कोल्हापूर : शिरोली मॅन्युफॅक्चर असोसिएशन स्मॅकच्या अध्यक्षपदी चौगुले सिमेंट पाईप कंपनीचे जयदीप जयसिंगराव चौगले, तर उपाध्यक्षपदी सरोज ग्रुप ऑफ कंपनीजचे भरत परशुराम जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष राजू पाटील होते.
तसेच स्मॅक आयटीआयच्या अध्यक्षपदी उषा एंटरप्राईजेसचे प्रशांत शिवाजीराव शेळके यांची फेरनिवड करण्यात आली. सचिवपदी पॉप्युलर भूमी ग्रुपचे रणजीत चंद्रकांत जाधव, तर खजानिसपदी शुभम टर्निंग सेंटरचे बदाम लक्ष्मण पाटील आणि स्मॅक फाउंड्री क्लस्टर अध्यक्षपदी चौगुले फौंड्रीचे सुरेश चौगुले यांची निवड करण्यात आली. यावेळी संचालक सुरेन्द्र जैन, अतुल पाटील, नीरज झंवर, सचिन पाटील, शेखर कुसाळे उपस्थित होते. (Jaideep Chowgale)
औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक आणि कामगार वर्गाच्या आर्थिक, सामाजिक तसेच औद्योगिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली उद्योजकांची शिखर संस्था म्हणून शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन स्मॅकची ओळख आहे. (Jaideep Chowgale)
गेल्या पाच दशकांपासून उद्योगजगताच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेने उद्योग उभारणीपासून सामाजिक जबाबदारीपर्यंत अनेक उल्लेखनीय उपक्रम राबवले आहेत. सध्या संस्था आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले असून मोठ्या उत्साहात सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणार असल्याचे नुतन अध्यक्ष जयदीप चौगले आणि सुवर्ण महोत्सवी समिती अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी सांगितले. (Jaideep Chowgale)