नाशिक : प्रतिनिधी : भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रातील तीन पक्ष चालवतात, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. नासिक येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे निर्धार शिबिर आजपासून नाशिकमध्ये सुरू झाले. शिबिरापूर्वी पत्रकारांशी बोलताना त्यांनी टीका केली. (Three parties)
संजय राऊत म्हणाले, आम्ही आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटतो. पण अजित पवार यांची तक्रार घेऊन शिवसेना शिंदे गटाचे पक्षप्रमुख असलेले एकनाथ शिंदे अमित शहा यांच्याकडे गेले होते. अमित शहा हे एकनाथ शिंदे यांचे पक्षप्रमुख आहेत. अमित शहा महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष चालवतात. ते तीन पक्षाचे प्रमुख आहेत हा एक मोठा विक्रम आहे. शहा हे अधूनमधून रामदास आठवलेंचाही पक्ष चालवतात. राज ठाकरे यांच्या पक्षाविषयी मी काही सांगू शकत नाही पण त्याचा पक्ष सुद्धा भाजपचा मित्रपक्ष आहे. त्यांची ध्येयधोरणं काय असावी हे सुद्धा दिल्लीत ठरते. (Three parties)
राऊतांची उदय सामंतावरही टीका
उदय सामंत हे बाळासाहेबांची शिवसेना हीच आमची खरी शिवसेना असे म्हणतात या प्रश्नावर राऊत यांनी मूळ शिवसेनेमध्ये उदय सामंत कधी? आणि का आले होते. तुम्ही व्यापारी आहात, तुम्ही पैसा कमवायला आला होता, असा आरोपही राऊत यांनी केला. उदय सामंत यांच्यासारख्या उदयोजक राजकारण्यांनी बाळासाहेब ठाकरेवर न बोललं बरं असा टोलाही त्यांनी मारला. (Three parties)
नेहरुंची संपत्ती जप्त, दाऊदची मुक्त
नॅशनल हेराल्ड संदर्भात बोलताना राऊत म्हणाले, पंडीत नेहरु यांची संपत्ती जप्त केली आणि दाऊद इब्राहिम आणि इकबाल मिरचीची संपत्ती सरकारने मुक्त केली. या देशामध्ये दाऊद आणि मिरचीला अभय आहे पण नॅशनल हेराल्डवर जप्ती आणली जाते. आमच्यासमोर कोणीतरी विरोधक उभा आहे आणि आम्हाला प्रश्न विचारतो हे त्यांना सहन होत नाही. यालाच हुकुमशाही म्हणतात. हिटलर, इदी आमीन, स्टॅलिन हेच करत होता. आमच्या देशात वेगळं काय चाललयं? असेही राऊत म्हणाले. (Three parties)
हेही वाचा :