कोल्हापूर; प्रतिनिधी : निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची वेळ जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसे इच्छुकांकडून नेत्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या आहेत. राधानगरी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास असलेले इच्छुक माजी आमदार के.पी. पाटील यांनी आज (दि.२०) मुंबईत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीने राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Kolhapur Politics)
महायुतीच्या जागा वाटपानुसार राधानगरी विधानसभा मतदार संघ हा शिवसेना शिंदे गटाकडे असून तिथे विद्यमान शिंदे गटाचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. त्यामध्ये मुहायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार के.पी. पाटील यांची गोची झाली आहे. (Kolhapur Politics)
यापूर्वी त्यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची भेटी घेतल्या आहेत. आज के.पी. पाटील यांनी मुंबईत खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. सुमारे अर्धातास दोघांमध्ये चर्चा झाली असून राधानगरी विधानसभा मतदार संघाचा पूर्ण आढावा राऊत यांनी घेतला. के.पी. पाटील यांनी चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगितले. के.पी. पाटील यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाची उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
हेही वाचा :