मुंबई : सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यात एकापेक्षा जास्त जणांचा सहभाग असावेत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळणार असल्याची चिन्हे आहेत. त्या दिशेने पोलीस आता तपास करत आहेत.(Saif Attack)
हल्ल्याच्या घटनेनंतर तीन दिवसांनी, १९ जानेवारीला पोलिसांनी शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर उर्फ विजय दास या बांगलादेशी नागरिकाला ठाण्यातून अटक केली. न्यायालयाने शरीफुलच्या पोलीस कोठडीत २९ जानेवारीपर्यंत वाढ केली आहे. कोठडी वाढवण्याची मागणी करताना पोलिसांनी या प्रकरणात आणखी काही लोक सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला. एका अधिकाऱ्यानेच ही माहिती वृत्तसंस्थेला दिली. .(Saif Attack)
अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले की, शरीफुल तपास पथकाला सहकार्य करत नव्हते. त्याने सैफ अली खानवर हल्ला करण्यासाठी वापरलेला चाकू ज्या दुकानातून खरेदी केला होता ते दुकान कोणते हे त्याने सांगितले नाही.
दरम्यान, आरोपी शरीफुलच्या वडिलांनी तो निर्दोष असल्याचा दावा केला आहे. लवकरच आपल्या मुलाच्या सुटकेसाठी बांगला देशचे परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय उच्चायुक्तांकडे संपर्क साधणार आहे. शरीफुल इस्लामचे वडील मोहम्मद रुहुल यांनी भारतात वास्तव्य करण्यासाठी शरीफुलकडे योग्य कागदपत्रे नाहीत त्यामुळे त्याला अटक होण्याची भीती सतत वाटत होती, असे सांगितले. (Saif Attack)
आपल्या मुलाच्या अटकेबद्दल आपल्याला फेसबुक आणि न्यूज चॅनेलद्वारे कळले असल्याचा दावा त्यांनी केला. या संदर्भात पोलिसांशी संपर्क साधला नाही. पोलिसांनी आम्हाला काहीही सांगितले नाही, असे रुहुल यांनी म्हटले आहे. दरम्यान, एका अधिकाऱ्याने सांगितले की, खानच्या अपार्टमेंटमधून मिळालेले फिंगरप्रिंट्स आरोपीच्या बोटांच्या ठस्याशी जुळत आहेत. (Saif Attack)
हेही वाचा :
दारुड्या पतींना कंटाळल्या नि…
‘पतंजली’च्या मिरची पूडमध्ये…