कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतीमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली. ३३ नगरपारिषदांपैकी १६ नगरपरिषदेमध्ये अनुसुचित जाती महिला गटासाठी आरक्षण जाहीर झाले. त्यामध्ये मोहोळ, ओझर, भुसावळ, शिर्डी, दिग्रस, अकलूज, बीड नगरपरिषदांचा समावेश आहे. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील सभागृहात मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाची सोडत काढण्यात आली. नगराध्यक्षपद कोणत्या गटासाठी जाहीर होणार याची उत्सुकता लागली होती. त्यामुळे ज्या वर्गासाठी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे त्या वॉर्डामध्ये प्रबळ उमेवार शोधण्यासाठी राजकीय पक्षांचा कस लागणार आहे. (Nagaradhkshy)
सुप्रिम कोर्टाने ३१ जानेवारीपूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका सर्वप्रथम होणार असून दिवाळीनंतर या निवडणूकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सोडत पूर्ण झाली आहे. १३ ऑक्टोबर रोजी गण आणि गटासाठी आरक्षण प्रक्रिया होणार आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतीतील प्रभाग आरक्षण आठ ऑक्टोबरला होणार आहे. (Nagaradhkshy)
कोल्हापूर जिल्ह्यात महिलाराज
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये महिला राज असणार आहे. गडहिंग्लज नगरपालिकेसाठी अनुसुचित जाती पुरुष प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. पन्हाळा, कागल, मुरगुड, कुरुंदवाड या नगरपालिकेत सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. शिरोळमध्ये अनुसुचित जाती महिला प्रवर्गाला नगराध्यक्षपदाची संधी मिळती आहे. (Nagaradhkshy)
अनुसुचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षण
३३ नगरपरिषदापैकी १६ नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर
देऊळगावराजा , मोहोळ , तेल्हारा, ओझर, वानाडोंगरी, भुसावळ, घुग्गुस, चिमूर, शिर्डी, सावदा, मैनदर्गी, दिगडोहदेवी, दिग्रस, अकलूज, बीड, शिरोळ
अनुसुचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षण
अनुसूचित जमातीमध्ये प्रवर्गात पुढील नगरपरिषदांसाठी महिला आरक्षण जाहीर-
भडगाव (जळगाव), वणी, पिंपळनेर (धुळे), उमरी (नांदेड), यवतमाळ, शेंदूरजनघाट.
इतर मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी आरक्षण
६७ नगरपरिषदपैकी ३४ ओबीसी महिलासाठी आरक्षित- भगूर, विटा (सांगली), बल्हारपूर, धारशिव, भोकरदन, जुन्नर, दौड, कुळगाव बदलापूर, हिंगोली, फुलगाव, मुरुड जंजीरा, शिरुर, कोटोल, माजलगाव, मूल, मालवण, देसाईगंज, हिवरखेड, अकोट, मोर्शी, नेर-नवाबपूर, औसा, कर्जत, देगलूर, चोपडा, सटाणा, दोंडाईचा वरवडे, बाळापूर, रोहा, कुर्डुवाडी, धामणगाव रेल्वे, वरोरा. (Nagaradhkshy) नगर परिषदांमधील अनुसूचित जातीसाठी आरक्षित पदे (एकूण 33 पदे)*
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी (सर्वसाधारण) आरक्षित नगरपरिषद (16 पदे)
1. पांचगणी, 2. हुपरी, 3. कळमेश्वर, 4. फुरसुंगी ऊरुळी-देवाची, 5. शेगांव, 6. लोणावळा, 7. बुटीबोरी, 8. आरमोरी, 9. मलकापूर, जि.सातारा, 10. नागभिड, 11. चांदवड, 12. अंजनगांवसूर्जी, 13. आर्णी, 14. सेलू, 15. गडहिंग्लज, 16. जळगांव-जामोद,
*अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आरक्षित नगर परिषदा :-*
अनुसुचित जमातीसाठी एकूण 11 पदांपैकी 6 पदे महिलांसाठी आरक्षित आहेत.
• अनुसुचित जमाती महिलांसाठी आरक्षित (6 पदे)
1. पिंपळनेर, 2. शेंदूरजनाघाट, 3. भडगांव, 4. यवतमाळ, 5. उमरी, 6. वणी
• अनुसुचित जमाती सर्वसाधारण प्रवर्ग (5 पदे)
1. पिंपळगांव-बसवंत, 2. राहुरी, 3. एरंडोल, 4. अमळनेर, 5. वरुड
*नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी नगर परिषदा :-*
एकूण 247 नगरपरिषदांमधून 67 पदे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत.
• नागरिकांचा मागास प्रवर्गातील (सर्वसाधारण) आरक्षित पदे (33 पदे)
1. तिरोडा, 2. वाशिम, 3. भद्रावती, 4. परांडा, 5. नंदुरबार, 6. खापा, 7. शहादा, 8. नवापूर, 9.त्र्यंबक, 10. कोपरगांव, 11. मंगरुळपीर, 12. कन्हान-पिंपरी, 13. पाथर्डी, 14. रामटेक, 15, नशिराबाद, 16.पालघर, 17. वरणगांव, 18. मलकापूर, जि.बुलडाणा, 19. इस्लामपूर, 20. मोहपा, 21. तुमसर, 22. महाड, 23. राहता, 24. श्रीवर्धन, 25. ब्रम्हपूरी, 26. दर्यापूर, 27. वैजापूर, 28. गोंदिया, 29. सांगोला, 30. वर्धा, 31. येवला, 32. कंधार, 33. शिरपूर-वरवाडे.
• नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव पदे (34 पदे)
1. धामणगांव रेल्वे, 2. भोकरदन, 3. भगूर , 4. मालवण , 5. वरोरा , 6. हिंगोली , 7. मोर्शी , 8. उमरेड , 9. हिवरखेड , 10. बाळापूर , 11. शिरुर , 12. कुळगांव-बदलापूर , 13. देगलूर , 14. नेर-नबाबपूर , 15. धाराशिव , 16. इगतपूरी , 17. माजलगांव , 18. मुल , 19. बल्लारपूर , 20. जुन्नर , 21. कुर्डूवाडी , 22. औसा , 23. मुरुड-जंजिरा , 24. अकोट , 25. विटा , 26. चोपडा , 27. सटाणा , 28. काटोल , 29. दौंड , 30. रोहा , 31. देसाईगंज , 32. पुलगांव , 33. कर्जत, जि.रायगड , 34. दोंडाईचा-वरवाडे.
*खुल्या प्रवर्गातील नगर परिषदांचे आरक्षित*
एकूण 247 पैकी 136 पदे ही खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असून यापैकी 68 पदे ही महिलांसाठी राखीव आहेत.
खुला प्रवर्ग (सर्वसाधारण)
1 फलटण, 2 अहमदपूर, 3 पाथरी, 4 चाळीसगांव, 5 तळोदा, 6 वाई, 7 नांदगांव, 8 जयसिंगपूर, 9 निलंगा, 10 लोहा, 11 खोपोली, 12 राजगुरूनगर
13 कराड, 14 जेजुरी, 15 उमरगा, 16 आळंदी, 17 पुसद, 18 बारामती
19 जत, 20. पारोळा, 21 तळेगांव-दाभाडे, 22 सासवड, 23 गडचांदुर, 24 रिसोड, 25 वेंगुर्ला, 26 पातूर, 27 किल्लेधारुर, 28 चिखली, 29 मेहकर, 30 दारव्हा, 31 सिल्लोड, 32 सिन्नर, 33 देवळी, 34 मुरूम, 35 वडगांव, 36 महाबळेश्वर, 37 आष्टा, 38 दुधणी, 39 कुंडलवाडी, 40 खुलताबाद, 41 नरखेड, 42 राजूरा, 43 सिंदखेडराजा, 44 वाडी, 45 डहाणू, 46 देवळाली-प्रवरा, 47 कामठी, 48 अक्कलकोट, 49 सातारा, 50 भोर, 51 इंदापूर, 52 चिपळून, 53 माथेरान, 54 श्रीगोंदा, 55 श्रीरामपूर, 56 मनमाड, 57 नळदुर्ग, 58 भोकर, 59 बिलोली, 60 अंबेजोगाई, 61 जिंतूर, 62 सोनपेठ, 63 गंगापूर, 64 पांढरकवडा, 65 घाटंजी, 66 मुर्तीजापूर, 67 चिखलदरा, 68 तुळजापूर.
*खुला प्रवर्गाताली महिलांसाठी नगरपरिषदा*
1. परळी-वैजनाथ, 2. मुखेड, 3. अंबरनाथ, 4. अचलपूर ,5. मुदखेड 6. पवणी 7. कन्नड , 8. मलकापूर, जि.कोल्हापूर , 9. मोवाड , 10. पंढरपूर , 11. खामगांव , 12. गंगाखेड , 13. धरणगांव , 14. बार्शी , 15. अंबड , 16. गेवराई , 17. म्हसवड , 18. गडचिरोली , 19. भंडारा , 20. उरण , 21. बुलडाणा , 22. पैठण , 23. कारंजा , 24. नांदुरा , 25. सावनेर , 26. मंगळवेढा , 27. कळमनूरी , 28. आर्वी , 29. किनवट , 30. कागल , 31. संगमनेर , 32 मुरगुड , 33 साकोली , 34 कुरुदंवाड , 35 पुर्णा , 36 कळंब , 37 चांदुररेल्वे , 38 चांदुरबाजार , 39 भुम , 40 रत्नागिरी , 41 रहिमतपूर , 42 खेड , 43 करमाळा , 44 वसमत, 45 हिंगणघाट , 46 रावेर , 47 जामनेर , 48 पलुस , 49 यावल , 50 सावंतवाडी , 51 जव्हार, 52 तासगांव , 53 राजापूर , 54 सिंधीरेल्वे , 55 जामखेड , 56 चाकण , 57 शेवगांव, 58 लोणार, 59 हदगांव, 60 पन्हाळा, 61 धर्माबाद, 62 उमरखेड, 63 मानवत, 64 पाचोरा , 65 पेण , 66 फैजपूर , 67 उदगीर, 68 अलीबाग.
*नगर पंचायतीचे आरक्षण*
राज्यातील 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण आज काढण्यात आले. यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण 18 जागा आरक्षित असून यामध्ये महिलांसाठी 9 व सर्वसाधारण साठी 9 पदे आरक्षित आहेत. तर अनुसूचित जमातीसाठी 13 जागा असून त्यामध्ये 7 जागा महिलांसाठी व 6 जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत. तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण 40 पदे आरक्षित असून त्यामध्ये 20 जागा महिलांसाठी व 20 जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत. खुल्या प्रवर्गासाठी एकूण 76 जागा असून 38 जागा महिलांसाठी व 38 जागा या सर्वसाधारण गटासाठी आरक्षित आहेत.
*अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव* :-
महिलांसाठी आरक्षित नगरपंचायती (9 पदे)
1 .निलडोह, 2. गोधनी(रेल्वे), 3. कोरची, 4. बहादुरा , 5. धानोरा, 6. गौंडपिंपरी, 7. ढाणकी , 8. अहेरी , 9. बेसा-पिपळा
*अनुसूचित जाती प्रवर्ग (सर्वसाधारण)*
येरखेडा, कांद्री (कन्हान), भिसी, कुरखेडा, देवरी, माळेगांव(ब्रु.), बिडगांव-तरोडी (खुर्द)-पांढुर्णा, भातकुली, दहीवडी.
अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव:-
महिलांसाठी आरक्षित नगर पंचायती (7 पदे)
भिवापूर, अर्जुनी-मोरगांव, सिरोंचा , हिंगणा, समुद्रपूर, पाली, देवळा.
अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) (6 पदे)
कोरपणा, कळंब, माणगांव, गोरेगांव, सेलू , सिंदेवाही
*नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी राखीव (40 पदे)* :-
• सर्वसाधारण गटासाठी आरक्षित (20 पदे)
पारनेर, तळा, खानापूर, पालम, मंठा, कोंढाळी, माळशिरस , एटापल्ली, झरी-जामणी, पोंभूर्णा , माहूर, आटपाडी, मालेगांव-जहांगिर, तिर्थपूरी, कणकवली, शिरुर-कासार, विक्रमगड, अकोले , मोखाडा, सुरगणा.
• नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित (20 पदे)
घनसावंगी, भामरागड, मंचर, पाटोदा, माढा, कळवण, सावली, मानोरा, मारेगांव, आष्टी, जि.वर्धा, तलासरी, वडवणी, पोलादपूर, खालापूर, शिरुर-अनंतपाळ, जाफ्राबाद, चाकूर, आष्टी, जि.बीड, जिवती, कर्जत, जि.अहिल्यानगर.
*खुल्या प्रवर्गासाठी नगर पंचायती (एकूण 76 पदे)*
• खुला (सर्वसाधारण) (38 पदे)
शेंदूर्णी , साक्री, सालेकसा, कवठे-महांकाळ, देवणी, मोताळा, अर्धापूर, बोदवड, हिमायतनगर, कसई-दोडामार्ग, मुलचेरा, धडगांव-वडफळ्या, कुडाळ, कोरेगांव, दापोली, वाभवे-वैभववाडी, निफाड, चंदगड, चार्मोर्शी, बदनापूर, कारंजा, धारणी, फुलंब्री, हातकणंगले, लोहारा (ब्रु.), मुरबाड, केज, आजरा, संग्रामपूर, खंडाळा, वडूज, देवगड-जमसंडे, नेवासा, मौदा, शिराळा (जि.सांगली), नायगाव, सेनगाव, महागाव.
• खुला प्रवर्गातील महिलांसाठी :- (पदे 38)
1. बाभुळगांव, 2. मुक्ताईनगर, 3. कुही, 4. देहू, 5. शहापूर, 6. पारशिवनी, 7. वडगांव-मावळ, 8. तिवसा, 9. मंडणगड, 10. शिंदखेडा, 11. लांजा, 12. देवरुख, 13. वाडा, 14. लोणंद, 15. मेढा, 16. जळकोट, 17. दिंडोरी, 18. सडक-अर्जुनी, 19. म्हसळा, 20. नातेपुते, 21. रेणापूर, 22. लाखणी, 23. औंढा-नागनाथ, 24. पाटण, 25. पेठ, 26. कडेगांव, 27. अनगर, 28. महादूला, 29. सोयगांव, 30. वैराग, 31. लाखांदूर, 32. राळेगांव, 33. गुहागर, 34. नांदगांव-खडेश्वर, 35. महाळुंग-श्रीपूर, 36. वाशी, जि.धाराशिव, 37. बार्शी-टाकळी, 38. मोहाडी.