कोल्हापूर : प्रतिनिधी : अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ओमनी कारने भाजी मंडईतील भाजी विक्रेतीला चिरडले. या अपघातात भाजी विकणारी महिला ठार झाली तर दोन भाजी विक्रेत्या महिला जखमी झाल्या. सुशिला कृष्णात पाटील (वय ५५ रा. आसुर्ले, ता. पन्हाळा) असे दुर्दवी मृत्यू पडलेल्या महिलेचे नाव आहे. गंगावेश ऋणमुक्तेश्वर परिसरातील भाजी मंडईत ही घटना घडली. ऐन दिवाळी सणासाठी ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केलेल्या भाजी मंडईत ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Vegetable vendor killed in accident)
ऋणमुक्तेश्वर भाजी मंडईत गंगावेशकडील शाहू उद्यानाच्या मागील प्रवेशद्वाराजवळ सहा ते महिला भाजी विक्री करत रस्त्यांवर बसल्या होत्या. गजबलेल्या या परिसरात काळ्या पिवळ्या रंगाची कार महिला अंगावर गेली. त्यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली. तर दोन महिला जखमी झाल्या. अन्य दोघींना किरकोळ जखमा झाल्या आहेत. कारची धडक इतकी वेगात होती की महिलेला चिरडून कार बंद असलेल्या वडापावच्या गाड्यावर आदळली. जखमींना सीपीआर हॉस्पिटलमध्ये ताबडतोब उपचारास दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच सुशिला पाटील यांचा मृत्यू झाला. (Vegetable vendor killed in accident)
गंगावेश परिसरात भाजी मंडई, दूध कट्टा, रिक्षा स्टॉप, वडापचा स्टॉप आहे. रिक्षा स्टॉपवर नंबर आल्याने कार मध्ये थांबलेली कार हलवण्यासाठी एका व्यक्तीने ओमनी कार स्वत: चालवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पुढे आली आहे. ब्रेकवर पाय देण्याऐवजी अक्सिलेटरवर पाय दिल्याने कार मंडईत घुसली आणि त्याखाली महिला चिरडली गेली अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. घटनास्थळी लक्ष्मीपुरी पोलिस आल्यानंतर पंचनामा केला आहे. (Vegetable vendor killed in accident)