महाराष्ट्राच्या भल्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी भूमिका दोन्हीकडील कार्यकर्त्यांनी वेळोवेळी मांडली. त्यांना त्यासंदर्भात आवाहन केलं, परंतु ठाकरे बंधूंनी त्याला प्रतिसाद दिला नाही. नाही म्हणायला एकदा राज ठाकरे यांनी टाळीसाठी हात पुढे केला होता, परंतु त्याला उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला नाही. आता मात्र राज ठाकरे यांनी भूमिका मांडली आणि त्याला उद्धव ठाकरे यांनीही प्रतिसाद दिला आहे. खरंच ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात का याची उत्सुकता महाराष्ट्राला लागून राहिली आहे. (Raj-Uddhav Alliance)
काय म्हणाले राज ठाकरे?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष Raj Thackeray यांनी महाराष्ट्राच्या भल्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत एकत्र येण्यास कोणतीही अडचण नसल्याचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्राच्या हितापुढे आमची भांडणं, वाद क्षुल्लक असल्याचं राज ठाकरे एका मुलाखतीत म्हणाले. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे. (Raj-Uddhav Alliance)
उद्धव ठाकरे यांचा प्रतिसाद
त्याला उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कामगार सेनेच्या मेळाव्या बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी सोबत येण्यास तयार आहे. माझ्याकडून सगळी भांडणं मिटली. पण माझी एक अट आहे. माझ्यासोबत जाऊन हित आहे की भाजपसोबत जाऊन हित आहे, ते आधी ठरवा. (Raj-Uddhav Alliance)
राज यांनी टाळीसाठी हात पुढे केलेला असताना उद्धवदेखील टाळी देण्यास पुढे आल्याचे चित्र आहे. दोन्ही ठाकरेंच्या विधानांमुळे त्यांच्या एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. आणि शिवसेना-मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचे पाहावयास मिळते.
राज ठाकरे यांनी २००६ मध्ये शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) स्थापन केली. तेव्हापासून या दोन्ही भावांच्या वाटा वेगळ्या आहेत. दोघेही स्वतंत्र राजकीय मार्गावर चालत राहिले. परंतु काही प्रसंगी त्यांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवर चर्चा झाल्या.(Raj-Uddhav Alliance)
ठाकरे बंधूंचा राजकीय प्रवास
२००६: राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून मार्च २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) स्थापन केली. यामागील मुख्य कारण होते शिवसेनेत उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्ष म्हणून झालेली नियुक्ती. आणि पक्षात राज यांना अपेक्षित महत्त्व न मिळणे. यामुळे ठाकरे बंधूंमधील राजकीय दरी रुंदावली आणि त्याची परिणती बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्यात झाली.
२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांनी बेरोजगारीसारख्या मुद्द्यांवर स्वतंत्रपणे आंदोलने केली. त्यावेळी राज ठाकरे यांनी भाजप आघाडीच्या विरोधात पर्यायाने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाजूने प्रचार केला होता. तर उद्धव यांची शिवसेनेला भाजपसोबत युतीत होती. (Raj-Uddhav Alliance)
२५ जानेवारी २०२१ रोजी, बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात राज आणि उद्धव एकत्र आले होते. कौटुंबिक जवळीकीमुळे पुन्हा एकदा राजकीय युतीच्या शक्यतेवर चर्चा झाल्या. परंतु, यावेळी कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. (Raj-Uddhav Alliance)
२०२२: शिवसेना फुटी आणि नव्या चर्चा
जून २०२२ मध्ये Eknath Shinde यांच्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडली आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले. यानंतर, ठाकरे गट आणि मनसे यांच्यात युतीच्या शक्यतेवर पुन्हा चर्चा सुरू झाल्या. काही कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी सोशल मीडियावर आणि सार्वजनिक मंचांवर दोघांनी एकत्र यावे, अशी मागणी केली.
याच वर्षी, दादर येथे मनसेचे पदाधिकारी लक्ष्मण पाटील यांनी एक बॅनर लावले. ज्यामध्ये “महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. राजसाहेब… उद्धवसाहेब आता तरी एकत्र या” असे आवाहन केले गेले. या बॅनरमुळे युतीच्या चर्चांना उधाण आले, परंतु प्रत्यक्षात काहीही घडले नाही. (Raj-Uddhav Alliance)
२०२३ : राष्ट्रवादी फुटीमुळे पुन्हा चर्चा
जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या बंडामुळे फूट पडली. महाराष्ट्राच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झाली आणि राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चां पुन्हा सुरू झाल्या.
चार जुलै २०२३ रोजी, राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना उद्धव यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी, उद्धव यांच्या मातोश्री निवासस्थानी ठाकरे गटाची बैठक झाली, परंतु युतीसंदर्भात कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही.
६ जुलै २०२३ रोजी, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितले की, अभिजीत पानसे यांनी संजय राऊत यांची घेतलेली भेट वैयक्तिक होती आणि त्यात राजकीय चर्चा झाली नसावी. (Raj-Uddhav Alliance)
७ जुलै २०२३ रोजी, संजय राऊत यांनी युतीच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, शिवसेना स्वबळावर लढेल आणि कोणत्याही दगडांवर पाय ठेवून राजकारण करणार नाही. यामुळे युतीच्या शक्यतेला धक्का बसला.
९ जुलै २०२३ रोजी, राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी युतीच्या चर्चांवर भाष्य करताना सांगितले की, दोन भावांपेक्षा एक भाऊ (म्हणजे राज ठाकरे) स्वतंत्रपणे मजबूत आहे. यामुळे युतीची शक्यता मावळली.
१६ जुलै २०१२ रोजी उद्धव ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल केले. तेव्हा राज ठाकरे अचानक दौरा सोडून मुंबईत परत आले. आणि उपचारानंतर स्वतःच्या गाडीतून त्यांना मातोश्रीवर सोडले. तेव्हाही दोघांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु उद्धव ठाकरे त्यानंतरही आपला ताठरपणा कमी केला नव्हता.
२०१७ मध्येही अशाच चर्चा सुरु होत्या. त्यावेळी उद्धव यांचा पक्ष एकसंध होता. शिवसेना राज्यातील सरकारमध्ये भाजपसोबत होती. मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढले. या निवडणुकीआधी राज ठाकरे यांनी टाळीसाठी हात पुढे केला होता. पण त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्याला प्रतिसाद दिला नव्हता. किंवा तो झिडकारला होता.
२०२४ : निवडणुकीपूर्वी युतीच्या शक्यतेवर पुन्हा चर्चा
एप्रिल २०२४ मध्ये, संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, मनसेसोबत युतीसंदर्भात शिवसेना (ठाकरे गटात) कधीही चर्चा झाली नाही. त्यांनी राज आणि उद्धव यांचे कौटुंबिक नाते एकत्र असले तरी राजकीय मार्ग वेगळे असल्याचे नमूद केले.
नोव्हेंबर २०२४ मध्ये, विधानसभा निवडणुकीदरम्यान माहिम मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे Amit Thackeray आणि ठाकरे गटाचे महेश सावंत यांच्यात थेट लढत झाली. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव यांच्या शिवसेनेवर उर्दू पत्रके आणि मुस्लिम उमेदवार उभे केल्याबद्दल टीका केली. एकनाथ शिंदे यांचाही उमेदवार इथे असल्यामुळे अमित ठाकरे यांचा पराभव झाला. त्याचवेळी वरळी मतदारसंघातही आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांच्याविरोधात मनसेने संदीप देशपांडे यांना उभे केल्यामुळे दोन्ही सेनांमधील संघर्ष अटीतटीचा बनला. (Raj-Uddhav Alliance)
राज ठाकरे यांची एकनाथ शिंदे यांनी भेट घेतल्यानंतर उद्धव यांना युतीचा प्रस्ताव दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. दरम्यानच्या काळात ठाकरे बंधूंच्या या विधानामुळे चर्चा पूर्ण उलट्या दिशेने वळली आहे.
राज आणि उद्धव ठाकरे यांनी परस्परांना दिलेली ताजी टाळी हा आतापर्यंतचा सर्वात ठोस प्रयत्न दिसतो. तरीही, त्यांचे राजकीय मार्ग (महायुती आणि महाविकास आघाडी) आणि विचारधारा यामुळे युती प्रत्यक्षात येण्यास अडथळे येऊ शकतात.
टाळी आता नाही तर कधीच नाही
आता पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे आताही मुंबई महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. दोन ठाकरे एकत्र आल्याचा फटका एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपला बसू शकतो. मुंबई महापालिकेतील उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे वर्चस्व संपवण्याचा चंग भाजपने बांधला आहे. भाजपला राज ठाकरे सोबत हवे आहेत, पण त्यांना थेटपणे सोबत घेण्यात अडचणही आहे. राज यांनी उत्तर भारतीयांबद्दलची भूमिका आणि आता शालेय शिक्षणात हिंदीच्या सक्तीवरुन त्यांनी घेतलेली भूमिका भाजपसाठी अडचणीची आहे. एक गोष्ट खरी की, आताची परिस्थिती दोघांनाही एकत्र येण्यासाठी पोषक आहे. महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. अशा परिस्थितीत ही टाळी आता वाजली नाही, तर भविष्यात लवकर ती वाजण्याची शक्यता दिसत नाही. (Raj-Uddhav Alliance)
ठाकरे बंधू एकत्र येण्याची ही चर्चा कशी वळणे घेते, टाळी कशी वाजते आणि तिचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचल्यावर तिथून कशी प्रतिक्रिया येते, हे हे पाहावे लागणार आहे.
हेही वाचा :
‘ब्राह्मणांवर मुततो’ असं अनुराग कश्यप का म्हणाला?
शपथ घ्या, मग हाळी द्या