुभांगीताई गावडे यांच्या कार्याचा आढावा घेणारे पोस्टर प्रदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार डॉ. कविता तिवडे यांनी मानले, तर सूत्रसंचालन डॉ. सुप्रिया पाटील, प्रा. समीक्षा फराकटे, डॉ. मृणालिनी देसाई यांनी केले यावेळी डॉ. सी. बी. पाटील, प्रा. डॉ. एकनाथ आळवेकर, प्रा. मयुरी पाटील, प्रा. पल्लवी देसाई पाटील यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच विविध समित्यांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Inauguration of the ‘New Model English School’ branch)